Lokmat Sakhi >Mental Health >  नक्को जीव झालाय, डोकं भणभणलंय, तुम्ही बर्न आउट झालाय.. वाचा ही 10 भयंकर लक्षण..

 नक्को जीव झालाय, डोकं भणभणलंय, तुम्ही बर्न आउट झालाय.. वाचा ही 10 भयंकर लक्षण..

तुम्ही गृहिणी असा किंवा गृहिणी आणि नोकरदार दोन्ही असा, बर्नआउट होण्याचा, आत्यंतिक थकण्याचा अनुभव कधी ना कधी येतोच. याचे शरीर आणि मनावर तसेच आपण करत असलेल्या कामांवर , नातेसंबंधावर, जीवन जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतात. आपण बर्नआउट झालो आहोत हे घरातल्या इतरांना कळतंय किंवा ऑफिसातल्या सहकार्‍यांना-अधिकार्‍यांना कळतय असं अजिबात नाही. ही जाणीव आपली आपल्यलाच होते. हे ओळखण्याची दहा लक्षणं आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 01:56 PM2021-06-30T13:56:32+5:302021-06-30T14:01:57+5:30

तुम्ही गृहिणी असा किंवा गृहिणी आणि नोकरदार दोन्ही असा, बर्नआउट होण्याचा, आत्यंतिक थकण्याचा अनुभव कधी ना कधी येतोच. याचे शरीर आणि मनावर तसेच आपण करत असलेल्या कामांवर , नातेसंबंधावर, जीवन जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतात. आपण बर्नआउट झालो आहोत हे घरातल्या इतरांना कळतंय किंवा ऑफिसातल्या सहकार्‍यांना-अधिकार्‍यांना कळतय असं अजिबात नाही. ही जाणीव आपली आपल्यलाच होते. हे ओळखण्याची दहा लक्षणं आहेत.

Nakko is dead, your head is shaking, you are burned out .. Read these 10 terrible symptoms .. |  नक्को जीव झालाय, डोकं भणभणलंय, तुम्ही बर्न आउट झालाय.. वाचा ही 10 भयंकर लक्षण..

 नक्को जीव झालाय, डोकं भणभणलंय, तुम्ही बर्न आउट झालाय.. वाचा ही 10 भयंकर लक्षण..

Highlightsपाठ दुखणं, नैराश्य, हदयाशी संबधित आजार, स्थूलता किंवा खूप आजारी पडणं हे सर्व कामाच्या पातळीवर प्रचंड थकण्याचे अर्थात बर्नआउटचे आहेत.आपण आपल्याच प्रेमाच्या, जवळच्या माणसांवर चिडचिड करतो, त्यांच्यापासून दुरावा राखतो. बर्नआउटमुळे एरवी सकारात्मक विचार करणारे आपण एकदम नकारात्मक विचार करायला लागतो. सतत इतरांवर टीका करायला लागतो.

 

खूप थकल्यासारखं वाटणं, काम करण्याचा उत्साह नसणं, जे काम पूर्वी अगदी सहज करत होतो ते आपल्याला जमणारच नाही असं वाटायला लागणं याला काय म्हणतात ते माहिती आहे का? या सर्व लक्षणांसाठी, जाणिवेसाठी, अनुभवासाठी इंग्रजीत बर्नआउट ही संकल्पना आहे . तुम्ही गृहिणी असा किंवा गृहिणी आणि नोकरदार दोन्ही असा हा अनुभव कधी ना कधी येतोच. याचे शरीर आणि मनावर तसेच आपण करत असलेल्या कामांवर , नातेसंबंधावर, जीवन जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतात. आपण बर्नआउट झालो आहोत हे घरातल्या इतरांना कळतंय किंवा ऑफिसातल्या सहकार्‍यांना-अधिकार्‍यांना कळतय असं अजिबात नाही. ही जाणीव आपली आपल्यलाच होते. पण अनेकदा या जाणीवेकडे दुर्लक्ष करुन आपण घरात, ऑफिसात, जीवनाच्या प्रत्येक आघाडीवर स्वत:ला ओढत राहातो. ताकद नसली तरी खेचत राहातो.पण या पूर्ण थकून गळून गेल्याच्या अर्थात बर्नआउटच्या अवस्थेतून बाहेर पडणं हे खूप आवश्यक असतं. त्यावर स्वत: अगदी सहज करता येतील असे उपायही आहेत. पण यासाठी आपण बर्नआउट झालोय किमान हे तरी वेळेत लक्षात यायला हवं. हे स्वत:च्या पातळीवर ओळखण्याचे 10 लक्षणं आहेत. यातले काही, सर्व किंवा एखादं जरी जाणवत असलं तर आपण बर्नआउट झालोय हे ओळखून सावध व्हायला हवं. त्वरित उपायांकडे वळायला हवं.

बर्नआउटची लक्षणं कोणती


1 आरोग्याच्या तक्रारी


 बर्नआउटचा सर्वात मोठा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. पाठ दुखणं, नैराश्य, हदयाशी संबधित आजार, स्थूलता किंवा खूप आजारी पडणं हे सर्व कामाच्या पातळीवर प्रचंड थकण्याचे अर्थात बर्नआउटचे आहेत. हे सतत होत असल्यास हे परिणाम कमी करण्यासाठी कामाच्या पातळीवर थोडं थांबून बघण्याची, कामाच्या पध्दतीची पुर्नबांधणी करण्याची गरज आहे हे ओळखावं.

