Lokmat Sakhi >Mental Health > How to Be Happy Always : २४ तास पॉझिटिव्ह अन् आनंदी राहण्यासाठी ३ गोष्टी करा; जास्त विचारायची सवय आपोआप होईल कमी

How to Be Happy Always : २४ तास पॉझिटिव्ह अन् आनंदी राहण्यासाठी ३ गोष्टी करा; जास्त विचारायची सवय आपोआप होईल कमी

How to Be Happy Always : आपण आनंद मिळण्यासाठी संघर्ष करतो कारण आपण गोष्टींचा पाठपुरावा करत आहोत, या आशेने की त्या आपल्याला आनंद देतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:44 PM2022-04-20T18:44:52+5:302022-04-20T18:59:20+5:30

How to Be Happy Always : आपण आनंद मिळण्यासाठी संघर्ष करतो कारण आपण गोष्टींचा पाठपुरावा करत आहोत, या आशेने की त्या आपल्याला आनंद देतील.

How to Be Happy Always : 3 Habits to Add to Your Routine and stay always happy | How to Be Happy Always : २४ तास पॉझिटिव्ह अन् आनंदी राहण्यासाठी ३ गोष्टी करा; जास्त विचारायची सवय आपोआप होईल कमी

How to Be Happy Always : २४ तास पॉझिटिव्ह अन् आनंदी राहण्यासाठी ३ गोष्टी करा; जास्त विचारायची सवय आपोआप होईल कमी

आपण सर्वजणआनंद शोधत असतो, आणि त्याला कारणही तसेच आहे. आनंद आपले जग सुंदर बनविते. कामाच्या ठिकाणी आनंदी कर्मचारी जास्त कमाई करतात. (How to Be Happy Always) घरी आनंदी पालक आनंदी मुले घडवितात. समाजात, आनंदी माणसे अधिक स्वयं सेवा करतात. खेळामधे, आनंदी खेळाडू उत्तमरीत्या खेळतात. आणि सर्वात महत्त्वाचे, ईश्वराला त्याची सर्व मुले दु:खी नाही तर आनंदी असायला हवी आहेत. हार्टफुलनेस ध्यान पद्धतीचे मार्गदर्शक कमलेश पटेल यांनी आनंदी राहण्याबाबत अधिक माहिती दिली आहे.  हार्टफुलनेस राजयोगावर आधारित एक सोपी ध्यानपद्धती असून तिला सहजमार्ग किंवा नैसर्गिक मार्ग असेही म्हणतात. ही प्रथम विसाव्या शतकाच्या अखेरीस विकसीत झाली, ( 3 Habits to Add to Your Routine and stay always happy)

तरीही, आनंद गवसणे किती कठीण आहे. आणि याचे कारण हे की आपण काय शोधतो आहोत ते आपण विसरतो.  ते सांगतात की, "जर तुम्ही इतके चतुर आहात तर तुम्ही आनंदी का नाही?" एका पुस्तकात प्रा. राज रंगनाथ प्रश्न विचारतात. तो असा की, "जर जीनीने (अलाउद्दीनचा जीनी) तुम्हाला ३ इच्छांचे वरदान दिले तर तुम्ही काय मागाल?" अनेक वर्षांपासून या प्रश्नाचे उत्तर हजारो लोकांनी दिले आहे, आणि त्यामध्ये या तीन गोष्टीं आहेत : "जर माझ्याकडे जास्त पैसा असेल, तर मी आनंदी होईन", "जर मी प्रसिद्ध झालो तर मी आनंदी होईन", "मला जर प्रेम गवसले तर मी आनंदी होईन". प्रा. रंगनाथ म्हणतात क्वचितच एखादा म्हणतो, "जीनी, मला फक्त एक गोष्ट हवी आहे. कृपया मला आनंद दे".  

 
आपण आनंद मिळण्यासाठी संघर्ष करतो कारण आपण गोष्टींचा पाठपुरावा करत आहोत, या आशेने की त्या आपल्याला आनंद देतील. लहान मूल खेळण्यांमधे आनंद शोधते, युवक मैत्रीमधे आनंद शोधतो, उद्योगपती पैशांमधे आनंद शोधतो आणि योगी चेतने मधेआनंद शोधतो. सर्वजण इतर कशामध्यही आनंद शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

