जास्वंद (Hibiscus) हे उष्ण हवामानात भरभरून फुलणारं एक सुंदर रोप आहे. थंडीच्या दिवसांत तापमान कमी झाल्यामुळे त्याची वाढ मंदावते आणि फुलांची संख्याही घटते. अशावेळी योग्य खताचा वापर केल्यास आपण आपल्या रोपाला ताजेतवानं ठेवून तयार करू शकता. थंडीच्या दिवसांत जास्वंदाच्या रोपाला संतुलित ठेवण्यासाठी कमी नायट्रोजन आणि खताची आवश्यकता असते. (Which Fertilizer Is Good For Hibiscus Plant)
जास्वंदाला दिवसातून किमान ४ ते ६ तास थेट सुर्यप्रकाश मिळणं आवश्यक असते. थंडीत सुर्य कोवळा असतो. त्यामुळे रोप जिथे जास्तीत जास्त ऊन असेल त्या ठिकाणी ठेवा. थंडीत झाडांची वाढ मंदावलेली असते. त्यामुळे त्याला जास्त नायट्रोजची गरज असते. नायट्रोजनमुळे नवीन पानांची वाढ होते पण थंडीत हे रोगांना बळी पडू शकते. संतुलित खतातील फॉस्फरसमुळे मुळांची वाढ चांगली होते आणि पोटॅशियम झाडांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. ज्यामुळे थंड हवामानचा सामना करणं सोपं होतं. (How To Grow Hibiscus Plant at Home)
रासायनिक खतांपेक्षा सेंद्रीय खत थंडीत फायदेशीर ठरतात. गांडूळ खत हे एक उत्तम आणि संतुलित सेंद्रीय खत आहे. ते मातीची गुणवत्ता सुधारते आणि आवश्यक सुक्ष्म पोषक तत्व पुरवते. कुजलले शेणखत मातीला उष्णता देते आणि हळूहळू पोषण पुरवते. यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते जे मुळांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
खत देण्याचे प्रमाण आणि पद्धत
रासायनिक खत वापरत असल्यास पॅकेजवरील सूचनांनुसार अर्धे किंवा त्याहून कमी प्रमाणात वापरावे. सेंद्रीय खत ३० दिवसांतून एकदा, मूठभर रोपाच्या कुंडीतील मातीत मिसळून घाला. थंडीच्या काळात दर ३० ते ४५ दिवसांनी एकदाच खत द्या. खत देण्यापूर्वी आणि नंतर माती ओली असेल याची खात्री करा.
कोरड्या मातीत खत दिल्यामुळे मुळं जळू शकतात. थंडीत रोपाला कमीत कमी पाणी द्या. पण खत आणि योग्य प्रमाणात पाणी मिळाल्यास जास्वंदाचे रोप सुदृढ राहते आणि वसंत ऋतूसाठी ते तयार होते. कीटक दिसल्यास त्यांना कापसानं किंवा पाण्याच्या जोरदार धारेने काढून टाका. १५ दिवसांतून एकदा, कडुलिंबाच्या तेलाची फवारणी करा. हे सेंद्रीय खत असल्यानं रोपाला अपायकारक नसते आणि किटकांना दूर ठेवते.
