Lokmat Sakhi >Health >Adolescence > नाजूक जागी वारंवार इन्फेक्शन होतं? शरीर स्वच्छतेकडे दुर्लक्ष तर होतं नाही...

नाजूक जागी वारंवार इन्फेक्शन होतं? शरीर स्वच्छतेकडे दुर्लक्ष तर होतं नाही...

आपलं रोजचं जगणं सुरक्षित आणि आन्ंदी करण्यासाठी  वैयक्तिक स्वच्छता महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. म्हणून वैयक्तिक स्वच्छतेचे  नियम पाळणं महत्त्वाचं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 07:43 PM2021-03-29T19:43:24+5:302021-03-30T12:52:03+5:30

आपलं रोजचं जगणं सुरक्षित आणि आन्ंदी करण्यासाठी  वैयक्तिक स्वच्छता महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. म्हणून वैयक्तिक स्वच्छतेचे  नियम पाळणं महत्त्वाचं आहे.

Personal Hygiene: - The first rule of safe living! | नाजूक जागी वारंवार इन्फेक्शन होतं? शरीर स्वच्छतेकडे दुर्लक्ष तर होतं नाही...

नाजूक जागी वारंवार इन्फेक्शन होतं? शरीर स्वच्छतेकडे दुर्लक्ष तर होतं नाही...

Highlightsलैंगिक अवयवांची रोज  दिवसातून दोन वेळा स्वच्छता झाली पाहिजे.खूप घाम येत असेल आणि घामाला प्रचंड दुर्गंधी असेल तर याचा अर्थ तुम्हाला ॲलर्जी असू शकते.स्त्रियांची व्यक्तिगत स्वच्छता संपूर्ण स्वास्थ्यासाठी अतिशय गरजेची असते.

 शारीरिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे निरनिरळ्या प्रकारची इन्फेक्शन्स होण्याचा संभव असतो.  वैयक्तिक स्वच्छता हा प्रत्येकसाठी अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असला पाहिजे. शारीरिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे निरनिरळ्या प्रकारची इन्फेक्शन्स होण्याचा संभव असतो.

व्यक्तिगत स्वच्छता करण्याचे  मार्ग
१) लैंगिक अवयवांची रोज स्वच्छता गरजेची असते. दिवसातून निदान दोन वेळा तरी ही स्वच्छता झाली पाहिजे म्हणजे खाज सुटणं, रॅश येणं, कोरडेपणा येणं यासारख्या समस्या उद्भवणार नाहीत.

२) ज्या पाण्यात क्षार जास्त आहेत असं पाणी, खूप केमिकल्स असलेला साबण या गोष्टींचा वापर खासगी अवयवांची स्वच्छता करताना टाळलं पाहिजे. नाजूक आणि गुप्तांगाची स्वच्छता करताना सौम्य उत्पादनं वापरली पाहिजेत.

३) अति गरम पाण्यानं अंघोळ करू नये.

४) स्वच्छ अंतर्वस्त्रेचं नेहमी वापरली पाहिजेत. हे सगळ्यात सोपं आहे.

५) मासिक पाळीच्या दरम्यान नियमितपणे पॅड्स आणि टॅम्पॉन्स बदलले पाहिजेत.

६) खूप घट्ट कपडे कधीही वापरू नयेत. खूप घट्ट कपड्यांमुळे अंगावर इरिटेशन येण्याची शक्यता असते. शिवाय खूप घट्ट कपड्यांमुळे रक्ताभिसरणात अडथळे येऊ शकतात.

७) गुप्तांग नेहमी कोरडं राहील याची काळजी घ्या

८) त्वचा मऊ राहावी यासाठी क्रीम किंवा ऑइन्मेंट वापरा.

९) खूप घाम येत असेल आणि घामाला प्रचंड दुर्गंधी असेल तर याचा अर्थ तुम्हाला ॲलर्जी असू शकते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

१०) कुठलंही सौंदर्य प्रसाधन वापरताना आधी ते हाताच्या किंवा पायाच्या त्वचेवर वापरून बघावं, रॅश आला नाही, खाज सुटली नाही किंवा कसलीही रिॲक्शन आली नाही तरच इतर शरीरावर त्याचा वापर करावा.

११) बाह्य वापराची प्रॉडक्टसचा जर अंतर्गत वापर केला तर त्याचा त्रास होऊ शकतो. काहीवेळा प्रॉडक्टसमध्ये ‘phthalates’ नावाचे केमिकल वापरलेलं असतं.

१२) काही डॉक्टर्सच्या मते, योनीमार्गच जर निरोगी असेल तर शरीर योनीमार्गाची स्वच्छता आपली आपणच करुन घेण्यासाठी सक्षम असते.

स्त्रियांची व्यक्तिगत स्वच्छता संपूर्ण स्वास्थ्यासाठी अतिशय गरजेची असते. वैयक्तिक स्वच्छतेसाठी बाजारात अनेक स्वच्छता उत्पादनं उपलब्ध असतात. गुप्तांगांच्या स्वच्छतेसाठी ती वापरता येऊ शकतात. ही उत्पादनं हायपोलर्जीक, सोपफ्री, पीएच  फ्रेंडली, सौम्य, कोरडेपणा घालवणारी आणि मायक्रोफ्लोराचा समतोल सांभाळणारी आहेत ना बघून घेतलं पाहिजे. अर्थात प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. बाह्य रूप सारखं असलं तर शरीरातील हार्मोन्स, रोगप्रतिकारक शक्ती आणि इतर गोष्टीही भिन्न असतात. अशावेळी कुठलंही उत्पादन वापरताना ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरणं सुरक्षित आहे. आपलं रोजचं आयुष्य जगताना आणि वैयक्तिक स्वच्छता करताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा.

विशेष आभार: डॉ. विजया बाबरे (DNB, FCPS, FICOG, DGO, DFP, DHA)

Web Title: Personal Hygiene: - The first rule of safe living!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.