Lokmat Sakhi >Inspirational > ९० वर्षाच्या आजीने जिंकली धावण्याच्या स्पर्धेत 3 सुवर्णपदकं! जिद्द आणि मेहनत सुसाट, वयालाही हरवलं

९० वर्षाच्या आजीने जिंकली धावण्याच्या स्पर्धेत 3 सुवर्णपदकं! जिद्द आणि मेहनत सुसाट, वयालाही हरवलं

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी वयाची आडकाठी येऊ शकत नाही, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही ध्येय साध्य करु शकता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 01:42 PM2022-05-05T13:42:22+5:302022-05-05T13:44:57+5:30

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी वयाची आडकाठी येऊ शकत नाही, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही ध्येय साध्य करु शकता...

90 year old grandmother won 3 gold medals in running competition! Persistence and hard work, lost age too | ९० वर्षाच्या आजीने जिंकली धावण्याच्या स्पर्धेत 3 सुवर्णपदकं! जिद्द आणि मेहनत सुसाट, वयालाही हरवलं

९० वर्षाच्या आजीने जिंकली धावण्याच्या स्पर्धेत 3 सुवर्णपदकं! जिद्द आणि मेहनत सुसाट, वयालाही हरवलं

Highlights या वयातही एखाद्या तरुणीप्रमाणे उत्साह असलेल्या भगवानी यांच्यातील उत्साहाला तोड नाही हेच खरे. हिमाचलसारख्या पहाडी भागात राहणाऱ्या या आजीची कमाल आहे...

वयाच्या ३० किंवा ४० व्य़ा वर्षी आपल्याला कोणी मॅरेथ़नमध्ये धावायला सांगितलं तरी आपल्याला त्याचं टेन्शन येतं. पण वयाची ९० पार केल्यानंतरही एक आजी सुसाट धावत आहे. इतकंच नाही तर धावण्याच्या स्पर्धेत अव्वल येत ती सुवर्णपदकंही पटकावत आहे. आपल्याला थोडा जास्त व्यायाम केला की आपण थकतो. पण वयाची पर्वा न करता सुसाट धावणाऱ्या या आजीच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम करावा तितका थोडाच. आता वयाच्या नव्वदीतही या आजीने तीन सुवर्णपदकं जिंकत आपल्यातील जिगर दाखवून दिली आहे. आता ही आजी इतकी ठणठणीत कशी असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला असेल. तर तिची मनाची तयारी आणि फिटनेस हेच त्यामागचे खरे गमक आहे.  

 

चेन्नईमध्ये आयोजिक करण्यात आलेल्या नॅशनल मास्टर्स अॅथलेटीक्स चॅम्पियनशीपमध्ये भगवानी देस्वाल यांनी ३ सुवर्णपदकं मिळवली आहेत. वेगवेगळ्या १३ वयोगटांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये २६ राज्यांतील ३५०० जणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये भगवानी यांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीमुळे जूनमध्ये फिनलंड येथे होणाऱ्या जागतिक मास्टर्स अॅथलेटीक स्पर्धेत त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. याआधी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी यश मिळवल्यामुळे त्यांना नॅशनल स्पर्धेत सहभागी होता आले. 

चाळीशी जवळ आली की आपले हे दुखते आणि ते दुखते म्हणत तक्रारी करणारे आपण या ९० वर्षांच्या भगवानी यांच्याकडून नक्कीच प्रेरणा घ्यायला हवी. एखादी गोष्ट करण्यासाठी तुमची मनाची तयारी असेल आणि तुम्ही जिद्द आणि चिकाटीने त्यासाठी प्रयत्न करत असाल तर यश तुमच्यापासून फार दूर नसते हेच भगवानी यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी वयाची आडकाठी योग्य नाही हेच या उदाहरणातून आपल्या समोर येते. वय झाले की आपल्याकडे अनेक जण आयुष्यातील शेवटचे दिवस म्हणून जगत राहतात. पण या वयातही एखाद्या तरुणीप्रमाणे उत्साह असलेल्या भगवानी यांच्यातील उत्साहाला तोड नाही हेच खरे. 

Web Title: 90 year old grandmother won 3 gold medals in running competition! Persistence and hard work, lost age too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.