घरातले टॉयलेट- बाथरुम स्वच्छ करणं हे जवळपास अंगवळणी पडलेलं काम. कारण काही घरात अगदी रोजच तर काही घरात आठवड्यातून ३ ते ४ वेळा टॉयलेट बाथरुम स्वच्छ केलेच जातात. हे काम आपण नेहमीच करतो म्हणूनच कधी कधी ते करताना आपल्याकडून काही बाबतीत दुर्लक्ष होऊ शकतं आणि तेच नेमकं जिवावर बेतणारं ठरू शकतं. असंच एक प्रकरण नुकतंच दिल्ली येथे झालं असून ती चूक अगदी कोणाकडूनही सहज होऊ शकते. ती चूक नेमकी कोणती आणि टॉयलेट, बाथरुम स्वच्छ करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते पाहूया..(Doctor warns about the use of toilet cleaner liquid)
टॉयलेट बाथरुम स्वच्छ करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी?
प्रत्येकाचाच हा प्रयत्न असतो की आपल्या घरातलं टॉयलेट- बाथरुम अगदी स्वच्छ, चकाचक असावं. त्यावर कोणतेही डाग नको. त्यामुळे मग ते स्वच्छ करण्याच्या नादात आपण कित्येक महागडे टॉयलेट क्लिनर आणतो.
केस गळणं थांबविणारी चायनिज थेरपी- चिनी लोकांचे केस काळेभोर, सिल्की असतात, कारण.....
डॉ. अंकित भाटिया यांनी टाईम्स ग्रुपला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे आलेल्या रुग्णाने टॉयलेट जास्त स्वच्छ करण्यासाठी त्याच्याकडे असणारे दोन वेगवेगळ्या प्रकारचे टॉयलेट क्लिनर एकत्र केले. यापैकी एकामध्ये ॲसिड होतं, तर दुसऱ्यामध्ये ब्लीच कंटेट जास्त होता. जेव्हा हे दोन्ही लिक्विड एकत्र झाले तेव्हा त्यांची रिॲक्शन झाली आणि त्यातून भलतेच केमिकल तयार झाले. या केमिकलमधून आलेल्या वाफ श्वासोच्छवासावाटे त्यांच्या शरीरात गेल्या.
त्यामुळे त्यांना छातीत जळजळ व्हायला लागली, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यामुळे ते बेशुद्ध पडले. त्यामुळेच डॉक्टर सांगतात की अशा पद्धतीची चूक कधीच करू नका. या घटनेमध्ये जर रुग्णाला वेळीच औषधोपचार मिळाले नसते तर कदाचित त्याला जीव गमवावा लागला असता.
High Neck ब्लाऊजचे ९ सुंदर प्रकार! हिवाळ्यातल्या लग्नसराईसाठी असं स्टायलिश ब्लाऊज आपल्याकडे हवंच...
त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे टॉयलेट क्लिनर कधीच एकत्र करू नका. टॉयलेट स्वच्छ करत असताना तिथली खिडकी, दार उघडं ठेवा. शक्यतो एक्झॉस्ट पंखाही सुरू ठेवा. टॉयलेट क्लिनिंग करताना सक्तीने मास्क आणि हॅण्ड ग्लोव्ह्ज वापरा. टॉयलेट क्लिनरवर लिहिलेल्या सुचना पुर्णपणे वाचा आणि त्या तंतोतंत पाळा.
