Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > मनी प्लांटची पानं पिवळी पडली, वेल वाढतही नाही? मुळाशी घाला 'हे' ग्लासभर पाणी, थंडीतही वेल वाढेल वेगाने...

मनी प्लांटची पानं पिवळी पडली, वेल वाढतही नाही? मुळाशी घाला 'हे' ग्लासभर पाणी, थंडीतही वेल वाढेल वेगाने...

best way to grow money plant at home : how to grow money plant faster : money plant growth problems solution : मनी प्लांट कडाक्याच्या थंडीने सुकते, वाढ खुंटते मग एकदा वापरुन पाहा 'हे' ग्लासभर पाणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2025 10:15 IST2025-12-09T10:13:00+5:302025-12-09T10:15:01+5:30

best way to grow money plant at home : how to grow money plant faster : money plant growth problems solution : मनी प्लांट कडाक्याच्या थंडीने सुकते, वाढ खुंटते मग एकदा वापरुन पाहा 'हे' ग्लासभर पाणी...

best way to grow money plant at home how to grow money plant faster money plant growth problems solution | मनी प्लांटची पानं पिवळी पडली, वेल वाढतही नाही? मुळाशी घाला 'हे' ग्लासभर पाणी, थंडीतही वेल वाढेल वेगाने...

मनी प्लांटची पानं पिवळी पडली, वेल वाढतही नाही? मुळाशी घाला 'हे' ग्लासभर पाणी, थंडीतही वेल वाढेल वेगाने...

आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांच्याच घरात किमान एक तरी छोटंसं मनी प्लांटच रोप असतंच. मनी प्लांटचे रोप घराची शोभा आणि सौंदर्य वाढवण्यासोबतच घरातील वातावरण प्रसन्न देखील ठेवतात. बरेचजण मोठ्या आवडीने आणि हौसेने घरात मनी प्लांटचे रोप लावतात. पण अनेकदा अशी तक्रार असते की, मनी प्लांटचे रोप सुकायला लागते, त्याची वाढ व्यवस्थित होत नाही, किंवा पानांचा आकार देखील लहान होऊ लागतो. भरपूर प्रयत्न करूनही रोप हिरवेगार आणि टवटवीत राहत नाही. जर तुमच्या मनी प्लांटची अशीच अवस्था झाली असेल आणि रोप सुकलेले, कमकुवत दिसत असेल, तर काळजी करू नका! यासाठी बाजारातून महागडी खते विकत आणण्याची गरज नाही(best way to grow money plant at home).

आपल्या घरात उपलब्ध असलेल्या काही सोप्या आणि घरगुती उपायांनी मनी प्लांटला पुन्हा पहिल्यासारखे हिरवेगार करु शकता. हे उपाय केवळ रोपाला योग्य पोषण देतील असे नाही, तर त्याची वाढ जलद करतील (how to grow money plant faster) आणि त्याची पाने पुन्हा मोठी आणि चमकदार बनवण्यास मदत करतील. काही सोपे आणि (money plant growth problems solution) घरच्याघरी करता येणारे उपाय मनी प्लांटला पुन्हा तजेलदार, हिरवेगार आणि जोमाने वाढण्यास फायदेशीर ठरतील. 

१. थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा :- मनी प्लांटला योग्य ठिकाणी ठेवणे, हे त्याच्या वाढीसाठी सर्वात पहिले महत्त्वाचे असते. या रोपाला कधीही थेट, कडक उन्हात ठेवू नये. थेट सूर्यप्रकाशामुळे त्याची पाने जळू शकतात आणि रोप सुकू शकते. रोपाला नेहमी अशा ठिकाणी ठेवावे जिथे चांगला प्रकाश येत असेल, पण ते सावलीत राहील याची काळजी घ्यावी. उदाहरणार्थ, खिडकीजवळ, जिथे सकाळचे हलके ऊन किंवा दिवसभर हलका प्रकाश येत असेल अशा जागी रोपाला ठेवा. 

२. योग्य पाण्याचे प्रमाण :- विशेषतः थंडीच्या दिवसांत गरजेपेक्षा जास्त पाणी देणे हे मनी प्लांट कोमेजून जाण्याचे एक मोठे कारण आहे. या काळात आठवड्यातून फक्त एकदाच पाणी द्या, किंवा जेव्हा कुंडीतील माती पूर्णपणे कोरडी होईल, तेव्हाच पाणी द्यावे. जर पानांचा रंग पिवळा पडत असेल, तर हे जास्त पाणी दिल्याचा संकेत आहे. अशा परिस्थितीत, पाणी देणे त्वरित बंद करा आणि मातीला पूर्णपणे सुकू द्या. जी पाने सडून गळून पडत आहेत किंवा पिवळी झाली आहेत, त्यांना लगेच रोपापासून काढून टाका, जेणेकरून बुरशी उर्वरित रोपात पसरणार नाही.

३. खत आणि पानांची स्वच्छता :- मनी प्लांटचे सौंदर्य त्याच्या चमकदार पानांमध्ये असते. हे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत, पोषक तत्वे देणे आणि स्वच्छता. खत बनवण्यासाठी: १/४ चमचा कॉफी पावड आणि १/४ चमचा हळद पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट करा. रोपाला जितके पाणी लागते, तेवढेच पाणी या मिश्रणात घाला. हे लिक्विड खत मातीतील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करते. दुसरीकडे, पानांवर साचलेली धूळ आणि माती (Dust and Dirt) त्यांच्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करते.पाने नेहमी ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ ठेवा. जर पानांवर पाण्याचा फवारा मारत असाल, तर पाणी पानांवर थांबून राहणार नाही याची खात्री करा. जर पाणी आपोआप वाळत नसेल, तर ते पुसून स्वच्छ करा.

४. कांद्याच्या सालींचे लिक्विड फर्टीलायझर :- कांद्याच्या साली पाण्यात भिजवून एक दिवसासाठी ठेवा. याऐवजी, तुम्ही सुकलेल्या केळीच्या सालींचा देखील वापर करू शकता. दुसऱ्या दिवशी, कांद्याच्या साली वेगळ्या करा आणि त्या पाण्यात चहापत्तीची बारीक केलेली पावडर मिसळा. हे मिश्रण (लिक्विड फर्टिलायझर) नायट्रोजनची कमतरता पूर्ण करते. हे लिक्विड फर्टिलायझर मनी प्लांटमध्ये टाका. हे खत तुम्ही २० दिवसांच्या अंतराने रोपाला देऊ शकता.

५. खत घालताना लक्षात ठेवा :- खत जास्त प्रमाणात देऊ नये. जास्त खत रोपाला जाळू शकते. माती कोरडी झाल्यावरच खत द्या ओल्या मातीमध्ये कधीही कोणतेही खत घालू नका.

Web Title : मनी प्लांट को पुनर्जीवित करें: रसीला विकास के लिए सरल उपाय

Web Summary : क्या आपका मनी प्लांट बीमार है? अप्रत्यक्ष धूप, उचित पानी, कॉफी-हल्दी मिश्रण या प्याज के छिलके के तरल जैसे घरेलू उर्वरकों से इसे पुनर्जीवित करें और पत्तियों को साफ रखें। स्वस्थ विकास के लिए अधिक उर्वरक से बचें।

Web Title : Revive Your Money Plant: Simple Tips for Lush Growth

Web Summary : Is your money plant ailing? Revive it with indirect sunlight, proper watering, homemade fertilizers like coffee-turmeric mix or onion peel liquid, and keep leaves clean. Avoid over-fertilizing for healthy growth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.