Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पूजेची भांडी वर्षानुवर्ष स्वच्छ, चकचकीत राहण्यासाठी काय कराल? वापरानंतर 'अशी' घ्या काळजी

पूजेची भांडी वर्षानुवर्ष स्वच्छ, चकचकीत राहण्यासाठी काय कराल? वापरानंतर 'अशी' घ्या काळजी

How to clean pooja utensils : या भांड्यावरचे डाग व्यवस्थित काढले गेले नाही तर ते तसेच राहून जातात. म्हणून भांडी नीट व्यवस्थित स्वच्छ करणं आणि स्वच्छ जागेवर ठेवणं महत्वाचं असतं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 05:24 PM2021-09-13T17:24:43+5:302021-09-13T17:31:46+5:30

How to clean pooja utensils : या भांड्यावरचे डाग व्यवस्थित काढले गेले नाही तर ते तसेच राहून जातात. म्हणून भांडी नीट व्यवस्थित स्वच्छ करणं आणि स्वच्छ जागेवर ठेवणं महत्वाचं असतं. 

How to clean pooja utensils : Easy tips for clean pooja utensils | पूजेची भांडी वर्षानुवर्ष स्वच्छ, चकचकीत राहण्यासाठी काय कराल? वापरानंतर 'अशी' घ्या काळजी

पूजेची भांडी वर्षानुवर्ष स्वच्छ, चकचकीत राहण्यासाठी काय कराल? वापरानंतर 'अशी' घ्या काळजी

Highlightsपूजा करताना कळस, ताम्हण ही भांडी वारंवार वपरली जातात. हळद, कुंकू, दूध आणि पाण्याचे डाग यावेळी या भांड्यावर  लागतात. अशावेळी ही भांडी अशीच ठेवून देता येत नाहीत.

सण उत्सव म्हटलं की, तांब्या पितळाची पूजेची, नैवेद्याची भांडी आलीच. गणपतीच्या दिवसात पितळाच्या समया, ताम्हण इतर भांडी वापरासाठी काढली जातात. वापर झाल्यानंतर पुन्हा ही भांडी लांब ठेवून दिली जातात. , पूजेची भांडी नेमकी कशी ठेवावी हे  अनेकांना कळत कळत नाही. या भांड्यावरचे डाग व्यवस्थित काढले गेले नाही तर ते तसेच राहून जातात. म्हणून भांडी नीट व्यवस्थित स्वच्छ करणं आणि स्वच्छ जागेवर ठेवणं महत्वाचं असतं. 

धुण्याची पद्धत

पूजा करताना कळस, ताम्हण ही भांडी वारंवार वपरली जातात. हळद, कुंकू, दूध आणि पाण्याचे डाग यावेळी या भांड्यावर  लागतात. अशावेळी ही भांडी अशीच ठेवून देता येत नाहीत. म्हणून वापर झाल्यानंतर कोलगेट पावडर किंवा पितांबरी वापरून तुम्ही ही भांडी स्वच्छ करा.  कोरडी  झाल्यानंतर एका जाड प्लास्टीकची पिशवी वापरून मगच ही भांडी व्यवस्थित ठेवा.

बेकिंग सोडा

पूजेची भांडी स्वच्छ करण्यासाठी एक लिटरभर पाणी घेऊन त्यात साधारण एक मोठा चमचा बेकिंग सोडा घाला. त्यात अ‍ॅल्युमिनिअम फॉईलचा गोळा घालून पाणी उकळून घ्या. उकळलेल्या पाण्यात 10 सेकंद ठेवा आणि चांदीची भांडी काढून स्वच्छ करून घ्या.

प्लास्टीकच्या डब्याचा वापर

तांब्या, पितळाची भांडी स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्ही ती हवाबंद डब्यात ठेवू शकता. खोलगट प्लास्टिकचा डबा पूजेची भांडी ठेवण्यासाठी मस्त पर्याय आहे. हे प्लास्टीकचे डबे तुम्ही हवं तर मोठ्या स्टिलच्या डब्यात एकावर एक  ठेवू शकता. जेणेकरून आतील भांडी वर्षानुवर्ष चांगली राहतील.

1) पितळाची भांडी स्वच्छ करण्यासाठी, नवीन स्कॉच ब्राईट घ्या आणि त्यात डिटर्जंट पावडरसह भांडी कोरडी घासून घ्या. मग भांडी चमकू लागल्यावर पाण्याने धुवा.

2) पितळ आणि तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चिंचेचा वापर करू शकता. यासाठी चिंच भिजवून लगदा बनवा. आता या लगद्याने घासून भांडे स्वच्छ करा. मग स्क्रबरने घासल्यानंतर भांडी स्वच्छ पाण्याने धुवा.

3) आपण मीठाच्या पाण्याने देखील ही भांडी स्वच्छ करू शकता. यासाठी कापलेल्या लिंबावर मीठ टाका आणि भांडी घासून घ्या. याशिवाय कोणत्याही टूथपेस्टने भांडीही चमकू लागतात. पेस्ट भांड्यांना लावून ठेवा. थोड्यावेळाने स्क्रबरने घासून स्वच्छ धुवा.

Web Title: How to clean pooja utensils : Easy tips for clean pooja utensils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.