Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Remedies or Constipation : जरा खाण्यात बदल झाला की पोट साफ होत नाही? डॉक्टरांनी सुचवलेले हे उपाय करा अन् पोटभर खा

Remedies or Constipation : जरा खाण्यात बदल झाला की पोट साफ होत नाही? डॉक्टरांनी सुचवलेले हे उपाय करा अन् पोटभर खा

Remedies For Constipation : झोपेताना एक कप गरम दुधात एक किंवा दोन चमचे तूप घेणे देखील बद्धकोष्ठतेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. गरम दुधात तूप मिसळून प्यायल्याने पोट साफ होतेच पण इतरही अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 12:20 PM2021-10-26T12:20:01+5:302021-10-26T12:28:32+5:30

Remedies For Constipation : झोपेताना एक कप गरम दुधात एक किंवा दोन चमचे तूप घेणे देखील बद्धकोष्ठतेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. गरम दुधात तूप मिसळून प्यायल्याने पोट साफ होतेच पण इतरही अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

Remedies For Constipation : Ayurveda expert explains 5 tips to have regular bowel movement in morning | Remedies or Constipation : जरा खाण्यात बदल झाला की पोट साफ होत नाही? डॉक्टरांनी सुचवलेले हे उपाय करा अन् पोटभर खा

Remedies or Constipation : जरा खाण्यात बदल झाला की पोट साफ होत नाही? डॉक्टरांनी सुचवलेले हे उपाय करा अन् पोटभर खा

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्याच्या सवयी फारच बिघडल्या आहेत. काही लोक जेवण वेळेवर करत नाहीत, तर काही लोक सतत खात राहतात. खूप लोक वेळेअभावी तर काहीजण जीभेचे चोचले पुरवण्यासाठी बाहेरचं खातात याचा त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतोना दिसून येतो.  खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकदा लोकांची पचनक्रिया बिघडते आणि बद्धकोष्ठता, पोटदुखी, मळमळ आणि उलट्या यांसारख्या समस्या त्यांना घेरतात. पोटाशी संबंधित अशा सामान्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर आयुर्वेद डॉ. नितिका कोहली यांनी इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पोट लवकर साफ करण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत, ज्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

अंजीर

कोमट पाण्यात भिजवलेल्या अंजीराचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून त्वरित आराम मिळतो. डॉक्टर नितिका कोहलीही अंजीर खाण्याचा सल्ला देतात. अंजीरामध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे अनेक आरोग्य तज्ञ बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी त्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

ज्येष्ठमध

ही एक प्रभावी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी पचनशक्ती वाढवते. याचे सेवन करण्यासाठी अर्धा चमचा लिकोरिस पावडर अर्धा चमचा गूळ मिसळून एक कप कोमट पाण्यासोबत सेवन करा. ज्येष्ठमध आतड्यांमधून आणि पोटातून मल साफ करण्यासाठी ओळखली जाते आणि म्हणून बद्धकोष्ठता बरी करण्यासाठी घरगुती उपाय  वापरला जातो.

भरपूर पाणी प्या

शरीरात पाण्याची कमतरता हे बद्धकोष्ठतेचे एक प्रमुख कारण आहे. दररोज पुरेसे पाणी पिऊन किंवा शरीर हायड्रेट ठेवून पोट निरोगी ठेवता येते. डॉ. कोहलीच्या मते पुरेशा प्रमाणात पाणी पिणे हा बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे.

दलिया

यात प्रथिने आणि फायबरसोबतच इतर अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आढळतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर करण्यात खूप मदत होते. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.

दूध

झोपेताना एक कप गरम दुधात एक किंवा दोन चमचे तूप घेणे देखील बद्धकोष्ठतेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. गरम दुधात तूप मिसळून प्यायल्याने पोट साफ होतेच पण इतरही अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. या पोस्टच्या शेवटी डॉ. कोहली लिहितात की, आयुर्वेदिक डॉक्टरांचा नियमित सल्ला घेणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Web Title: Remedies For Constipation : Ayurveda expert explains 5 tips to have regular bowel movement in morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.