हिवाळा आला की शरीराची गती मंदावते, भूक वाढते, पचनशक्ती कमी होते. या ऋतूमध्ये आपण पाणी देखील कमी प्रमाणात पितो.(Wheat flour remedy) ज्यामुळे पोट सतत जड वाटणे, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. सकाळी कितीही कोमट पाणी प्या, व्यायाम केला तरी देखील पोट काही पूर्णपणे स्वच्छ होत नाही. दिवसभर अंगात आळस शिरल्यासारखा वाटतो, जडपणा जाणवतो, कामात लक्ष लागत नाही ज्यामुळे आपली चिडचिड देखील वाढते.(Constipation home remedy) पण आपल्या रोजच्या जेवणात असणारे गव्हाचे पीठ यावर फायदेशीर ठरु शकते. (Natural digestion tips) प्रसिद्ध योगतज्ज्ञ हंसा योगेंद्र म्हणतात आई- आजीच्या काळात स्वयंपाकघरात काही घटक रोज वापरले जायचे. इतकेच नाही तर आपला आहार इतका बिघडत चालला की शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण मिळत नाही.(Morning constipation solution) ज्यामुळे शारीरिक समस्या उद्भवत नाही तर मानसिक थकवा, ताण आणि अशक्तपणा देखील येतो. प्रक्रिया केलेले अन्न, बाहेरचं खाणे आणि बदलेली जीवनशैली यामुळे पौष्टिकतेची कमतरता जाणवते.(Stomach cleansing tips) म्हणून आहारात नैसर्गिक, घरगुती आणि भरपूर फायबर असणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा. जर आपल्यालाही पोटाचे विकार असतील तर गव्हाच्या पिठात काही पदार्थ कालवून त्याची चपाती खाल्ल्यास फायदा होईल.
1. काळी मिरी ही थोडी कडू आणि किंचित तिखट असते. हे गव्हाच्या पिठात मिसळून खाल्ल्याने आपल्या पचनाच्या समस्यांवर उपायकारक ठरु शकतात. तसेच गॅस, अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्यांपासून आराम मिळतो. रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. गव्हाच्या पिठात अर्धा चमचा काळी मिरी, दही मिसळून याची चपाती खाऊ शकता.
2. राजस्थानची जंगली लहान काकडी जिला कचरी असं म्हटलं जातं. याला सुकवून त्याची पावडर तयार केली जाते. याची चव किंचित आंबट- तिखट असते. याचे सेवन केल्याने पचन लवकर होते. ब्लोटिंग किंवा गॅसेसची समस्या देखील कमी होते. बाजरी किंवा ज्वारीच्या पिठात अर्धा चमचा हा पावडर टाकून त्याची भाकरी खायला हवी.
3. काश्मीर आणि हिमाचलच्या डोंगरात मिळणारा पदार्थ वाईल्ड मशरुम. ज्याला गुच्छी मशरुम असं ही म्हणतात. यामध्ये अनेक पोषकतत्व आणि फायबर असते. जसं की व्हिटॅमिन बी१, २, ३ तसेच लोह, कॉपर, पोटॅशियम देखील असते. गव्हाच्या पीठात चमचाभर पावडर मिसळून चपाती खाल्ल्याने स्नायू आणि मेंदूला पोषण मिळते. पोट देखील साफ होण्यास मदत होते.
4. ईशान्य भारतात पूर्वीपासून मिळत असलेला पारंपरिक आंबवलेला पदार्थ बांबूचे कोंब. याची चव तिखट आणि किंचित आंबट असते. यात नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात. जे आपल्या आतड्यांना स्वच्छ करतात. पोटफुगी, गॅससारखी लक्षणे कमी होतात. गव्हाच्या पीठात १ चमचा बाबूंच्या कोंबाची पावडर घाला. त्यात मीठ, तीळाचे तेल आणि कोमट पाणी घालून कणिक मळा. याची चपाती खाल्ल्याने वजन तर कमी होते तसेच पोटाच्या अनेक तक्रारी दूर होतात.
Web Summary : Winter slows digestion, causing bloating and constipation. Adding black pepper, Kachari powder, Gucchi mushroom powder, or bamboo shoot powder to wheat flour aids digestion and relieves discomfort. These natural remedies promote gut health and overall well-being.
Web Summary : सर्दी पाचन को धीमा कर देती है, जिससे सूजन और कब्ज होता है। गेहूं के आटे में काली मिर्च, कचरी पाउडर, गुच्छी मशरूम पाउडर या बांस शूट पाउडर मिलाने से पाचन में मदद मिलती है और परेशानी से राहत मिलती है। ये प्राकृतिक उपचार आंत के स्वास्थ्य और समग्र कल्याण को बढ़ावा देते हैं।