Lokmat Sakhi >Health > स्मृती इराणींच्या वेटलॉस काढ्याची व्हायरल चर्चा, काढा प्या नि वजन घटवा, हे इतके सोपे असते का ?

स्मृती इराणींच्या वेटलॉस काढ्याची व्हायरल चर्चा, काढा प्या नि वजन घटवा, हे इतके सोपे असते का ?

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे काही फोटो नुकतेच सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्यांचे वजन कमालीचे कमी झाले आहे. ही नेमकी कोणती जादू आहे, जी स्मृती इराणी यांना सापडली आणि त्यांचे वेटलॉस होऊ शकले?, याबाबत सध्या महिलांमध्ये प्रचंड कुजबूज सुरू असून 'काढा' हे या वेटलॉसचे टॉप सिक्रेट आहे, असेही बोलले जात आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 06:05 PM2021-06-20T18:05:53+5:302021-06-20T18:12:22+5:30

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे काही फोटो नुकतेच सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्यांचे वजन कमालीचे कमी झाले आहे. ही नेमकी कोणती जादू आहे, जी स्मृती इराणी यांना सापडली आणि त्यांचे वेटलॉस होऊ शकले?, याबाबत सध्या महिलांमध्ये प्रचंड कुजबूज सुरू असून 'काढा' हे या वेटलॉसचे टॉप सिक्रेट आहे, असेही बोलले जात आहे.

Kadha is the secret of Smruti Irani's weight loss | स्मृती इराणींच्या वेटलॉस काढ्याची व्हायरल चर्चा, काढा प्या नि वजन घटवा, हे इतके सोपे असते का ?

स्मृती इराणींच्या वेटलॉस काढ्याची व्हायरल चर्चा, काढा प्या नि वजन घटवा, हे इतके सोपे असते का ?

Highlightsवजन कमी करण्यासाठी एकीकडे काढा पिण्याचा उपाय करायचा आणि दुसरीकडे जंक फुड खायचे, असे करून जमणार नाही. खाण्यावर नियंत्रण ठेवा, पौष्टिक व सकस आहार घ्या, नियमितपणे व्यायाम करा, दररोज पुरेसे पाणी प्या, असेही डॉक्टर सांगत आहेत.

स्मृती इराणी यांचा अभिनेत्री ते केंद्रीय मंत्री हा प्रवास खरोखरच लक्षवेधी आहे. 'तुलसी'च्या भुमिकेत अगदी स्लीम ट्रीम असणाऱ्या स्मृती इराणी आजही अनेकांच्या लक्षात आहेत. काही दिवसांपुर्वीच ॲन्कर मनिष पॉल यांनी स्मृती इराणी यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो मनिष यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केले आहेत.
या फोटोमध्ये मनिष यांच्या हातात एक काढा असलेला एक कप दिसत आहेत आणि बाजूलाच स्मृती इराणी यादेखील बसलेल्या आहेत. या फोटोमध्ये असणारी वैशिष्ट्यपुर्ण बाब म्हणजे यामध्ये स्मृती इराणी यांचेे वजन खूपच कमी झालेले दिसत आहे. वजन कमी झाल्यामुळे साहजिकच त्या पहिल्यापेक्षा अधिक यंग दिसू लागल्या आहेत आणि या बदलाच्या मागे काढा पिणे हे रहस्य लपलेले आहे,  असे देखील  मनिष यांनी स्पष्ट केले आहे. 
ही पोस्ट पाहून असा कोणता काढा? स्मृती इराणी घेत असतील?, ज्यामुळे त्यांचे वजन एवढे कमी झाले असेल, तो काढा? कुठे मिळत असेल?, कसा तयार करायचा असा काढा?, असेल? असंख्य प्रश्न आता समस्त महिला वर्गाला छळू लागले आहेत.


मुळातच वजन कमी करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करणे, हा बहुसंख्य महिलांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग. वजन कमी करून फिट ॲण्ड फाईन राहण्यासाठी काही महिला तर त्यांना सांगितले जातील तेवढे उपाय अगदी जसेच्या तसे फॉलो करत असतात. वॉकिंग, सायकलिंग, रेग्युलर वर्कआऊट, सुर्यनमस्कार, झुंबा, जीम असे अनेक उपाय महिला करून पाहतात. अगदी डाएटींगचे नियमही काटेकाेरपणे पाळतात. पण एवढे सगळे उपाय करूनही वजन काही कमी होत नाही, अशी अनेकींची तक्रार असते. म्हणूनच स्मृती इराणी यांच्याप्रमाणे आपल्यालाही काढा मिळावा आणि झरझर आपले वजन कमी होऊन आपणही यंग ॲण्ड ब्युटीफुल दिसावे, अशी अनेकींची सुप्त इच्छा आहे.

 

वजन कमी करणारा सुंठीचा काढा
आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारली की आपोआपच शरीरात फॅट तयार होण्याचे प्रमाण कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे आधी आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारा असे औरंगाबाद येथील डॉ. पद्मा तोष्णीवाल यांनी सांगितले आहे. चयापचय क्रिया सुधारण्यासाठी सुंठ घालून केलेला काढा फायदेशीर ठरू शकतो. हा काढा तयार करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. यामध्ये दोन लिटर पाणी एक ते दोन चमचे सुंठ घालून उकळायचे आणि दिवसभरात थोडे थोडे पिऊन संपवायचे. एक महिनाभरच हा उपाय करावा, त्यापेक्षा अधिक नको, असेही डॉ. तोष्णीवाल यांनी सांगितले. 


आवळा, हिरडा, बेहडाचा उपाय
आवळा, हिरडा आणि बेहडा हा उपाय आयुर्वेदात सगळ्यात प्रभावी मानला गेला आहे. यामुळे चयापचय क्रिया तर सुधारतेच पण त्यासोबतच खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते. या त्रिफळा सेवनाने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते 
 

Web Title: Kadha is the secret of Smruti Irani's weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.