Lokmat Sakhi >Health >Adolescence > आपला लैंगिक कल कोणता, असा प्रश्न वयात येताना पडतो, तेव्हा.. हे माहिती हवं!

आपला लैंगिक कल कोणता, असा प्रश्न वयात येताना पडतो, तेव्हा.. हे माहिती हवं!

लैंगिकता-सेक्शुॲलिटी ही निसर्गाने दिलेली गोष्ट आहे, आपला कल ओळखून, गरज असेल तेव्हा तज्ज्ञांची मदत याने प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 05:02 PM2021-07-03T17:02:26+5:302021-07-03T17:04:47+5:30

लैंगिकता-सेक्शुॲलिटी ही निसर्गाने दिलेली गोष्ट आहे, आपला कल ओळखून, गरज असेल तेव्हा तज्ज्ञांची मदत याने प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात.

What is your sexual orientation, know your sexuality, how to talk about it | आपला लैंगिक कल कोणता, असा प्रश्न वयात येताना पडतो, तेव्हा.. हे माहिती हवं!

आपला लैंगिक कल कोणता, असा प्रश्न वयात येताना पडतो, तेव्हा.. हे माहिती हवं!

Highlightsस्वत:च्या लैंगिक ओळखीचा शोध लागणं हा फार मुक्त करणारा आणि सकारात्मक अनुभव असू शकतो.

लैंगिकता म्हणजे केवळ शरीसंबंध नव्हे. लैंगिकतेचा संबंध तुमच्या लैंगिक भावना, विचार, आकर्षण आणि इतर व्यक्तींशी असणाऱ्या वर्तणुकीशी संबंधित आहे. तुम्हाला इतर व्यक्ती शारीरिक, लैंगिक किंवा भावनिकदृष्ट्या आकर्षक वाटू शकतात आणि हे सगळं तुमच्या लैंगिकतेचा एक भाग आहे.
लैंगिकतेचे विविध प्रकार आहेत. मुळात ही गोष्ट  खाजगी असते. तुम्ही कोण या ओळखीचा  महत्वाचा भाग असते. तुमच्या स्वत:च्या लैंगिक ओळखीचा शोध लागणं हा फार मुक्त करणारा आणि सकारात्मक अनुभव असू शकतो.
अनेक व्यक्तींना त्यांच्या लैंगिकतेमुळे भेदभावाचा अनुभव येतो. त्रास होतो. बोलून, मदत मागून हे प्रश्न सुटू शकतात.

भिन्नलिंगी आणि समलिंगी

बहुतेक लोक विरुद्धलिंगी व्यक्तींकडे आकर्षित होतात - उदा. मुली आवडणारे मुलगे आणि पुरुष आवडणाऱ्या स्त्रिया. या व्यक्ती भिन्नलिंगी किंवा ‘स्ट्रेट’ असतात.
ज्या व्यक्ती सामान लिंगाच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात त्यांना समलिंगी व्यक्ती म्हंटलं जातं.
ज्या व्यक्ती स्वतःला स्त्री म्हणून ओळखतात आणि स्त्रियांकडे आकर्षित होतात त्यांच्यासाठी ‘लेस्बियन’ ही संज्ञा वापरली जाते. ज्या व्यक्ती स्वतःला पुरुष म्हणून ओळखतात आणि पुरुषांकडे आकर्षित होतात त्यांच्यासाठी ‘गे’ ही संज्ञा वापरली जाते, मात्र काही वेळा लेस्बियन म्हणून ओळख असणाऱ्या स्त्रियाही ही संज्ञा वापरतात.

