lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > लैंगिक आजार लपवताय, पण वेळीच सावध झाला नाहीत तर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात..

लैंगिक आजार लपवताय, पण वेळीच सावध झाला नाहीत तर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात..

लैंगिक आजारात सुरुवातीला लक्षण दिसत नाहीत. पण ते संसर्गजन्य असतात आणि दीर्घकाळानंतर गंभीर आजारात त्यांचं रूपांतर होऊ शकतं. म्हणून लैंगिक आजार समजून घेणं महत्त्वाचं आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 06:42 PM2021-03-31T18:42:46+5:302021-04-01T12:43:05+5:30

लैंगिक आजारात सुरुवातीला लक्षण दिसत नाहीत. पण ते संसर्गजन्य असतात आणि दीर्घकाळानंतर गंभीर आजारात त्यांचं रूपांतर होऊ शकतं. म्हणून लैंगिक आजार समजून घेणं महत्त्वाचं आहे. 

Sexually transmitted diseases can be serious if not identified in time! | लैंगिक आजार लपवताय, पण वेळीच सावध झाला नाहीत तर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात..

लैंगिक आजार लपवताय, पण वेळीच सावध झाला नाहीत तर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात..

Highlightsलैंगिक आजरांच्या जेवढ्या केसेस नोंदवल्या जातात त्यापैकी ५० टक्के केसेस या वय वर्ष १९ ते २४ वयोगटातील व्यक्तींना झालेले असतात.हे आजार पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असते.काही मोजक्याच इन्फेक्शन्सवर उपचार करता येतात. बाकी आजारांवर एचआयव्ही प्रमाणे फक्त नियंत्रण ठेवता येऊ शकतं.

एसटीडी म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस किंवा लैंगिक आजार.  हे लैंगिक संबंधांमधून पसरतात. त्वचेवर झालेल्या जखमांमधूनही पसरू शकतात. लैंगिक आजरांच्या जेवढ्या केसेस नोंदवल्या जातात त्यापैकी ५० टक्के केसेस या वय वर्ष १९ ते २४ वयोगटातील व्यक्तींना झालेले असतात.

लैंगिक आजारांविषयी काही महत्वाचे मुद्दे
१) वय, लिंग, स्थळ आणि सामाजिक , आर्थिक परिस्थिती यांचा लैंगिक आजार होण्याशी काहीही संबंध नाही जी व्यक्ती शारीरिक संबंध ठेवते आहे अशा कुठल्याही व्यक्तीला लैंगिक आजार होऊ शकतात.
२) बहुतेक लैंगिक आजारात सुरुवातीला लक्षण दिसत नाहीत. पण ते संसर्गजन्य असतात आणि दीर्घकाळानंतर गंभीर आजारात त्यांचं रूपांतर होऊ शकतं.
३) पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असते. स्त्रियांमध्ये पेल्विक इन्फ्लमेटेरी डिसीजेस (ओटीपोटात दाह होणे), एक्टॉपिक प्रेग्नन्सी (गर्भाशयाबाहेर गर्भधारणा होणं) आणि वंध्यत्व यांसारखे आजार लैंगिक आजारांमुळे होऊ शकतात.
४) काही मोजक्याच इन्फेक्शन्सवर उपचार करता येतात. बाकी आजारांवर एचआयव्ही प्रमाणे फक्त नियंत्रण ठेवता येऊ शकतं. काहीवेळा बाळंतपणाच्यावेळी आईमुळे ही इन्फेक्शन्स बाळालाही होऊ शकतात.
त्यामुळे लैंगिक आजार म्हणजे काय, ते का होतात हे समजून घेणं आवश्यक आहे आणि लक्षण दिसल्याबरोबर उपचार सुरु करणं महत्त्वाचं आहे.

काही लैंगिक आजार

क्लॅमिडीया
लैंगिक आजारांमध्ये सर्वाधिक दिसणारा हा प्रकार आहे. यात जनननेंद्रियातून आणि गुदाशयातून स्त्राव होतो. मूत्र विसर्जनाच्या वेळी रक्त येतं आणि जळजळ होते. याची अनेकदा लक्षणं आधी दिसत नाहीत. पण वेळीच जर उपचार केले नाहीत तर विशेषतःगंभीर परिणाम होऊ शकतात. यातून पेल्विक इन्फ्लमेशन डिसऑर्डर, अंड नलिका, गर्भाशय आणि प्रजनन अवयवांचे आजार होऊ शकतात. वंध्यत्व, एक्टॉपिक आणि ट्युबल प्रेगनन्सी होऊ शकते. यावर अँटिबायोटिक्सची उपचार पद्धती वापरली जाते.
एचआयव्ही:
एचआयव्हीमुळे प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो आणि एड्स होतो. प्रतिकारशक्ती इतकी कमी होते की कुठल्याही प्रकारच्या संसर्गाशी शरीराला दोन हात करताच येत नाही. आणि त्या व्यक्तीला वेगवेगळ्या संसर्गाचा धोका वाढतो. पुढे जाऊन एक विशिष्ट प्रकारचा कर्करोगही होऊ शकतो.


एचपीव्ही
यात जननेंद्रियं आणि गुदाशयापाशी मस (वॉर्ट्स) यायला लागतात. जे उपचार केले नाहीत तर ते वाढत जातात. काहीवेळा हे गेल्यासारखे वाटतात पण काही वर्षांनी परत येतात. याचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. पीएपी या टेस्टमुळे एचपीव्ही आहे अथवा नाही हे समजू शकतं. एचपीव्हीसाठी आज लसीकरणही उपलब्ध आहे.

गॉंरिया (सूज): यात जननेंद्रियं आणि गुदाशयातून स्त्राव वाहतो. ज्यामुळे मलमूत्र विसर्जन कठीण होऊन बसतं. स्त्रियांमध्ये, यातून पेल्विक इन्फ्लमेशन डिसऑर्डर, वंध्यत्व, एक्टॉपिक आणि ट्युबल प्रेगनन्सी होऊ शकते.
गुप्तरोग (सिफिलिस) : गुप्तरोगांच्या सुरुवातीला त्वचेवर व्रण येतात. हे दुखत नाहीत. त्यानंतर वेदनादायी रॅशेस येतात. जर वेळीच उपचार केले नाहीत तर हृदय आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो. अँटिबायोटिक्स देऊन उपचार करता येतात.

जननांग (जेनिटल हर्पिज) 
जननेंद्रियांच्या आसपास फोड येतात. आठवड्याभरात हा आजार बरा होऊ शकतो. पण या आजाराचा विषाणू शरीरात सुप्तपणे टिकून राहू शकतो. त्यामुळे आजार बरा झाला असं वाटलं तरी आजार पुन्हा डोकं वर काढू शकतो. हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. अँटी व्हायरल औषधांनी याची लक्षण काबूत ठेवता येतात.
म्हणूनच सुरक्षित शारीरिक संबंध अतिशय महत्वाचे आहेत. जर तुम्हाला एसटीडीची कुठलीही लक्षणं जाणवली तरी ताबडतोब डॉक्टरांची मदत घ्या.

विशेष आभार: डॉ. प्रज्ञा चांगेडे
M.B.B.S, M.S. (Obstetrics And Gynecology), C.P.S, D.G.O, F.C.P.S, F.I.C.O.G, I.B.C.L.C.

Web Title: Sexually transmitted diseases can be serious if not identified in time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.