Lokmat Sakhi >Inspirational > पाथर्डी ते आयपीएल!! आरती केदारची जबरदस्त झेप, पाथर्डीतून थेट कसा गाठला आयपीएल संघ? वाचा कहानी

पाथर्डी ते आयपीएल!! आरती केदारची जबरदस्त झेप, पाथर्डीतून थेट कसा गाठला आयपीएल संघ? वाचा कहानी

Inspirational: खेडेगावातल्या आरतीची (Aarati Kedar) बघा ही भन्नाट झेप.. इच्छाशक्ती असेल तर लहानशा गावातूनही तुम्ही उंच भरारी घेऊ शकता.. हेच तर सांगतेय हत्राळ (Hatral) तालुक्यातली आरती. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 05:35 PM2022-05-16T17:35:27+5:302022-05-16T17:36:24+5:30

Inspirational: खेडेगावातल्या आरतीची (Aarati Kedar) बघा ही भन्नाट झेप.. इच्छाशक्ती असेल तर लहानशा गावातूनही तुम्ही उंच भरारी घेऊ शकता.. हेच तर सांगतेय हत्राळ (Hatral) तालुक्यातली आरती. 

Aarati Kedar from small village Hatral, in Ahmadnagar district get selected for women T20 IPL | पाथर्डी ते आयपीएल!! आरती केदारची जबरदस्त झेप, पाथर्डीतून थेट कसा गाठला आयपीएल संघ? वाचा कहानी

पाथर्डी ते आयपीएल!! आरती केदारची जबरदस्त झेप, पाथर्डीतून थेट कसा गाठला आयपीएल संघ? वाचा कहानी

Highlightsतिचा खेळ असा जबरदस्त होता की एकेक करत ती स्पर्धा गाजवत गेली आणि मग थेट महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघापर्यंत धडक मारली.

अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी (Pathardi) तालुक्यातल्या हात्राळ या छोट्याशा गावाचं नाव आतापर्यंत अनेक जणांनी ऐकलंही नव्हतं. पण आता मात्र ते नाव महाराष्ट्राच्या (Maharashtra Cricket) घराघरात पोहोचलंय.. ज्या व्यक्तीमुळे आज घराघरात हात्राळची, पाथर्डीची चर्चा होत आहे, ती व्यक्ती म्हणजे आरती केदार. हात्राळ गावात अतिशय प्रतिकुल परिस्थितीत वाढणाऱ्या आरतीने आज चक्क महिलांच्या आयपीएल IPL संघात धडक मारली आहे.. घरातच काय पण गावातही महिलांसाठी क्रिकेटचं अनुकूल वातावरण नसणाऱ्या या छोट्याशा गावातील आरतीने कशी घेतली बरं एवढी उत्तूंग झेप? वाचा तिची कहानी..

 

सध्या पदवीचे शिक्षण घेणाऱ्या आरतीला अगदी लहानपणापासून क्रिकेटची आवड. पण आवड असली तरी छोट्या गावात थोडीच मिळणार त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण. तसंच काहीसं तिचंही झालं. बालवयात जसं जमेल तसं ती खेळायची. पण २०१४ पासून मात्र तिने क्रिकेटचं योग्य प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिचा खेळ असा जबरदस्त होता की एकेक करत ती स्पर्धा गाजवत गेली आणि मग थेट महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघापर्यंत धडक मारली. नुकत्याच पाँण्डीचेरी येथे झालेल्या महिला रणजी क्रिकेट स्पर्धेतही आरती सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू ठरली. तिची हीच कामगिरी तिला थेट आयपीएलच्या महाकुंभात घेऊन गेली आहे. 

 

यश निश्चितच मोठं आहे. पण या यशामुळे आरती अजिबातच हुरळून गेलेली नाही. तिला तिचं अंतिम ध्येय बरोबर ठाऊक आहे. म्हणूनच तर याविषयी सांगताना आरती म्हणते की 'खरेतर भारतीय महिला क्रिकेट संघात खेळायचं, हे माझं स्वप्न. पण त्या स्वप्नाकडे वाटचाल करण्यापुर्वीची ही एक पायरी आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळायला मिळतंय, याबाबत खरोखरंच आनंदी आहे..'. मुलीच्या यशामुळे आरतीचे पालकही अतिशय आनंदी असून 'पोरीने आमच्या कष्टाचं चीज केलं.. आमचं नाव खूप खूप मोठ्ठं केलं....' असं ते अत्यानंदाने सांगत आहेत. 

 

Web Title: Aarati Kedar from small village Hatral, in Ahmadnagar district get selected for women T20 IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.