Lokmat Sakhi >Health >Adolescence > मांडी घासली जाऊन आग होणे, रॅश येणे हा त्रास अनेकींना छळतो, त्यावर हा उपाय

मांडी घासली जाऊन आग होणे, रॅश येणे हा त्रास अनेकींना छळतो, त्यावर हा उपाय

Inner thigh chafing causes : मांडीतील घर्षण, पुरळ आणि जळजळ होण्याची समस्या दूर करण्यासाठी नेहमीच योग्य कपडे निवडा. कारण बर्‍याच वेळा जास्त घट्ट कपडे घातल्यामुळे घाम येतो, ज्यामुळे त्वचा घासणं सुरू होते आणि एलर्जीचा धोका वाढतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 07:01 PM2021-07-16T19:01:30+5:302021-07-16T19:15:18+5:30

Inner thigh chafing causes : मांडीतील घर्षण, पुरळ आणि जळजळ होण्याची समस्या दूर करण्यासाठी नेहमीच योग्य कपडे निवडा. कारण बर्‍याच वेळा जास्त घट्ट कपडे घातल्यामुळे घाम येतो, ज्यामुळे त्वचा घासणं सुरू होते आणि एलर्जीचा धोका वाढतो.

Inner thigh chafing causes symptoms treatment and prevention | मांडी घासली जाऊन आग होणे, रॅश येणे हा त्रास अनेकींना छळतो, त्यावर हा उपाय

मांडी घासली जाऊन आग होणे, रॅश येणे हा त्रास अनेकींना छळतो, त्यावर हा उपाय

महिला असो किंवा पुरूष ज्या लोकांना सतत बाहेर फिरावं लागतं.  त्यांना नेहमीच मांड्यांना रॅशेज येणं, जळजळ होणं अशा समस्यांचा सामना करावा लागतो. साधारणपणे जेव्हा बायका साडी नेसतात किंवा ज्यांच्या शरीरावर मास जास्त आहे त्यांना या समस्येचा सामना करावा लागतो. इनर थाईसवर येणारे रॅशेज आणि जळजळ खूपच त्रासदायक ठरू शकतात. अनेकदा तर काही पाऊलंही चालण्याची इच्छा होत नाही.

जीन्स किंवा कोणतीही पॅण्ट घातली असेल तर असा त्रास होत नाही. कारण थ्री-फोर किंवा फूल पॅण्ट घातल्यानंतर मांड्याचा प्रत्यक्ष संपर्क येत नाही. पण जेव्हा साडी किंवा इतर आऊट फिट्स घालून आपण जास्तवेळ चालतो तेव्हा मांड्यांच्या घर्षणामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आधीच असा त्रास होऊ नये म्हणून लक्ष द्यायला हवं. 

नारळाचं तेल लावा

नारळ तेलामध्ये एंटी इन्फेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेला शितलता  प्रदान करतात. मांडीच्या सभोवतालच्या भागात हे तेल लावल्याने घासण्याची समस्या नाही आणि यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही.

पेट्रोलियम जेली

मांड्यांवर लोशन किंवा पेट्रोलियम जेल लावा, यामुळे त्यांच्या दरम्यान होणारी आग कमी होईल आणि पुरळांमुळे होणारी जळजळ देखील दूर होईल.  तुम्हाला एलर्जी जास्त प्रमाणात झाली असेल डॉक्टरांचा सल्ला घ्यायला उशीर करू नका.

कपड्यांची निवड

मांडीतील घर्षण, पुरळ आणि जळजळ होण्याची समस्या दूर करण्यासाठी नेहमीच योग्य कपडे निवडा. कारण बर्‍याच वेळा जास्त घट्ट कपडे घातल्यामुळे घाम येतो, ज्यामुळे त्वचा घासणं सुरू होते आणि एलर्जीचा धोका वाढतो. म्हणून हवा ज्याद्वारे सहजतेने आत जाऊ शकेल असे कपडे निवडा. ज्यामुळे घाम येण्याची शक्यता नसते आणि त्वचा सोलली जात नाही.

बेबी पावडरचा वापर

मांडीच्या सभोवतालची चरबी वाढली की घर्षणामुळे तेथील त्वचा सोलली जाते. म्हणून, बेबी पावडर लावा कारण त्यात त्वचा सुखदायक घटक आहेत. याशिवाय डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही एखादी  पावडर रोज अंघोळीनंतर लावू शकता.

Web Title: Inner thigh chafing causes symptoms treatment and prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.