पन्नाशीच्या होऊनही चेहऱ्यावर राहील पंचविशीचं तारुण्य! वाचा अनेकींना माहितीच नसणारं ब्यूटी सिक्रेट

Updated:June 17, 2025 19:49 IST2025-06-16T15:36:24+5:302025-06-17T19:49:20+5:30

पन्नाशीच्या होऊनही चेहऱ्यावर राहील पंचविशीचं तारुण्य! वाचा अनेकींना माहितीच नसणारं ब्यूटी सिक्रेट

वाढत्या वयाच्या खाणाखुणा हल्ली खूप कमी वयातच चेहऱ्यावर दिसू लागलेल्या आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येकाच्याच मागचा स्ट्रेस खूप वाढला आहे. खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. याचा परिणाम जसा तब्येतीवर दिसून येतो तसाच तो आपल्या त्वचेवरही दिसतो (how to keep your skin young always?). म्हणूनच त्वचेवर कमी वयातच सुरकुत्या येऊन त्वचा सैल पडण्याचे प्रमाण हल्ली खूप वाढले आहे.(how to get young glowing skin?)

पन्नाशीच्या होऊनही चेहऱ्यावर राहील पंचविशीचं तारुण्य! वाचा अनेकींना माहितीच नसणारं ब्यूटी सिक्रेट

चेहऱ्यावरचा ग्लो देखील कमी होतो आणि त्वचा डल होते. फेशियल केल्यानंतर काही दिवस त्वचा खूप छान दिसते. पण तो इफेक्ट काही मोजकेच दिवस टिकणारा असतो.(simple tricks for naturally glowing skin)

पन्नाशीच्या होऊनही चेहऱ्यावर राहील पंचविशीचं तारुण्य! वाचा अनेकींना माहितीच नसणारं ब्यूटी सिक्रेट

म्हणूनच नैसर्गिक पद्धतीने त्वचेचं सौंदर्य, तारुण्य टिकवून ठेवायचं असेल तर हा सोपा उपाय घरच्याघरी करून पाहा. हा उपाय दीपिका पदुकोन, कतरिना कैफ यांच्या आहारतज्ज्ञ श्वेता शाह यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पन्नाशीच्या होऊनही चेहऱ्यावर राहील पंचविशीचं तारुण्य! वाचा अनेकींना माहितीच नसणारं ब्यूटी सिक्रेट

त्या म्हणतात की हा उपाय करण्यासाठी १ चमचा ज्येष्ठमध आणि १ चमचा जवस एका पातेल्यामध्ये घ्या. त्यामध्ये दोन कप पाणी घाला. आता हे पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. काही वेळातच पाणी थोडं जेलीप्रमाणे झाल्यासारखं होईल.

पन्नाशीच्या होऊनही चेहऱ्यावर राहील पंचविशीचं तारुण्य! वाचा अनेकींना माहितीच नसणारं ब्यूटी सिक्रेट

हे पाणी आता गाळून घ्या. त्यामध्ये कोरफडीचा गर आणि चिमूटभर हळद घाला.

पन्नाशीच्या होऊनही चेहऱ्यावर राहील पंचविशीचं तारुण्य! वाचा अनेकींना माहितीच नसणारं ब्यूटी सिक्रेट

तसेच त्यात थोडं गुलाब पाणी घाला आणि हा लेप तुमच्या चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. १५ मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. त्वचेमध्ये खूप छान फरक दिसून येईल.

पन्नाशीच्या होऊनही चेहऱ्यावर राहील पंचविशीचं तारुण्य! वाचा अनेकींना माहितीच नसणारं ब्यूटी सिक्रेट

आता एकदा वरील पद्धतीने वापरल्यानंतर बाकीचं जे पाणी उरेल ते बर्फाच्या ट्रेमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवा. दररोज त्यातला एक बर्फाचा तुकडा घ्या आणि त्याने चेहऱ्यावर मसाज करा.

पन्नाशीच्या होऊनही चेहऱ्यावर राहील पंचविशीचं तारुण्य! वाचा अनेकींना माहितीच नसणारं ब्यूटी सिक्रेट

हा उपाय केल्यामुळे त्वचा छान हायड्रेटेड होते. त्वचेचा टाईटनेस वाढतो. त्यामुळे सुरकुत्या येणेही कमी होते.