थंडी, धूळ, प्रदूषण आणि सततचा ताण या सगळ्यांचा परिणाम आपल्या श्वसनावर, शरीरावर सहज होतो. अशा वेळी एक छोटा, साधा उपाय अनेकांना आराम देतो तो म्हणजे रुमालात थोडा कापूर ठेवून फिरणे. कापूर हे भारतीय संस्कृतीतील अत्यंत परिचित आणि उपयोगी घटक आहे. (Keep a small piece of camphor in a handkerchief - not only oxygen will increase, but you will also get 'these' benefits)त्याचा सुगंध जसा ताजेतवाना करतो, तसाच त्याचा आरोग्यावरही सूक्ष्म आणि सकारात्मक परिणाम होतो.
कापूराचा सुगंध हवेत क्षणात पसरतो आणि श्वसनमार्ग स्वच्छ करतो. नाक बंद होण्याची प्रवृत्ती, धूळ किंवा थंड वाऱ्यामुळे होणारी जडत्वाची भावना कमी करण्यासाठी हा सुगंध सौम्यपणे मदत करतो. दिवसभर बाहेर फिरताना किंवा प्रवास करताना कापूराचा तुकडा जवळ असणे म्हणजे वातावरणातील घाणेरडे वास, धूर कमी करणारा छोटासा आधार. काही लोकांना थकवा जाणवला, अचानक चक्कर आली किंवा मनावर ताण आला तरही कापूराचा तीव्र पण स्वच्छ सुगंध सहज उभारी देतो. त्यामुळे रुमालात ठेवलेला कापूर हा एक प्रकारे मानसिक आणि श्वसनात्मक दोन्ही बाजूंनी फायदा देतो. श्वसनासाठी कापूर फार उपयुक्त असतो.
कापूर हा नैसर्गिकरित्या जंतुनाशक गुणांनी परिपूर्ण आहे. तो सहज हवेत पसरतो, त्यामुळे त्याचे कण हवेतील सूक्ष्म कीटक आणि दुर्गंधींवर परिणाम करतात. याच कारणामुळे घरात, देवघरात किंवा मुलांच्या खोलीत कापूर ठेवण्याची किंवा जाळण्याची परंपरा आहे. त्यातून मिळणारा सुगंध वातावरण शुद्ध करतो आणि घरात एक सकारात्मक, शांत ऊर्जा निर्माण करतो. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कापूर कफ-नाशक मानला जातो. त्याची थंड आणि स्वच्छ करणारी प्रवृत्ती मनातील ताण कमी करते, एकाग्रता वाढवते आणि बेचैनीवर नियंत्रण आणते.
दैनंदिन आयुष्यात कापूराची उपयुक्तता अनेक प्रकारे दिसते. सर्दी-खोकल्याच्या त्रासापासूनही कापूर आराम देतो. ज्यामुळे कफ सुटतो आणि श्वास घेणे सोपे होते. काही जण घरात कापूर जाळून हवेतली ओलसर दुर्गंधी दूर करतात आणि कीटकांना दूर ठेवतात. स्नायूंमध्ये वेदना असेल तर कापूरयुक्त तेलाचा सौम्य मसाज आराम देतो. कापराचे तेल डोक्याला लावणे आरामदायी असते. तसेच लहान मुलांच्या डोक्यातील उवा कमी करण्यासाठी हे तेल एकदम उपयुक्त ठरते.
