Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > झोपेसंदर्भात 'ही' एक चूक पडते महागात, वाढतोय तरुणांमध्येही टाइप-२ डायबिटीसचा धोका

झोपेसंदर्भात 'ही' एक चूक पडते महागात, वाढतोय तरुणांमध्येही टाइप-२ डायबिटीसचा धोका

Diabetes : जर तुम्ही पुरेशी झोत घेत नसाल किंवा जास्त वेळ जागत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:42 IST2025-06-18T14:29:23+5:302025-06-18T19:42:51+5:30

Diabetes : जर तुम्ही पुरेशी झोत घेत नसाल किंवा जास्त वेळ जागत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

New research claims irregular sleep pattern increases type 2 diabetes risk | झोपेसंदर्भात 'ही' एक चूक पडते महागात, वाढतोय तरुणांमध्येही टाइप-२ डायबिटीसचा धोका

झोपेसंदर्भात 'ही' एक चूक पडते महागात, वाढतोय तरुणांमध्येही टाइप-२ डायबिटीसचा धोका

Sleep Pattern Health Risk : झोप आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाची असते हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पुरेशी झोप घेणं एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी महत्वाची आहे. म्हणूनच एक्सपर्ट नेहमीच रोज किमान ७ ते ८ तासांची झोप घेण्याचा सल्ला देतात. पण जर तुम्ही पुरेशी झोत घेत नसाल किंवा जास्त वेळ जागत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

अलिकडेच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, नियमित आणि पुरेशी झोप घेतल्यास टाइप २ डायबिटीसचा (Type 2 Diabetes) धोका टाळता येऊ शकतो. पण फक्त ७ ते ८ तास झोपणंच नाही तर झोपेचा पॅटर्न आणि नियमितता महत्वाची ठरते.

अमेरिकेत करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, नियमित आणि पुरेशी झोप न घेणाऱ्या लोकांना टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका अधिक असतो. बोस्टनच्या ब्रिघम आणि महिला हॉस्पिटलच्या अभ्यासकांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये सात रात्रीदरम्यान झोपेच्या पॅटर्नचं निरीक्षण करण्यात आलं आणि सात वर्षापासून रिसर्चमध्ये सहभागी लोकांच्या स्लीप पॅटर्नचा अभ्यास करण्यात आला.

अभ्यासकांना आढळलं की, अनियमित झोपेमुळे लोकांमध्ये डायबिटीसचा धोका अधिक वाढतो. ज्या लोकांच्या झोपेचा पॅटर्न सगळ्यात जास्त अनियमित होता, त्या लोकांमध्ये डायबिटीसचा धोका इतरांच्या तुलनेत ३४ टक्के जास्त होता. लोकांमध्ये नियमित पॅटर्न म्हणजे ज्यात तुमच्या झोपण्याची आणि जागण्याची वेळ रोज एकच असते. रिसर्चमध्ये आढळून आलं की, जर लोकांच्या झोपेचा पॅटर्न नियमित राहिला तर त्यांना टाइप-२ डायबिटीसचा धोका खूप कमी राहतो.

टाइप २ डायबिटीसनं जगभरात साधारण अर्धा अब्ज लोक प्रभावित आहेत. हा आजार मृत्यू आणि अपंगत्वाच्या टॉप १० मुख्य कारणांपैकी एक आहे. २०५० पर्यंत टाइप २ डायबिटीसनं पीडित लोकांची संख्या दुप्पटपेक्षा जास्त होऊन १.३ अब्ज होण्याचा अंदाज आहे.

Web Title: New research claims irregular sleep pattern increases type 2 diabetes risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.