Lokmat Sakhi >Health >Infertility > एंडोमेट्रियोसिस आजारानं वंध्यत्व येऊ शकतं हे खरं आहे का? हा आजार नक्की असतो काय?

एंडोमेट्रियोसिस आजारानं वंध्यत्व येऊ शकतं हे खरं आहे का? हा आजार नक्की असतो काय?

( Endometriosis) एन्डोमेट्रियोसिस- गर्भाशयाबाहेर टिश्यूंची अनियमित वाढ होण्याचा आजार, वेळीच उपचार न केल्यास गर्भधारणेला अडचणी येऊ शकतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 07:21 PM2022-05-16T19:21:16+5:302022-05-17T12:09:53+5:30

( Endometriosis) एन्डोमेट्रियोसिस- गर्भाशयाबाहेर टिश्यूंची अनियमित वाढ होण्याचा आजार, वेळीच उपचार न केल्यास गर्भधारणेला अडचणी येऊ शकतात.

Is it true that infertility can be caused by endometriosis? What exactly is this disease Narikaa? | एंडोमेट्रियोसिस आजारानं वंध्यत्व येऊ शकतं हे खरं आहे का? हा आजार नक्की असतो काय?

एंडोमेट्रियोसिस आजारानं वंध्यत्व येऊ शकतं हे खरं आहे का? हा आजार नक्की असतो काय?

Highlightsतुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर लवकरात लवकर डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक

गर्भाशयाच्या अस्तराचे तीन स्तर असतात. त्याच्या सगळ्यात आतल्या स्तराला एन्डोमेट्रियम असं म्हणतात. हा स्तर दर महिन्याला शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे तयार आणि नष्ट होतो. गर्भधारणेच्या वेळी गर्भ रुजण्यासाठी गर्भाशय तयार करण्याचं काम एन्डोमेट्रियम करतो. एन्डोमेट्रियम या स्तरासारख्या टिश्यूची गर्भाशयाबाहेर होणारी अनियमित / अनियंत्रित वाढ म्हणजे एन्डोमेट्रियोसिस. ( Endometriosis) ही वाढ बीजांडकोश, बीजनलिका आणि स्त्रियांच्या कमरेच्या आतील बाजूच्या अस्तरावर होऊ शकते. मासिक पाळीच्या वेळी हार्मोन्सच्या क्रियेमुळे हे टिश्यूजसुद्धा एन्डोमेट्रियमसारखे शरीराकडून टाकून दिले जातात. मात्र त्यांना शरीराबाहेर जाण्यासाठी मार्ग नसल्याने ते शरीरात साठून राहतात.

(Image : Google)

लक्षणं कोणती?

बहुतेक वेळा एन्डोमेट्रियोसिसमध्ये खालील लक्षणं आढळतात. लक्षणांची तीव्रता ही एन्डोमेट्रिओसिसच्या तीव्रतेशी मिळतीजुळती असेलच असं नाही.
मासिक पाळीच्या वेळी असह्य वेदना होणं.
पोटात क्रॅम्प्स येणं.
वेदनादायी शारीरिक संबंध.
लघवी किंवा शौचाच्या वेळी वेदना.
वंध्यत्व.
दोन मासिक पाळीच्या मध्ये रक्तस्राव होणं.


एन्डोमेट्रिओसिसमुळे बाळ होण्यात अडचणी येतात का?

१. एन्डोमेट्रियोसिसचा वंध्यत्वाशी फार जवळचा संबंध आहे. बीजांड ज्यावेळी बीजांडकोषातून बाहेर पडतं, त्यावेळी या ऍबनॉर्मल टिश्यूजमुळे बीजनलिकेला सूज येऊन बीजांड किंवा शुक्राणूला इजा होऊ शकते. 
२.यामुळे बीजांडं आणि शुक्राणू यांच्यातील संयोगात बाधा येते.
३. काही वेळा,आजार वाढला तर एन्डोमेट्रियोसिसमुळे कमरेच्या भागातील अवयव एकमेकांना चिकटतात आणि त्यामुळे बीजनलिका बंद होते.

(Image : Google)

एन्डोमेट्रियोसिसचे उपचार आणि गर्भधारणा

पेल्विक भागातील ऍबनॉर्मल टिश्यूची वाढ नष्ट करण्यासाठी दुर्बिणीतून केलेल्या शस्त्रक्रियेचा उपयोग होतो. हे करतांना डॉक्टर लेझर, कात्री किंवा कोटरायझेशनचा उपयोग करतात.
एन्डोमेट्रियोसिस हा हार्मोन्समुळे होणारा आजार आहे. तो काही स्त्रियांना का होतो आणि काहींना का होत नाही ते माहिती नाही. त्याबाबत अनेक थिअरीज आहेत. प्रामुख्याने शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा नीट काम करत नसल्याने अश्या तयार होणाऱ्या ऍबनॉर्मल टिश्यूज शरीर नष्ट करू शकत नाही असं समजलं जातं. गरोदरपणापासून ते माता स्तनपान करत असेपर्यंत बदलणाऱ्या हार्मोन्सच्या प्रमाणामुळे एन्डोमेट्रियोसिसचा जोर कमी होऊ शकतो. गरोदरपणानंतर मासिक पाळी सुरु झाल्यानंतर एन्डोमेट्रियोसिस नियंत्रित करण्यासाठी औषध घ्यावी लागतात.
असे टिश्यूज काढून टाकण्यासाठी संततिनियमनाच्या गोळ्या किंवा किरकोळ दुर्बिणीद्वारे करण्याची शस्त्रक्रिया करता येते.
आजार जास्त असेल आणि त्याने गर्भधारणा होत नसेल, तर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करता येते. ती केल्यानंतर काही महिन्यांनी गर्भधारणा होऊ शकते.
तुम्हाला एन्डोमेट्रियोसिस असेल आणि तुम्हाला मूल होण्याची इच्छा असेल तर डॉक्टर लवकरात लवकर चान्स घेण्याचा सल्ला देतात. कारण एन्डोमेट्रियोसिसमुळे गर्भधारणेत अडथळा निर्माण होतो आणि त्यासाठी देण्यात येणारी औषधं देखील गर्भधारणा होऊ देत नाहीत. म्हणूनच त्यासाठीचे उपचार आणि गर्भधारणेसाठीचे प्रयत्न लवकरात लवकर करणं महत्वाचं असतं. फार उशीर झाला तर एन्डोमेट्रियोसिसमुळे आयव्हीएफ सारख्या तंत्रानेदेखील गर्भधारणा होणं कठीण होतं.

महत्त्वाचे
तुम्हाला एन्डोमेट्रियोसिसची लक्षणं दिसत असतील आणि त्यातही तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर लवकरात लवकर डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी आभार : डॉ. अंशुमला शुक्ल (Gynecological Laparoscopy Surgeon)

Web Title: Is it true that infertility can be caused by endometriosis? What exactly is this disease Narikaa?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.