Mobile Storage Full? how to free up space? | फोन मेमरी सारखी FULL होतेय?- मग फोनचा पसारा ‘असा’ आवरा.
फोन मेमरी सारखी FULL होतेय?- मग फोनचा पसारा ‘असा’ आवरा.

ठळक मुद्देफोन वापरतानाही हाताला वळण लावावंच लागेल!

-सखी ऑनलाइन टीम

नुकतीच दिवाळी झाली, त्याआधी दसरा आणि लवकरच वर्ष संपत येईल मग नवीन वर्ष. यासगळ्यात कोणती गोष्ट कॉमन असेल तर ती म्हणजे शुभेच्छा. हल्ली सतत शुभेच्छांचा भडीमार होतो. फोटो येतात. व्हायरल फोटो आणि व्हीडीओंना तर तोटाच नाही. यासगळ्यात अनेकींसमोर एक मोठी गंभीर समस्या उभी राहते ती म्हणजे  ‘नो मेमरी स्पेस’! मोबाइल सतत सांगतो, मेमरी नाही. बरेचदा तर काहीजणी सतत म्हणतात की माझ्या फोनची मेमरीच पुरत नाही. प्रत्येकी वर कधी ना कधी अशी वेळ येतेच. मग अशावेळी नाईलाजास्तव काही गोष्टी डीलीट कराव्या लागतात. अनेकदा तर घाईत आपण चुकून काही महत्वाचंही डीलीट करुन टाकतो. त्यात फोटोबिटो  डीलीट करुन आपण तेवढय़ापुरती गरज भागवली जाते. 

पण यासमस्येवर काही उपाय आहेत का? तर हे करुन पहा. 

 1)सगळ्यात आधी नियमित फोटो गॅलरीत जे नको ते डीलीट करायची सवय लावून घ्या. 
2. आवश्यक त्या सगळ्या फोटोंची लगेहाथ फोल्डर करुन टाका.
 3) गुगल प्लसवर तुम्ही सगळे फोटो अपलोड करूनही प्रायव्हेट ठेवू शकता.गरजेच्या वेळी ते तुम्हाला चटकन मिळतीलही. बहुतेकांच्या फोनमध्ये सगळ्यात जास्त जागा फोटोच खातात. फोटो कमी केले की मेमरी फ्री होईल!
3)  तुमच्या फोनमध्ये आणखीन जास्त कपॅसिटीचं मेमरी कार्ड घाला. मात्र तरीही मेमरी फुल होत असेल तर व्हीडीओंचीही फोटोसारखी आवरआवरा करा.
4. तुमच्या फोनला मेमरी वाढवण्याचा ऑप्शनच नसेल, तर मग काय कराल? तर ओटीजी केबल घ्या. या केबलमुळे तुम्हाला तुमच्या फोनला पेनड्राईव्ह जोडता येईल. पेन ड्राईव्ह लावा आणि हवा तेवढा, हवा तसा डेटा साठवा किंवा ट्रान्सफर करा. मेमरी स्पेसची अडचण कधी येणारच नाही. 5. ही ओटीजी केबल ऑनलाईन अगदी दीडशे रुपयांपासून उपलब्ध आहे. काही दुकानांमध्ये याहीपेक्षा स्वस्त मिळू शकेल.
6. केबल लावण्याची झंझट करायची नसेल तर मग विकत घ्या ओटीजी पेन ड्राईव्ह. हा पेन ड्राईव्ह थेट तुमच्या फोनला अटॅच होईल. मेमरीचा प्रश्न असा सोडवता येईल.

Web Title: Mobile Storage Full? how to free up space?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.