get control of your life? how? try this .. | जगणं ‘बोअर’ झालंय, सगळा नुस्ता घोळ, असं वाटतंय? -मग या 'COP'ला कामाला लावा!
जगणं ‘बोअर’ झालंय, सगळा नुस्ता घोळ, असं वाटतंय? -मग या 'COP'ला कामाला लावा!

ठळक मुद्देआपलं जगणं आपण घडवू शकतो, फक्त ठरवायला हवं.

-सखी ऑनलाईन टीम 


कॉप हा शब्द तसा काही आपल्याला नवीन नाही. कॉप-सुपरकॉप हे शब्द लहान मुलांच्या काटरुन्समध्येही दिसतात आणि बातम्यांमध्येही. तसा एखादा ‘कॉप’ अर्थात पोलीस जर आपल्यामागे शिस्तीचा बडगा घेऊन रोज सकाळी लागला तर काय होईल? गजर झाला की उठलंच पाहिजे ही त्याची शिस्त. ठरलेली कामं झालीच पाहिजे, वेळ वाया घालवता कामा नये, व्यायाम केलाच पाहिजे, उत्तम नाश्ता केलाच पाहिजे असं जर शिस्तीत आपलं रुटीन लावून दिलं तर? तर आपलं आयुष्य बदलून जाऊ शकतं. जगभरात जे जे यशस्वी लोक आहेत त्यांच्याकडे म्हणे असा एक कॉप असतोच. आपणही त्या कॉपशी दोस्ती केली तर आपलं आयुष्य बदलून जाऊ शकतं. 
तर विचारा, आहे कोण हा कॉप?

कॉपची ही थ्री डायमेन्शन त्रीसुत्री  आहे आणि ती जगण्यात उत्तम जादू भरू शकते हे नक्की. 

कॉप म्हणजे कण्ट्रोल ( नियंत्रण), ऑप्टिमिझम ( आशा-उमेद) पर्पज ( हेतू-लक्ष्य) तेच हे कॉप.

1) कण्ट्रोल
जगण्याचा कण्ट्रो कुणाच्या हाताता आहे. सगळं नशीब आणि नियती असं म्हणत बसण्यात काहीच हशील नाही. त्याऐवजी मला शक्य काय आहे ते ठरवता येईल. जगण्याचा कण्ट्रोल आपल्या हातात घेता येईल. जे अशक्य ते सोडून देवू. पण जे शक्य आहे  त्याचा कण्ट्रोल हातात घ्यायला हवा. आपण कराव्यात असं वाटणार्‍या गोष्टी कागदावर लिहा. कामाला लागा. कण्ट्रोल युवर लाइफ.

2) ऑप्टिमिझम


मला काहीच जमणार नाही. हे रडगाणं सोडा. जे ठरवलं, ते कसं करायचं याचा विचार करा. रडून तरी कुठं प्रश्न सुटतात. त्यापेक्षा जमेल आपल्याला, करु आपण. होईल सगळं छान असं ठरवलं आणि उमेद मनाशी धरलं की यश मिळू शकतं. आपण जे ठरवलं ते होतंच याचा अनुभव एकदा यायला लागला की जिंदगीला बेलाशक भिडा. 


3) पर्पज
 सकाळी उठताच स्वतर्‍ला विचारा की, आजचा दिवस जगायचं आपलं लक्ष्य काय? आजच्यापुरता विचार करा. आजची कामं ठरवा, उमेदीनं ती पूर्ण करा. त्यावर नियंत्रण जमवा. आणि दुसर्‍या दिवसशी दुसरा दिवस. आपल्याला काय जग बदलून टाकायचं नाही, आज पाणीपुरी खायची एवढंच ठरवलं तर ते तेवढंच तरी करा. जगणं मग सोपं होत जाईल!
 

Web Title: get control of your life? how? try this ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.