केस गळणं थांबविणारी चायनिज थेरपी- चिनी लोकांचे केस काळेभोर, सिल्की असतात, कारण.....
Updated:December 9, 2025 12:39 IST2025-12-09T12:33:45+5:302025-12-09T12:39:33+5:30

बहुतांश चिनी लोकांचे केस चमकदार, सिल्की आणि काळेभाेर असतात. आता त्यांच्या केसांचं टेक्स्चर असं असण्यामागे अनुवंशिकताही आहेच. पण ते लोक केसांसाठी काही गोष्टी आवर्जून करतात आणि त्याचा चांगला परिणाम त्यांच्या केसांवर दिसून येतो.
चिनी वैद्यकशास्त्रानुसार केस गळण्याचा संबंध थेट तुमच्या आरोग्याशी असतो. त्यामुळे वरवरचे उपाय करून केस मजबूत होऊ शकत नाहीत. जेव्हा तुमचा स्ट्रेस खूप वाढतो, शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही आणि जेव्हा किडनीचे कार्य व्यवस्थित होत नाही, तेव्हा केस गळणं वाढायला लागतं, असं चिनी अभ्यास सांगतो.
त्यामुळे केसांची चांगली वाढ होण्यासाठी किंवा केस गळणं कमी करण्यासाठी किडनीचं आरोग्य चांगलं राहिल याची काळजी घ्या. त्यासाठी योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
डोक्याच्या त्वचेला मसाज करा. यामुळे त्वचेखालचा रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते.
काळे तीळ, बीटरुट, अक्रोड हे पदार्थ नियमितपणे तुमच्या आहारात असू द्या. यामुळे आरोग्य आणि केस दोन्हीही उत्तम राहण्यास मदत होते.
स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेस वाढला की केस गळणं वाढतं. त्यामुळे स्ट्रेस कमी करून मन शांत ठेवण्यासाठी प्राणायाम, योगासनं यांची मदत घेऊ शकता.