High Cortisol Symptoms: कॉर्टिसोल हे शरीरात नॅचरली तयार होणारं एक हार्मोन आहे, ज्याला तणाव वाढवणारं हार्मोन असंही म्हटलं जातं. किडनीच्या वर असलेल्या ॲड्रेनल ग्रंथी या हार्मोनचा स्त्राव करतात. शरीरात हे हार्मोन अनेक कामे करतं, जसे वजन, स्ट्रेस रिस्पॉन्स, मेटाबॉलिझम नियंत्रित करणे, सूज आणि
गोड आणि खारट खायची इच्छा होणे
जर सतत साखर, गोड किंवा खारट खाण्याची इच्छा होत असेल, तर हे कॉर्टिसोल वाढण्याचे लक्षण असू शकते. शरीर तणाव आणि वाढलेल्या कॉर्टिसोलशी सामना करण्यासाठी त्वरीत ऊर्जा मिळेल अशा पदार्थांची मागणी करते. यासाठी शुद्ध अन्न खा, इलेक्ट्रोलाइट्स तसेच मॅग्नेशियम आणि पोटॅशियमयुक्त पदार्थ आहारात ठेवा.
पटकन इमोशनल होणे
कॉर्टिसोल वाढल्याचे एक लक्षण म्हणजे माणूस पटकन इमोशनली रिअॅक्टिव्ह होतो. तंत्रिका तंत्र ‘फाइट ऑर फ्लाइट’ स्थितीत जातं आणि त्यामुळे मन अस्थिर होतं. यावर उपाय म्हणून खोल श्वास घ्या, बाहेर फिरायला जा, तणाव कमी करा आणि नर्व्हस सिस्टीम शांत करण्याचा प्रयत्न करा.
ताण कमी करण्याचे नॅचरल उपाय
हळद, काळी मिरी आणि अॅप्पल सायडर व्हिनेगर
ताण वाढला असेल तर कॉर्टिसोल लेव्हल कमी करण्यासाठी सकाळी एक ग्लास पाण्यात चिमुटभर हळद, थोडी काळी मिरी पूड, एक चर्तुथांश मेथीचे दाणे आणि दालचीनी पाडवर मिक्स करा. यात वरून एक छोटा चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर मिक्स करा. आता यात वरून गरम पाणी टाका आणि सकाळी हळूहळू प्या.
ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये कॅटेचिन, इतर पॉलीफेनॉल्स आणि एल-थीनाइन नावाचे तत्व आढळतात. हे तत्व तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक शांतता वाढण्यास मदत करतात.
लिंबाचा रस आणि मध
सकाळी लिंबू आणि मधाचं पाणी प्यायल्यानं शरीर डिटॉक्स होतं आणि हार्मोनही बॅलन्स होतात. हे तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एका लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून प्या. काही दिवसात तुम्हाला आराम मिळेल आणि पचनक्रियेतही सुधारणा होईल.
पुदिन्याच्या चहा
पुदिन्याच्या चहामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स गुण असतात, जे तुमचा आळस दूर करण्यास मदत करतात. सोबतच यानं कॉर्टिसोल आणि इतर हार्मोन्स नियंत्रित करण्यास मदत मिळते. तसेच वजन कमी करण्यासही मदत मिळते.
