Health Tips : टाइप 2 डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग आणि लठ्ठपणा हे असे आजार आहेत, जे भारतात आधी केवळ श्रीमंत लोकांना होत होते. पण आता हे आजार शहरातील गरीब लोकांनाही होऊ लागले आहेत. महत्वाची बाब म्हणजे शहरांमधील गरीब लोक कमी कॅलरी असलेला आहार घेत असूनही त्यांना हे आजार होत आहेत.
डॉ. मोहन यांच्यानुसार, या गोष्टी होण्याचा हा अर्थ आहे की, केवळ कमी खाणंच निरोगी राहण्यासाठी पुरेसं नाही. आहाराची गुणवत्ताही तेवढीच गरजेची असते.
आता डायबिटीस, हाय बीपी, हृदरोग आणि लठ्ठपणा केवळ श्रीमंतांचा आजार राहिलेला नाही. आधीच अनेक अडचणींमध्ये जीवन जगत असलेल्या गरीब लोकांना सुद्धा हे आजार होत आहेत. यावर उपाय हा नाही की ते किती खातात, तर यात आहे की, ते काय आणि कसं खातात.
का वाढताहेत हे आजार?
शहरातील मध्यमवर्गीय किंवा गरीब लोकांच्या आहारात पोषण कमी असतं. गरीब लोक कमी खातात, पण त्यांचा आहार संतुलित नसतो. ते जास्तकरून पांढरा भात, तळलेले पदार्थ, स्वस्त स्ट्रीट फूड खातात आणि गोड पेय पितात. त्यामुळे त्यांच्या आहारात फायबर, प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनरल्स नसतात. पण तेल, मीठ आणि खराब फॅट भरपूर असतं. त्यामुळे हळूहळू इन्सुलिनची कमतरता, पोटावर चरबी वाढणे, डायबिटीस, लठ्ठपणा आणि हाय बीपी हे आजार होतात.
तणाव, कामाचा थकवा आणि उपचारांची कमतरता
पैशांची कमतरता आणि चिंता यामुळे त्यांच्या शरीरात कार्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं. ज्यामुळे पोटावर चरबी वाढते आणि डायबिटीसची सुरूवात होऊ शकते. तसेच लोक ब्लड शुगर, बीपी, कोलेस्टेरॉलची टेस्टही करत नाहीत. एकतर सुविधा नाही किंवा त्यांना याबाबत माहिती नाही. आजाराची माहिती तेव्हा मिळते जेव्हा तो गंभीर स्थितीत असतो.
बालपणापासूनची कमजोरी
जी मुलं कमी वजनाची जन्माला येतात आणि जन्मापासून कुपोषित असतात, त्यांना सतत आजारांचा सामना करावा लागतो. जर अशी मुलं मोठी होऊन जास्त कार्बोहायड्रेट असलेला आहार घेत असतील, तर डायबिटीस आणि लठ्ठपणा लवकर वाढतो.