2 आकलनविषयक समस्या

बर्नआउटमधून मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण होतो. या ताणाचा परिणाम मेंदूच्या पुढच्या भागावर ज्याला प्रीफ्रण्टल कॉर्टेक्स असं म्हणतात. या भागाचा मुख्य परिणाम अंमलबजावणी, निर्णय क्षमतेवर, भावनिक नियंत्रण आणि लक्ष केंद्रित करण्याच्या कृतीवर आणि स्मृतीवर होतो. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही घरी किंवा ऑफिसमधे अगदीच ‘सिली’स्वरुपाच्या चुका करत आहात, महत्त्वाच्या गोष्टी विसरत आहात , उगाच रागराग, चिडचिड, संताप करत आहात किंवा अगदीच फालतू निर्णय घेत आहात तेव्हा आपण बर्नआउट झालोय हे लक्षात घ्यावं.

3 कामावर आणि नातेसबंधावर परिणाम
 

बर्नआउटमधून निर्माण होणारा ताण सगळीकडे झिरपतो. जेव्हा ऑफिसमधे हा ताण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करता तेव्हा घरी गेल्यावर हा ताण घरच्यांवर निघतो. यातून आपल्या नातेसंबंधावर परिणाम होतो. आपण आपल्याच प्रेमाच्या, जवळच्या माणसांवर चिडचिड करतो, त्यांच्यापासून दुरावा राखतो.

 

4 ऑफिसचं काम जेव्हा घरी येतं
 

ऑफिसचं काम, त्याबाबतचे विचार हे खरंतर ऑफिसच्या पातळीवरच संपायला हवेत. पण जेव्हा घरी आल्यानंतर, झोपण्यासाठी म्हणून पाठ टेकवल्यावर आज ऑफिसमधे आपण अमूक चुकीचं केलं किंवा तमूक गोष्ट महत्त्वाची असूनची आपण ती पूर्ण केली नाही या विचारानं अस्वस्थ होतो तेव्हा ते लक्षण बर्नआउट झाल्याचं असतं.

5 कमालीचा थकवा 

 बर्नआउटमुळे आत्यंतिक थकवा जाणवतो. कारण आपल्या शरीर आणि मनावर ताण आलेला असतो. या थकव्याची मुख्य लक्षणं म्हणजे रात्री खूप वेळ झोप काढूनही सकाळी उठल्यावर अंगात ऊर्जा किंवा उत्साह नसणं, कामाच्या ठिकाणी खूप झोप येणं, ती जाण्यासाठी सतत चहा कॉफी घेत राहाणं ही बर्नआउटच्या थकव्याची लक्षणं आहेत.

6 नकारात्मकता
 

बर्नआउटमुळे एरवी सकारात्मक विचार करणारे आपण एकदम नकारात्मक विचार करायला लागतो. जेव्हा एखाद्या गोष्टीची वाईट बाजूच दिसते किंवा आपण इतरांना केवळ ताडूनच बघतोय, त्यांची निंदाच करतोय हे जेव्हा होतं तेव्हा आपण बर्नआउट झालोय हे समजावं.

 

 

7 समाधानाची भावना नसणं

काम, माणसं या गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला उर्जा आणि आयुष्यात समाधान आणि आनंद देतात. पण बर्नआउटमुळे असमाधानाची भावना वाढीस लागते. हे असमाधान असतं तेव्हा घर असू देत नाहीतर ऑफिस काम करणं अवघड होतं. कारण काम करताना आपण जेवढं देतोय त्यापेक्षा अपल्याला मिळणारी गोष्ट मनासारखी नसते अशी एकूण जाणीव होते.

8 कामाची प्रेरणा हरवते

जेव्हा आपण नुकतेच नोकरीला लागलेलो असतो तेव्हा आपल्याला कामाबद्द्ल उत्सुकता, उत्साह असतो. हा उत्साहच आपल्याला काम करण्याची प्रेरणा देत असतो. पण जेव्हा आपण बर्नआउट अवस्थेत असतो. तेव्हा ही प्रेरणाच मिळत नाही. कामाकडे आपण कामासारखं न बघता त्या कामाचं आपल्याला टेन्शन येवू लागतं, कोणीतरी आपल्याला बोलेल, ओरडेल अशी भीती वाटत राहाते.

9 कामगिरी खालावते
 

आपण बर्नआउट अवस्थेतून जात आहोत हे कोणी आपल्याल बाहेरुन सांगत नाही. हे आपलं आपल्याला लक्षात येतं. आपली घसरत चाललेली कामगिरी हे आपल्याला ठामपणे बर्नआउटबद्दल सांगू शकते. आपणच आपल्या कामाची तुलना स्वत:शी करत ते मागच्या महिन्यात, मागच्या वर्षात कसं होतं आणि आता कसं आहे याचा विचार करुन शोध घ्यावा. जर कामगिरी घसरलेली आढळली तर आपण बर्नआउट झालोय हे समजावं.

10 स्वत:कडे दुर्लक्ष

बर्नआउट अवस्थेत स्वत:वरचं नियंत्रण हरवतं. आपण कुठे थांबायला हवं याचं भान राहात नाही. कधी कधी बर्नआउटच्या थकव्यानं आलेलं नैराश्य इतकं तीव्र असतं की आपणच संपून जावं असं वाटतं. या ताणामुळे, नैराश्यामुळे धड निर्णय घेता येत नाही, स्वत:वर नियंत्रण ठेवता येत नाही. त्याचा परिणाम म्हणजे स्वत:चा आत्मविश्वास कमी होतो. स्वत:ला स्वत:कडून प्रेरणा मिळेनाशी होते.

Web Title: Nakko is dead, your head is shaking, you are burned out .. Read these 10 terrible symptoms ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.