lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कोरड्या खोकल्यामुळे परेशान? उघडा आजीबाईचा बटवा, करून पाहा ५ उपाय

कोरड्या खोकल्यामुळे परेशान? उघडा आजीबाईचा बटवा, करून पाहा ५ उपाय

Home remedies for dry cough: सर्दी ४- ५ दिवसांत बरी होते, पण कोरडा खोकला मात्र अजिबात पाठ सोडत नाही... सततच्या खोकल्यामुळे वैताग आला असेल, तर करून बघा हे घरगुती उपाय (home hacks)..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 06:17 PM2021-12-07T18:17:16+5:302021-12-07T18:18:17+5:30

Home remedies for dry cough: सर्दी ४- ५ दिवसांत बरी होते, पण कोरडा खोकला मात्र अजिबात पाठ सोडत नाही... सततच्या खोकल्यामुळे वैताग आला असेल, तर करून बघा हे घरगुती उपाय (home hacks)..

Home remedies for dry cough, best 5 home hacks | कोरड्या खोकल्यामुळे परेशान? उघडा आजीबाईचा बटवा, करून पाहा ५ उपाय

कोरड्या खोकल्यामुळे परेशान? उघडा आजीबाईचा बटवा, करून पाहा ५ उपाय

Highlightsवारंवार खोकल्याचा त्रास होत असेल, जुना कोरडा खोकला सारखा- सारखा उफाळून येत असेल, तर सरळ काही दिवस हे काही घरगुती उपाय करून बघा.

हिवाळा (winter) आला की आपल्या सोबत सर्दी, खोकला, सटासट शिंका, सकाळच्या वेळी नाक गळणे आणि डोकेदुखी असे अनेक आजार सोबत घेऊन येतो. या आजारांपासून स्वत:ला आणि कुटूंबाला सुरक्षित ठेवणं ही घरातल्या महिलांची मोठी जबाबदारी.. पण सगळी काळजी घेऊन घरातल्या एखाद्या सदस्याला सर्दी होतेच आणि मग तिचा संसर्ग हळूहळू पसरत सगळ्या कुटूंबालाच घेरून टाकतो. अनेक जणांच्या बाबतीत असंही होतं की सर्दी, शिंका हा त्रास ३ ते ४ दिवस होतो आणि नंतर थांबतो. पण खोकला (Home remedies for dry cough in marathi) मात्र जाता जात नाही. 

 

खोकला जावा म्हणून अनेक उपाय आपण करून बघतो, अनेक दवाखाने पालथे टाकून औषधीही घेतो. पण अधूनमधून खोकला उफाळून येतो आणि चांगले भरपूर दिवस राहतो. प्रत्येकवेळी डॉक्टरकडे जाणं किंवा औषधी, गोळ्या घेणंही जिवावर येतं. म्हणूनच तुम्हाला जर असा वारंवार खोकल्याचा त्रास होत असेल, जुना कोरडा खोकला सारखा- सारखा उफाळून येत असेल, तर सरळ काही दिवस हे काही घरगुती उपाय करून बघा. हे उपाय करूनही जर खोकला थांबला नाही, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.

 

कोरड्या खोकल्यावर करून बघा हे घरगुती उपाय 
Home remedies for dry cough
१. अद्रक आणि मीठ
 (ginger and salt)
अद्रक खाणे थंडीच्या दिवसांमध्ये खूपच आरोग्यदायी ठरते. फक्त ते योग्य पद्धतीने खाल्ले गेले पाहिजे. कोरडा खोकला घालविण्यासाठीही अद्रक खूपच उपयुक्त ठरते कारण त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टी मायक्रोबियल आणि ॲण्टी इंफ्लामेटरी गुण असतात. खोकला बरा होण्यासाठी अद्रक खाणार असाल तर अद्रकाचा एक तुकडा बारीच ठेचून घ्या. त्यात एक चुटकीभर मीठ टाका. त्याची गोळी बनवा आणि ती पाच मिनिटे तोंडात ठेवा. त्याला जे पाणी सुटेल ते गिळून घ्या. ५ मिनिटांनी ही गोळी गिळली तरी चालेल किंवा काढून टाकली तरी चालेल. 

 

२. मध (honey)
खूप जुन्या काळापासून मधाचा वापर खोकला घालविण्यासाठी केला जातो. घशातलं इन्फेक्शन दूर करण्यासाठी मध उपयुक्त ठरतो. हा उपाय करण्यासाठी अर्धा ग्लास गरम पाणी घ्या. यामध्ये दोन टेबल स्पून मध टाका आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. काही दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास नक्कीच खोकला जातो. याशिवाय मध आणि ४ ते ५ काळ्या मिऱ्यांची पावडर असं मिश्रण एकत्र करूनही त्याचं चाटण घ्यावं. ते देखील खोकल्यासाठी उपयुक्त ठरतं.

३. ज्येष्ठमध (Liquorice or licorice)
मधाप्रमाणेच ज्येष्ठमध देखील खोकल्यावरचा प्रभावी उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्ही जेष्ठमधाची काडी नियमितपणे चाेखू शकता. किंवा मध आणि ज्येष्ठमध यांचं चाटण घेऊ शकता. हे चाटण तयार करण्यासाठी एक टेबलस्पून मध घ्या. त्यामध्ये २ टीस्पून ज्येष्ठमधाची पावडर टाका. हे चाटण गिळून घ्या. 

 

४. पुदिना आणि तुळस (pudina and tulsi)
या दोन्ही गोष्टी खोकला घालविण्यासाठी उपयुक्त आहेत. यासाठी १० ते १५ पुदिन्याची पानं घ्या. त्यामध्ये तेवढीच तुळशीची पानं टाका. एक ग्लासभर पाण्यात पाने चांगली उकळू द्या. पाणी उकळून अर्धा ग्लास झालं की त्यात गुळाचा मध्यम आकाराचा खडा टाका आणि हा काढा गरम गरम पिऊन घ्या. रोज रात्री काही दिवस हा काढा नियमित घेतला तर नक्कीच खोकला बरा होईल. 

५. लवंग आणि मध (cloves and honey)
खोकला आल्यावर नुसती लवंग खाण्यापेक्षा लवंग आणि मध हे मिश्रण एकत्र करा आणि त्याचं चाटण घ्या. हा उपाय करण्यासाठी लवंग चांगल्या भाजून घ्या. लवंग भाजण्यासाठी त्या थेट गॅसच्या बर्नरवर ठेवा आणि गॅस पेटवा. अवघ्या ५- ६ सेकंदात लवंग चांगल्या भाजल्या जातात. त्यानंतर या लवंगा हातानेच थोड्या जाड्याभरड्या चुरून घ्या. त्यात थोडा मध टाका आणि हे चाटन चाऊन चाऊन खा.

 

Web Title: Home remedies for dry cough, best 5 home hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.