Bisexual बायसेक्शुअल (द्विलिंगी)


लैंगिकता ही केवळ स्ट्रेट किंवा गे असण्यापेक्षा जास्त गुंतागुंतीची असू शकते. काही व्यक्ती स्त्रिया आणि पुरुष या दोन्हीकडे आकर्षित होतात आणि त्यांना बायसेक्शुअल म्हंटलं जातं.
द्विलिंगी असणं म्हणजे दोघांबद्दल सारखंच आकर्षण वाटणं नव्हे - एखाद्या व्यक्तीला एका लिंगाबद्दल दुसऱ्या लिंगापेक्षा जास्त भावना असू शकतात. आणि हे त्यांना कोण भेटतं यावर अवलंबून असू शकतं.
व्दिलैंगिकतेमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. स्त्रिया आणि पुरुषांकडे आकर्षित होणाऱ्या काही व्यक्ती स्वतःला मुख्यतः स्ट्रेट किंवा गे समजतात. किंवा त्यांना दोन्ही लिंगाबद्दल लैंगिक भावना असू शकतात मात्र ते लैंगिक संबंध एकाशीच ठेवतात.
व्दिलैंगिकतेमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. स्त्रिया आणि पुरुषांकडे आकर्षित होणाऱ्या काही व्यक्ती स्वतःला मुख्यतः स्ट्रेट किंवा गे समजतात. किंवा त्यांना दोन्ही लिंगाबद्दल लैंगिक भावना असू शकतात मात्र ते लैंगिक संबंध एकाशीच ठेवतात.
व्यक्तिपरत्वे बरेच बदल होत असल्यामुळे व्दिलैंगिकता ही केवळ एक व्यापक संज्ञा आहे.

Asexual- अलैंगिक

जी व्यक्ती स्वतःला अलैंगिक (असेक्शुअल - याचा शॉर्टफॉर्म ‘एस’ (ace) असा केला जातो) समजतात त्यांना लैंगिक आकर्षण अतिशय कमी वाटतं किंवा अजिबात वाटतच नाही.
अलैंगिकता ही ब्रह्मचर्येसारखी निवड करण्याची गोष्ट नसते. (ब्रह्मचर्येत आकर्षण वाटलं किंवा नाही तरी व्यक्ती लैंगिक संबंध ठेवत नाही). अलैंगिकता ही विरुद्धलिंगी किंवा भिन्नलिंगी यासारखीच एक लैंगिक ओळख आहे.
काही व्यक्ती काही मोजके लैंगिक आकर्षणाचे अनुभव (ग्रे-असेक्शुऍलिटी) वगळता तीव्रपणे अलैंगिक असतात. काही व्यक्तींना एखाद्या व्यक्तीबरोबर सखोल भावनिक बंध निर्माण झाल्याच्या नंतरच लैंगिक आकर्षण वाटतं (याला डेमीसेक्शुऍलिटी असं म्हणतात). इतर व्यक्तींना विविध प्रकारे अलैंगिकता जाणवते.
लैंगिकता आणि मानसिक आरोग्य LGBTQ व्यक्तींना इतर व्यक्तींच्या मानाने अति खिन्नता (डिप्रेशन), अति काळजी (अँक्झायटी), नशीले पदार्थ, बेघर असणं, स्वतःला इजा करून घेणं आणि आत्महत्येचे विचार मनात येणं याचा जास्त धोका असतो. या व्यक्ती जर तरुण LGBTQ असतील, स्वतःची लैंगिकता मान्य करण्याच्या अवस्थेत असतील आणि त्यासाठी शाळेत त्यांना त्रास दिला जात असेल तर हे विशेषत्वाने खरं ठरतं.

LGBTI व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे काही तणावपूर्ण अनुभव असे असतात..


इतर व्यक्तीपेक्षा वेगळं वाटणं.
दादागिरी किंवा छळवणुकीला तोंड द्यावं लागणं. (शाब्दिक किंवा शारीरिक)
त्यांची लैंगिकता नाकारण्यासाठी किंवा बदलण्यासाठी दबाव असणं.
स्वतःची लैंगिकता जाहीर करणं आणि त्यानंतर नाकारलं जाणं किंवा एकटं पडणं याची काळजी वाटणं.
आपल्याला कोणाचा पाठिंबा / आधार नाही किंवा आपल्याबद्दल गैरसमज आहेत असं वाटणं.

