Lokmat Sakhi >Health >Adolescence > भरपूर आंबे खाल्ले,  आता जांभळं खा ! चटकन कमी होईल वाढलेले वजन आणि शुगर...

भरपूर आंबे खाल्ले,  आता जांभळं खा ! चटकन कमी होईल वाढलेले वजन आणि शुगर...

आमरस आणि कुरडई किंवा दररोज एक- दोन आंबे हे उन्हाळ्यातले ठरलेले रूटीन. आंबा खाऊन भरपूर वजन आणि शुगर वाढली असेल तर आता मात्र तुम्हाला तुमचा मोर्चा जांभळांकडे वळवायला हवा. का ? ते नक्की जाणून घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 06:07 PM2021-07-06T18:07:08+5:302021-07-06T18:08:34+5:30

आमरस आणि कुरडई किंवा दररोज एक- दोन आंबे हे उन्हाळ्यातले ठरलेले रूटीन. आंबा खाऊन भरपूर वजन आणि शुगर वाढली असेल तर आता मात्र तुम्हाला तुमचा मोर्चा जांभळांकडे वळवायला हवा. का ? ते नक्की जाणून घ्या..

Benefits of eating Jamun seed, jamun seeds controls sugar and weight | भरपूर आंबे खाल्ले,  आता जांभळं खा ! चटकन कमी होईल वाढलेले वजन आणि शुगर...

भरपूर आंबे खाल्ले,  आता जांभळं खा ! चटकन कमी होईल वाढलेले वजन आणि शुगर...

Highlightsजांभूळ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. शक्यतो जेवण केल्यानंतर जांभळं खाणे कधीही योग्य मानले जाते. 

''आंब्याला जांभळाची मात्रा बरोबर लागू पडते...'', असे वाक्य जुन्या पिढीकडून अनेकदा ऐकायला मिळते. याचे कारणही तसेच वाढते. भरपूर आंबे खाल्ले की वजन वाढते. शिवाय आमरसात बऱ्याचदा साखर टाकली जाते.  त्यामुळे शुगर लेव्हलही वाढू लागते. वाढलेली शुगर कंट्रोल  करण्याचे काम जांभळे करतात.  त्यामुळे ज्यांना शुगर आहे, त्यांनाही डॉक्टरजांभळे खाण्याचा सल्ला देतात.

 

जांभळं खाण्याचे फायदे
जांभळांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे जांभळे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी जांभळं खाण्याचा सल्ला दिला जातो. जांभळामध्ये फ्रुक्टोज मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे त्यापासूनही शरीराला अनेक फायदे होतात.

 

'या' कारणांसाठी खा जांभळं
१. अपचनाचा त्रास होतो दूर
जांभळाचा सिझन असताना भरपूर प्रमाणात जांभळं खाल्ली तर पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. पोटदुखी, अपचनाचा त्रास कमी होतो. जी मुले वारंवार पोटदुखीची तक्रार करतात, त्यांना देखील जांभळं खाण्याचा सल्ला दिला जातो. 

 

२. रोगप्रतिकारशक्ती वाढते
सध्याच्या कोरोना काळात तर प्रत्येकजण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. जांभळांमुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगलीच वाढते. पोटॅशियम, लोह, कॅल्शियम हे घटक जांभळांमधून मोठ्या प्रमाणावर मिळतात. तसेच रक्ताची कमतरताही दूर होते. 

३. यकृताची समस्या कमी होते
ज्यांना यकृताशी संबंधित आजार असतात, त्यांना भरपूर प्रमाणात जांभळं खाण्याचा सल्ला दिला जातो. दररोज सकाळी आणि संध्याकाळी जांभळाचा रस घेतल्याने अनेक आजार दूर होतात.

 

४. किडनीस्टोनच्या त्रासासाठी उपयुक्त
जर आपल्याला किडनीस्टोनची समस्या असेल, तर जांभळाचे योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे. जांभळाच्या बियांची पावडर यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी जांभळाच्या बियांची पावडर दही टाकून खाण्याचा सल्ला  दिला जातो. 

 

५. शरीर डिटॉक्स करते 
जांभळात फ्लावोनाईड्स भरपूर प्रमाणात असतात. हे अँटिऑक्सिडंट शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स बाहेर टाकण्यास मदत करतात. जांभळं डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतात.

 

Web Title: Benefits of eating Jamun seed, jamun seeds controls sugar and weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.