Menstrual cycle: Pimples on face, hair on lips What causes this irritation? | मासिक पाळी : चेहर्‍यावर पिंपल्स, ओठांवर केस हा त्रास कशामुळे?
मासिक पाळी : चेहर्‍यावर पिंपल्स, ओठांवर केस हा त्रास कशामुळे?

ठळक मुद्देताण, लाइफस्टाइल आणि आरोग्य यांचा परस्परांशी थेट संबंध असतो.

सखी  ऑनलाईन  टीम 

मासिक पाळीच्यावेळी किंवा आठवडाभर आधी चेहर्‍यावर खूप पुरळ येतं, पिंपल्स असे का होते? त्यावर काही उपाय आहेत का.? पिंपल्स ही आजच्या काळात अनेकींची समस्या आहे. चेहर्‍यावरच्या पिंपल्समुळे आत्मविश्वासही कमी होतो असं सांगणार्‍या तर अनेकजणी आहेत. त्या त्रासाचा आणि मासिक पाळीच्या चक्राचा संबंध असतो आणि त्यावर उपचार करायला हवेत हे मात्र ध्यानात येत नाही. मासिक पाळी येताना शरीरात हार्मोन्स बदलतात, त्यामुळे अनेक मुलींच्या चेहर्‍यावर पिंपल्स येतात. पुरळही येते. मासिक पाळी येऊन गेल्यावर ती पुरळ किंवा पिंपल्स जातात असं होत असेल तर त्यात घाबरण्यासारखे फारसं काही नसतं.
करायचे एवढंच की या काळात चेहर्‍याची त्वचा जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावी. त्वचा ऑयली असेल तर अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आहरातही शेंगदाणे, काजू खाऊ नयेत. तेलकट-तुपकट पदार्थ खाऊ नयेत.


मासिक पाळीचं पूर्ण चक्र हे 21 दिवसांचं असतं. मुलगी वयात येतांना जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा लवकर येणं किंवा उशीरा येण हे तसं नैसर्गिक असतं. कारण तोर्पयत ते चक्र स्थिर झालेलं नसतं. पहिलं वर्ष किंवा दोन वर्ष हे चक्र स्थिर होईर्पयत ही अनियमितता असते.
त्यानंतर मात्र 21 दिवसांच्या आधी किंवा दीड महिन्याच्या नंतर जर मासिक पाळी येत असेल तर त्या अनियमिततेची कारणं तपासायला हवी.
मासिक पाळी येऊन गेल्यानंतर 13/14 व्या दिवशी किंवा त्याआधीच येत असेल तर वैद्यकीय मदत घ्यावी. आपल्या आहार-विहराकडेही लक्ष द्यावं. प्रचंड मानसिक तणाव असेल तरी मासिक पाळी लवकर येऊ शकते. अतिरिक्त वजन वाढ झाली असेल तरी त्याचा मासिक पाळीवर परिणाम होतो. हा लाईफस्टाईल प्रॉब्लेम आहेच. पण काहीजणींना थायरॉईडचीही समस्या असू शकते.


खूप ताण असेल, अगदी प्रेमप्रकरणापासून ते अभ्यासार्पयतचे टेन्शन असतील तरी त्या ताणाचा आरोग्यावर परिणाम होतो. मासिक चक्रावरही होतो.
मासिक पाळीच्या काळात  चेहर्‍यावर याच काळात एकाएकी खूप जाड गाठींसारखे फोड येतात., त्यांच्यामध्ये पू होतो. ते फुटले किंवा त्यांना हात लागला तरी वेदना होतात.


तसं होत असेल तर मात्र डॉक्टरांची मदत घ्यायला हवी. तसेच चेहर्‍यावर केसांची वाढ जास्त असेल तर, ओठांवर, हनुवटीवर किंवा छातीवर केस असतील तरी हार्मोनल इम्बॅलन्सची शक्यता वाढते. अनेक मुलींच्या ओठांवर, पोटावर, छातीवर मऊ केस असतात. तसे असतील तर फार काळजी करू नये. पण छातीवर किंवा हनुवटीखाली एक किंवा दोनच जाड-राठ केस आले असतील तर हार्मोन्सशी संबंधित समस्या असू शकते.
काही घरांमध्ये महिलांना ही समस्या अनुवंशिकही असते, मात्र कारणं समजून घेऊन त्यावर आवश्यक उपाय करून घ्यावे. प्रश्न फक्त चेहर्‍याचा नाही संपूर्ण आरोग्याचा आहे. 

Web Title: Menstrual cycle: Pimples on face, hair on lips What causes this irritation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.