परंतु आनंद हा शुद्ध तरंगआहे, जो आपल्या अस्तित्त्वाच्या केंद्रातून उत्पन्न होतो आणि बाहेरच्या दिशेने उत्सर्जितहोतो. आनंद हा आत्म्याचा गुण आहे. जेव्हा आपण प्रत्यक्ष स्रोताचा शोध घेतो तेव्हा आपल्याला चिरस्थायी आनंद मिळतो.  सर्व आनंदाचे रहस्य चिंता क्रांत मनाच्या स्थिर होण्यात आहे. ज्याला आपण चिंता म्हणतो ती मनाची तीव्र इच्छा आहे, जी इच्छांच्या सतत बदलणाऱ्या आणि कधीही न संपणाऱ्या स्वरूपाचा परिणाम आहे. आणि जोपर्यंत इच्छापूर्ण होत नाही, तोपर्यंत  ती मनाला अस्वस्थ करीत राहणार. इच्छांना समाधानाने लगाम घालता येतो . समाधान आंतरिक शांतीचा पाया आहे. मी तुम्हाला तीन पद्धती सांगतो, ज्या समाधान जोपासतात. या तीन पद्धतीतुमच्या आनंददायी सवयी होऊ शकतील.  

१) देणे आपल्याला आनंद देते

देणे आपल्याला आनंद देते. अनामिकपणे देणे याची एक वेगळीच शान आहे. तुमचा वेळ आणि पैसे द्या. सर्वात महत्त्वाचे, तुमचे प्रेम द्या. तुमच्या शरीरातील स्नायूंना जशी व्यायामाची गरज असते, तशीच हृदयाच्या गुणांनाही व्यायामाची गरज असते. आणि व्यायामाविषयी काय बोलले जाते तो तुम्हाला आनंद देतो. 

२) कृतज्ञता जोपासा  

समाजशास्त्रज्ञ जॉर्ज सिमेल लिहितात, कृतज्ञता ही मानवजातीची नैतिक स्मृती आहे. कृतज्ञतेची जाणीव लोकांबरोबर चांगले बंध निर्माण करण्यास मदत करते. ती आपल्याला उदार बनवते आणि जीवनात एकंदरीत समाधान वृद्धिंगत करते. तुम्ही कशाबद्दल कृतज्ञ आहात ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुमच्या नोंदवहीत लिहा.

जर कचेरीतील एखाद्या सहकाऱ्याने तुम्हाला मदत केलीतर तुमच्या रोजनिशीमध्ये ते लिहा. जर बरिस्तामधे तुम्हाला आत शिरत असताना पाहून तुमची कॉफी तयार ठेवलीतर ते लिहा. सकाळी, जागे होताच, दोन मिनिटे बसा आणि, ईश्वराप्रती आणि ज्या लोकांना त्याने तुमच्या सभोवताली ठेवले आहे, त्यांच्याप्रती आपलीकृतज्ञतेची भावना व्यक्त करा. कृतज्ञ हृदय हे आनंदी हृदय असते.  

3) वर्तमानात राहा 

एकदा मी मंचावर लहान मुले कार्यक्रम प्रस्तुत करतानाचे एक चित्र बघितले. सर्व पालक मोबाईल फोनमधे चित्रीकरण करण्यात व्यस्त होते पण त्यांना हे समजत नव्हते की ते त्या कार्यक्रमाला मुकत आहेत. त्या चित्राचा मथळा होता “वर्तमान क्षण चुकवू नका.”  आपण वर्तमानात राहण्याकरिता झगडतो. ज्या क्षणी मी वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच तोक्षण निघून गेलेला असतो. तो आता भूतकाळ झालेला असतो. “वर्तमान हा शब्द उच्चारून पूर्ण होण्यापूर्वीच तो भूतकाळात जमा झालेला असतो. मग, “वर्तमानात राहा" याचा नक्की अर्थतरी काय? 

गीता आपल्याला त्या वृक्षाप्रमाणे बनण्याची प्रेरणा देते. जो त्याच्या समोरच्या नदीतील सतत वाहून जाणाऱ्या पाण्याचा साक्षी असतानाही चिरंतन वर्तमानात असतो. भगवान श्रीकृष्णअर्जुनाला सांगतात की जो स्थितप्रज्ञाच्या अवस्थेत असतो तो या स्थितीत राहतो. वर्तमानात राहा जो नेहमीच तुमच्याबरोबर होता, आहे आणि असणारही आहे. जोमूळ स्त्रोत तुमच्यासोबत अवतरला आहे आणि आत्ता तुमच्यासोबत आहे.

Web Title: How to Be Happy Always : 3 Habits to Add to Your Routine and stay always happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.