Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दिवसभरात किती वेळा लघवी लागणं उत्तम आरोग्याचं लक्षण, जास्त किंवा कमी वेळा जात असाल तर..

दिवसभरात किती वेळा लघवी लागणं उत्तम आरोग्याचं लक्षण, जास्त किंवा कमी वेळा जात असाल तर..

Health Tips : तुम्हाला माहीत आहे का की, जास्त किंवा कमी लघवी येणं एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:46 IST2025-06-18T11:15:38+5:302025-06-19T14:46:31+5:30

Health Tips : तुम्हाला माहीत आहे का की, जास्त किंवा कमी लघवी येणं एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं? 

How many times is it normal to urinate in a day what diseases can less or more urine indicate | दिवसभरात किती वेळा लघवी लागणं उत्तम आरोग्याचं लक्षण, जास्त किंवा कमी वेळा जात असाल तर..

दिवसभरात किती वेळा लघवी लागणं उत्तम आरोग्याचं लक्षण, जास्त किंवा कमी वेळा जात असाल तर..

Health Tips : लघवी करणं आपल्या शरीरातील एक महत्वाची क्रिया आहे. लघवीच्या माध्यमातून शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहतं. पण तुम्हाला माहीत आहे का की, जास्त किंवा कमी लघवी येणं एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं? तेच आपण जाणून घेणार आहोत.

दिवसातून किती वेळा लघवी करता?

जागरण डॉट कॉमला डॉ. भानु मिश्रा यांनी सांगितलं की, दिवसभरातून किती वेळा लघवी करणं सामान्य मानलं जातं, हे व्यक्तीचं वय, पाणी पिण्याचं प्रमाण, फिजिकल अ‍ॅक्टिविटी आणि आरोग्यावर अवलंबून असतं. सामान्यपणे एका हेल्दी व्यक्तीला दिवसातून ६ ते ८ वेळा लघवी लागणं सामान्य आहे. तेच काही लोकांसाठी ही संख्या ४ ते १० दरम्यान असणं सामान्य असू शकतं. तेही जर त्यांना काहीच समस्या होत नसेल तरच.

गंभीर आजाराचा संकेत

जर फार जास्त वेळ जसे की, दिवसातून १० पेक्षा जास्त वेळ किंवा रात्री पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागत असेल तर हा आरोग्यासंबंधी काही समस्यांचा संकेत असू शकतो. डॉक्टर सांगतात की, पुन्हा पुन्हा लघवी येण्याच्या मुख्य कारणांमध्ये डायबिटीस, यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन(UTI) ओव्हरअॅक्टिव ब्लॅडर सिंड्रोम, प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढ(पुरूषांमध्ये) किंवा जास्त कॅफीन-लिक्विड इनटेक करणं यांचा समावेश आहे.

तेच फार कमी लघवी येणं म्हणजे दिवसभरातून ३ पेक्षा कमी वेळ लघवी लागणं किंवा लघवीमध्ये अडथळा होणं डिहायड्रेशन, किडनी फेलिअर, यूरिनरी ब्लॉकेज किंवा एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट असण्याचा संकेत असू शकतो. जर लघवी करताना जळजळ होत असेल, वेदना होत असेल, रक्त येत अशेल किंवा दुर्गंधी येत असेल तर हा इन्फेक्शन किंवा एखाद्या गंभीर आजाराचा संकेत असू शकतो.

लघवीचा रंग आरोग्याबाबत काय सांगतो?

लघवीचा रंग सुद्धा आरोग्याबाबत संकेत देतो. डॉक्टर सांगतात की, लघवीचा हलका पिवळा रंग सामान्य आहे. पण रंग गर्द पिवळा झाला असेल किंवा रक्त येत असेल तर हा गंभीर समस्या असल्याचा संकेत असू शकतो. त्यामुळे जर लघवीच्या प्रमाणात, रंगात, गंधात किंवा संख्येत काही असामान्य वाटत असेल तर लगेच डॉक्टरांना भेटा. लघवीसंबंधी या गोष्टी आपल्या किडनी आणि एकंदर आरोग्याबाबत खूप काही सांगतात. 
 

Web Title: How many times is it normal to urinate in a day what diseases can less or more urine indicate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.