तुळशी ही आपल्या घरातील, अंगणातील आणि बागेतील महत्त्वाचे रोप. घरात तुळशीचे रोप असणं म्हणजे पवित्रता, शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक.(Tulsi plant fungus solution) पण ऋतू बदलला की रोपांवर परिणाम होऊ लागतो. मातीतील ओलाव्यामुळे तुळशीची मूळ खराब होतात.(How to save tulsi from fungus) ज्यामुळे तुळस खराब होते, कोमजते, पाने पिवळी पडतात. कितीही पाणी घातलं तरी नुसतं काड्या दिसतात.(Home remedy for tulsi plant pests) अनेकदा माती खूप घट्ट होऊन हवेचा प्रवाह कमी होतो ज्यामुळे बुरशी आणि कीड देखील लागते.(Why tulsi plant is drying) तुळशीच्या रोपाची योग्य ती काळजी घेतल्यावर आपल्याला पुन्हा ताजी, हिरवीगार आणि भरपूर पानांनी बहरलेली तुळस पाहायला मिळेल.
गव्हाच्या पीठात मिसळा ‘या’ २ गोष्टी, Vitamin D-B12 वाढेल भरपूर- हाडे होतील मजबूत, गट हेल्थही सुधारेल
हिवाळ्यात तुळशीच्या मुळांची काळजी आपण घ्यायला हवी. हे करण्यासाठी कुंडीतील वरची २ इंच माती काढून टाका. त्यात कोरफडीचे लहान तुकडे करा आणि मातीत ठेवा. कोरफड मुळांना पोषक तत्वे आणि ओलावा देते. तसेच त्यांना बुरशीपासून वाचवते. यानंतर कुंडीत थोडी हळद पावडर घाला.
हळद ही नैसर्गिक अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे बुरशी, कीड आणि कीटकांपासून तुळशीचे संरक्षण करते. तसेच मातीतील ओलावा देखील शोषून घेण्यास मदत करते. ज्यामुळे तुळशीची पाने पुन्हा चमकतात आणि फ्रेश दिसतात. तुळशीच्या रोपाला बुरशी लागण्याचे मुख्य कारण जास्त पाणी देणे, माती कमी असणे, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि हवेशीर जागा न मिळणे. तुळशीच्या रोपाला आठवड्यातून दोन ते तीन दिवस थोडसं पाणी पुरेसं असतं. पण जेव्हा ओलावा वाढतो आणि बुरशी दिसू लागते, तेव्हा माती ढिली करून त्यात एक चमचा हळद मिसळली की माती निर्जंतुकीकरण होते. रोपाची मुळे पुन्हा हलकी, मोकळी होतात आणि शोषणक्षमता वाढते.
इतकेच नाही तर तुळशीच्या पानांवर कडुलिंबाच्या पानांचे काही थेंब स्प्रे करा. ज्यामुळे कीटकनाशके मरतात आणि रोप पुन्हा बहरण्यास मदत होते. हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे रोपाला जास्त पाणी देऊ नका. जास्त पाणी दिल्यावर मुळांवर बुरशी येऊ शकते. ज्यामुळे झाडे कुजून मरतात.
