I know how to live.. Says Sheetal Maheshwariby her poem and Sketches | मुझे जीना आता है!
मुझे जीना आता है!

- रंजू मिश्रा 

जिंदगी जिंदादिली का नाम है
मुर्दा दिल क्या खाक जिया करते है.
पुण्यातल्या खराडी येथे राहणार्‍या 49 वर्षीय शीतल माहेश्वरी या ओळींना प्रत्यक्ष अनुभवात उतरवून जगत आहेत. अंत:करणातून उमटलेल्या असंख्य ओळी आणि शब्दाशब्दांनी ओवलेल्या  कविता, कल्पनेतून साकारलेली चित्रं, यातून मनमुराद व्यक्त होण्याची आवड शीतल माहेश्वरी मनापासून जपतात. सकारात्मकतेनं ओतप्रोत भरलेल्या त्यांच्या कविता असू देत अथवा कुंचल्यानं चितारलेली चित्रं , स्केचेस, मोबाइलवरील डिजिटल स्केचेस यात कधीही त्यांनी स्वत: अनुभवलेली वेदना उमटू दिली नाही.  

इंदूर येथे जन्मलेल्या आणि आंध्र प्रदेशमधील राजमुंदरी येथे लहानाच्या मोठय़ा झालेल्या शीतल आज 49 वर्षांच्या आहेत. लहानपणी डॉक्टरांच्या चुकीमुळे त्यांना कायमचं अधू व्हावं लागलं. या परिस्थितीत शिक्षण जेमतेम दहावीपर्यंतच झालं. पुढे त्यांनी चाइल्ड एज्युकेशन डिप्लोमा केला. 
याचदरम्यान मणक्याच्या पाच शस्त्रक्रिया झाल्यात; पण त्याचा उपयोग झाला नाही. आयुष्य परावलंबी झालं असलं तरी त्यांनी परिस्थितीपुढे शरणागती पत्करली नाही, तक्रार केली नाही. परिस्थितीचा स्वीकार करीत त्यातील सकारात्मकताच शोधली. आणि हीच सकारात्मकता त्यांच्या कवितांमधून, चित्रांमधून उमटत गेली    
रंग अलग अलग होते है.
महकभी जिसकी होती है 
जुदा जिंदगी  कुछ और नही 
बस एक प्यारासा गुलदान.
कवितेत म्हटल्याप्रमाणे आपलं आयुष्यही असंच वेगळं पण छान आहे, असं त्या नेहमीच म्हणत असतात. आणि याच भावनेतून जगण्याची रीतही त्यांनी शोधून काढली आहे. 
मुझे जीना आता है 
बादलों की तरह
चंचल हो उडा करती हूॅँ
हो जाती हूॅँ कभी मायूस भी
तो नमी खुशियों की भी भर लेती हूँ
और फिर उड जाती हूँ 
नील गगन पर
खुशियों की बरखा बन
बरस लेती हूँ
हां हां. मुझे जीना आता है..
आपल्या कवितांमधून शीतल यांनी कला, साहित्य, संस्कृती, कुटुंब, नाती या विषयांना तसेच मनाच्या खोलवर दडलेल्या अनेक भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ‘शीतल्स डिजिटल वल्र्ड’ या त्यांच्या ब्लॉगवर आणि फेसबुक पेजवर तर त्यांच्या असंख्य कवितांमधून त्यांच्या जिंदादिल व्यक्तिमत्त्वाचे पैलू सापडतात. शीतल यांना  लहानपणासूनच चित्रकलेचीही आवड  होती. चित्रकलेनंही त्यांच्या आयुष्यात सकारात्मकतेचे रंग भरले. चित्रकलेतून मिळणा-या ताकदीलाही त्या आपल्या कवितेतून व्यक्त करत असतात. 
कभी सतरंगी
तो कधी श्वेतश्याम
बन जाते है  
ये कागज
लफ्जों के एहसास को 
जो सोख लेते है.
काळाची पावलं ओळखत शीतल यांनी तंत्नज्ञानालाही आपलंसं केलंय. प्रत्येक माध्यमातून त्या व्यक्त होताहेत.  शीतल सध्या डिजिटल स्केचेस बनवतात. यासंदर्भातील कुठलंच प्रशिक्षण त्यांनी  घेतलं नाही. मोबाइल स्क्रीनवरील रंग  आणि  हाताची बोटं यांचा मेळ साधत त्या सुंदर स्केचेस करतात. त्यांची ही स्केचेस पुस्तकांच्या मुखपृष्ठासाठी वापरण्यात येतात. 
लंडनस्थित साहित्यिक शिखा वाष्ण्रेय यांच्या ‘देसी चष्मे से लंदन डायरी’ या पुस्तकासाठी शीतल यांनी मुखपृष्ठ साकारलंय. रश्मी प्रभा यांच्यासह अन्य साहित्यिकांनीही शीतल यांना त्यांच्या पुस्तकांसाठी मुखपृष्ठ बनवण्याची गळ घातलीय. व्यक्त होण्याची जी जी माध्यमं आहेत, ती सर्वच शीतल यांना भावतात. कथाकथन हे यापैकीच एक माध्यमही त्यांनी स्वीकारलय. 
‘रेडियोप्लेबैक इंडिया’ या वेबसाइटवरील ‘बोलती कहानियाँ’ या कार्यक्रमासाठी त्यांनी आपला आवाज दिलाय. याशिवाय इंटरनेटशीही मैत्री करीत जगभरातील सामान्यज्ञान,  रंजक माहिती, यासंदर्भातील अपडेट्स याचा त्या सतत पाठपुरावा करीत असतात. 

आईवडील, भाऊ-वहिनी यांच्या सोबतीनं त्या आनंदानं जगताहेत. म्हणूनच व्हीलचेअरवर असूनही शीतल यांची पावलं मात्र काळाच्या पुढेच धावता आहेत. आपल्या आयुष्याच्या प्रवासाविषयी त्या  म्हणतात. 
कही खो जाऊँ
कही पा जाऊँ
बस युही चलता 
ये सफर रहे
छुपा मुझमे एक यायावर 
बंजारो की जिंदगी  
जिसे पसंद है.

(अनुवाद-  सारिका पूरकर-गुजराथी)


Web Title: I know how to live.. Says Sheetal Maheshwariby her poem and Sketches
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.