Lokmat Sakhi >Health > ९ वर्षांच्या मुलीला आला हार्ट अटॅक; लहान मुलांना हार्ट ॲटॅक येण्याची पाहा ‘ही’ कारणं..

९ वर्षांच्या मुलीला आला हार्ट अटॅक; लहान मुलांना हार्ट ॲटॅक येण्याची पाहा ‘ही’ कारणं..

Heart Disease In Children : राजस्थानच्या सीकरमध्ये काही दिवसांआधी अशीच घटना बघायला मिळाली. इथे एका ९ वर्षाच्या मुलीने हार्ट अ‍ॅटॅकमुळे जीव गमावला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:38 IST2025-07-18T17:20:55+5:302025-07-19T15:38:57+5:30

Heart Disease In Children : राजस्थानच्या सीकरमध्ये काही दिवसांआधी अशीच घटना बघायला मिळाली. इथे एका ९ वर्षाच्या मुलीने हार्ट अ‍ॅटॅकमुळे जीव गमावला.

9 years old girl died due to heart attack in Rajasthan know possible reasons and silent symptoms | ९ वर्षांच्या मुलीला आला हार्ट अटॅक; लहान मुलांना हार्ट ॲटॅक येण्याची पाहा ‘ही’ कारणं..

९ वर्षांच्या मुलीला आला हार्ट अटॅक; लहान मुलांना हार्ट ॲटॅक येण्याची पाहा ‘ही’ कारणं..

Heart Disease In Children : अलिकडे हार्ट अ‍ॅटॅकमुळे जीव जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फक्त वयाने मोठेच नाही तर कमी वयाचे लोकही जीव गमावत आहेत. राजस्थानच्या सीकरमध्ये काही दिवसांआधी अशीच घटना बघायला मिळाली. इथे एका 9 वर्षाच्या मुलीने हार्ट अ‍ॅटॅकमुळे (Heart Attack) जीव गमावला. ही घटना शाळेत लंच ब्रेकदरम्यान घडली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, प्राची कुमावत लंच बॉक्स उघडताच अचानक बेशुदध पडली. शिक्षक तिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेले. नंतर तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. पण तिथे पोहोचण्याआधीच तिचा जीव गेला होता.

रिपोर्टनुसार प्राचीच्या कुटुंबियांनी सांगितलं की,  काही दिवसांआधी तिला सर्दी-पडसा झाला होता. पण या कारणानं तिलाच जीव जाईल असं कुणालाही वाटलं नाही. अशात आता असा प्रश्न उभा राहतो की, सर्दी-पडसा हृदयरोगाचं कारण ठरू शकतो का? 

सर्दी-पडसा हार्ट डिजीजचं लक्षण?

अ‍ॅलर्जी किंवा इंफेक्शनमुळे सर्दी-पडसा होऊ शकतो. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, अशा स्थितीत शरीरात क्रॉनिक इंफ्लामेशन वाढू शकते. ज्यामुळे हृदयावरील दबाव वाढू शकतो. या कारणानं कोरोनरी आर्टरी डिजीज होऊन हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. तसेच हृदय जेव्हा योग्यपणे पंप करू शकत नाही, तेव्हा फुप्फुसांमध्ये पाणी भरतं, ज्यामुळे खोकला होतो.

कॉन्जेनिटल हार्ट डिजीज

मेडिकल न्यूज टुडेच्या एका रिपोर्टनुसार, लहान मुलांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकचं कारण कॉन्जेनिटल हार्ट डिजीजही ठरू शकतो. हा एक ग्रुप आहे, ज्यात जन्मापासून हृदयासंबंधी आजार असतात. अशा मुलांना भविष्यात हार्ट अ‍ॅटॅक किंवा ब्लॉकेजचा धोका असतो. 

एक्यूआयर्ड हार्ट डिजीज

हृदयाची ही स्थिती लहान मुलांमध्ये जन्मापासूनच विकसित होते. यात रूमेटिक हार्ट डिजीज आणि कासॉकी डिजीज येतात. रूमेटिक हार्ट डिजीजमध्ये रूमेटिक ताप येतो, जो निघून गेला नाही तर हृदयाचं नुकसान होतं. तर कासॉकी डिजीजमुळे एक्यूट इन्फ्लामेशन हृदयाचं फंक्शन डॅमेज होतं.

चेस्ट ट्रॉमा

छातीमध्ये झालेली एखादी जखमही हृदयाचं नुकसान होऊ शकतं. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, जखम किंवा अपघातामुळे लहान मुलांमध्ये हार्ट अ‍ॅटॅक येऊ शकतो.

Web Title: 9 years old girl died due to heart attack in Rajasthan know possible reasons and silent symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.