Lokmat Sakhi >Health >Pregnancy > False pregnancy : हे नेमकं असतं तरी काय ? गरोदर असल्याची खोटी लक्षणं दिसतात ? 

False pregnancy : हे नेमकं असतं तरी काय ? गरोदर असल्याची खोटी लक्षणं दिसतात ? 

गरोदर असल्याची सगळी लक्षणं जाणवूनही गरोदरपणा नसतोच ? ही काय नेमकी भानगड आहे ?  False pregnancy नावाचा प्रकार नेमका ओळखायचा तरी कसा, काय आहेत त्याची लक्षणं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 05:48 PM2021-07-11T17:48:30+5:302021-07-12T18:13:45+5:30

गरोदर असल्याची सगळी लक्षणं जाणवूनही गरोदरपणा नसतोच ? ही काय नेमकी भानगड आहे ?  False pregnancy नावाचा प्रकार नेमका ओळखायचा तरी कसा, काय आहेत त्याची लक्षणं ?

What is False or phantom pregnancy? What are the reasons and symptoms ? How to identify ? | False pregnancy : हे नेमकं असतं तरी काय ? गरोदर असल्याची खोटी लक्षणं दिसतात ? 

False pregnancy : हे नेमकं असतं तरी काय ? गरोदर असल्याची खोटी लक्षणं दिसतात ? 

Highlightsलवकरात लवकर प्रेग्नन्सी टेस्ट करून घेणे, हा यावरचा सगळ्यात चांगला उपाय आहे.False pregnancy चा त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांकडून लगेचच तपासणी करून घेणे गरजेचे आहे. 

पिरेड्स लांबले ?  सारखं मळमळतंय ? गरोदर बाईला जे जे काही होतं.. ती सगळी लक्षणं दिसू लागली की आपसूकच कोणत्याही महिलेला आपण गरोदर आहोत की काय असा प्रश्न पडू लागतो. पण ही लक्षणं दिसणं म्हणजे आपण गरोदरच आहोत, असं समजणं अनेकदा चुकीचही ठरू शकतं. यालाच False pregnancy असं म्हटलं जातं. आपण प्रेग्नंट नसून आपली लक्षणं False pregnancy ची आहेत, हे समजल्यावर अनेकींना प्रचंड मानसिक धक्काही बसतो. 

 

थोडक्यात सांगायचं म्हणजे गरोदर नसतानाही बाईला आपण गरोदरच आहोत, अशी सगळी शारीरिक लक्षणं जाणवायला लागणं म्हणजे False pregnancy. यामध्ये पाळी तर लांबली जातेच पण अनेक जणींना गरोदरपणाच्या सुरूवातीला जाणवतो तसा मॉर्निंग सिकनेसदेखील जाणवू लागतो. मळमळ होऊन उलट्याही होतात. गरगरायला लागतं, काही जणींच्या पोटाचा आकारही वाढतो तर काही जणींना चक्क बाळाची पोटात हालचाल होत आहे, असे वाटू लागते. गरोदरपणाच्या सुरूवातीच्या एक- दोन महिन्यात काही जणींचे स्तन दुखरे होऊन जातात. अगदी तसं देखील अनेकींना होऊ लागते. म्हणूनच तर खरीखुरी प्रेग्नन्सी आणि False pregnancy यातील फरक ओळखणं कधी कधी कठीण होऊन बसतं. 

 

False pregnancy ची लक्षणं
मासिक पाळी लांबणे
पोट मोठे दिसणे
स्तनांचा आकार वाढणे आणि ते दुखणे
स्तनाग्रांचा आकार बदलणे
गर्भाची हालचाल होत आहे, असे जाणवणे
नॉशिया आणि उलट्या होणे
वजन वाढणे
मॉर्निंग सिकनेस
भूक न लागणे

 

False pregnancy ची कारणे 
False pregnancy चा त्रास अनेक जणींना का होतो, याबाबत अजूनही संशोधनं सुरू आहेत. पण मानसिक अवस्था हे याचे कारण असावे, असा बहुतांश डॉक्टरांचा कयास आहे. डॉक्टरांनी खालील कारणांमुळे महिलांना False pregnancy चा त्रास होऊ शकतो, असे सांगितले आहे.

 

१. ज्या महिलांना बाळ हवे आहे, पण खूप प्रयत्न करूनही गर्भ राहत नाही, अशा महिलांना False pregnancy चा त्रास जाणवतो.
२. ज्या महिलांचे नुकतेच ॲबोर्शन झाले आहे, अशा महिलांनाही False pregnancy जाणवू शकते.
३. गरोदर असणे ही प्रत्येकीसाठीच प्रत्येकवेळी आनंददायी बाब असू शकत नाही. ज्या महिलांना प्रेगन्सी नको आहे, ज्यांनी प्रेग्नन्सीचा धसका घेतला आहे, अशा महिलाही या त्रासातून जातात. 

 

Web Title: What is False or phantom pregnancy? What are the reasons and symptoms ? How to identify ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.