लैंगिकतेबद्दलची इंटरेस्टिंग, फारशी माहिती नसलेली सत्य.

समलैंगिकता ही मेंदूच्या संरचनेचा परिपाक असते. मेंदूच्या डाव्या आणि उजव्या बाजूतील साम्यामुळे एखाद्या व्यक्तीची लैंगिकता ठरते. त्याशिवाय अमिगडेला या मेंदूतील भागातल्या नर्व्ह कनेक्शन्सवर देखील ते अवलंबून असतं.

समलिंगी स्त्री पुरुषांपेक्षा भिन्नलिंगी स्त्रीपुरुषांच्या चेहेऱ्याची ठेवण सममितीय असण्याची जास्त शक्यता असते. तसेच भिन्नलिंगी व्यक्तीपेक्षा समलिंगी व्यक्ती डावखुऱ्या असण्याची जास्त शक्यता असते.

भिन्नलिंगी आणि समलिंगी व्यक्तीबरोबरच आजघडीला अलैंगिक माणसंदेखिल आजच्या युगात आहेत. या व्यक्तींना लैंगिक जोडीदार नको असतो.

आपल्या डोळ्यातील बाहुलीच्या प्रसरण पावण्यावरूनसुद्धा आपल्या लैंगिकतेचा कल ओळखू येतो.
समलिंगी पालकांपेक्षा भिन्नलिंगी पालकांना समलिंगी मुलं होण्याची शक्यता जास्त असते.

सामान्य जोडप्यांपेक्षा समलिंगी जोडपी जास्त आरोग्यपूर्ण आयुष्य जगतात हे आता जास्त निदर्शनास येऊ लागलं आहे.

व्दिलैंगिक पुरुषांबद्दल असा समज असतो की ते खरं तर गे असतात, पण त्यांना ते उघडपणे स्वीकारायचं नसतं. मात्र संशोधनातून असा पुरावा मिळाला आहे की पुरुषांमधील व्दिलैंगिकता, म्हणजेच स्रिया आणि पुरुषांकडे आकृष्ट होणं ही एक खरी गोष्ट आहे.

लिंगनिश्चिती नसणं हे खरोखर समलैंगिकतेशी संबंधित असलं, तरी वागण्यातील आणि दिसण्यातील वैशिष्ट्य यात गे आणि लेस्बियन व्यक्तींमध्ये बऱ्यापैकी भिन्नता असू शकते.

जवळजवळ संपूर्ण जगातील माध्यमं जरी समलिंगी जोडप्यांचं चित्रण एका प्रकारे करत असतील, तरी अशा नात्यांमध्ये नेमक्या भूमिका ठरलेल्या नसतात. पारंपारिकदृष्ट्या असं समजलं जातं की समलैंगिक पुरुषांमध्ये भिन्नलिंगी पुरुषांपेक्षा लैंगिक भूक कमी असते. मात्र सत्य एवढंच आहे की समलैंगिक जोडपी समसमान जबाबदारी घेण्याची शक्यता जास्त असते.

उत्क्रांतीचा सिद्धांत असं म्हणतो की भिन्नलिंगी पुरुष हे वाळूच्या घड्याळासारखी शरीरयष्टी असणाऱ्या आणि लांब रेशमी केस असणाऱ्या स्त्रियांकडे आकर्षित होतात कारण ते चांगल्या तब्येतीचं आणि प्रजननक्षमतेचं लक्षण आहे.
निष्कर्ष
लैंगिकता हे निसर्गाने माणसाला दिलेलं वरदान आहे. त्यात आयुष्य बदलून टाकायची ताकद असते. तथापि, कुठल्याही भावना किंवा कृतीत सहभागी होण्यापूर्वी तुम्ही कायम लैंगिकतेचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे.

Web Title: What is your sexual orientation, know your sexuality, how to talk about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.