Lokmat Sakhi >Food > Watermelon Halwa: टरबुजाच्या पांढऱ्या भागाचा चवदार, पौष्टिक हलवा! शेफ कुणाल कपूरची खास रेसिपी

Watermelon Halwa: टरबुजाच्या पांढऱ्या भागाचा चवदार, पौष्टिक हलवा! शेफ कुणाल कपूरची खास रेसिपी

How To Make Watermelon Halwa: टरबुजाचा लाल भाग आपण खातो आणि अतिशय पौष्टिक असणारा पांढरा भाग मात्र फेकून देतो. याच पांढऱ्या भागाचा वापर करून चवदार हलवा कसा करायचा, हे सांगितलं आहे प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी..(Kunal Kapoor's special recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 12:43 PM2022-05-18T12:43:35+5:302022-05-18T12:44:21+5:30

How To Make Watermelon Halwa: टरबुजाचा लाल भाग आपण खातो आणि अतिशय पौष्टिक असणारा पांढरा भाग मात्र फेकून देतो. याच पांढऱ्या भागाचा वापर करून चवदार हलवा कसा करायचा, हे सांगितलं आहे प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी..(Kunal Kapoor's special recipe)

Water Melon Halwa Recipe, special recipe by famous chef Kunal Kapoor, nutritious recipe | Watermelon Halwa: टरबुजाच्या पांढऱ्या भागाचा चवदार, पौष्टिक हलवा! शेफ कुणाल कपूरची खास रेसिपी

Watermelon Halwa: टरबुजाच्या पांढऱ्या भागाचा चवदार, पौष्टिक हलवा! शेफ कुणाल कपूरची खास रेसिपी

Highlights तुपाची खमंग चव आणि जोडीला टरबुजाचा मंद मंद सुवास असा खुमासदार हलवा एकदा चाखून बघाच.. 

टरबुजाच्या सालींचा पांढरा आणि हिरवा भाग खरोखरंच आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असतो. पण त्याचा योग्य वापर कसा करावा, हे आपल्याला समजत नाही. म्हणूनच तर हा घ्या त्यावरचा एक मस्त उपाय. टरबूज कापलं की त्यातला गोड असणारा लालसर भाग अगदी बघता बघता संपून जातो आणि पांढऱ्या- हिरव्या सालींना थेट केराची टोपली दाखविली जाते. असं होऊ नये आणि टरबुजाचं (tarbuj halwa) संपूर्ण पोषण आपल्याला मिळावं, यासाठीच बघा ही खास रेसिपी.. टरबुजाचा हलवा.

 

ही रेसिपी प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर (instagram share) केली आहे. एकदा हा हलवा ट्राय करून बघा... अतिशय अप्रतिम चव असणारा हा हलवा एकदा चाखून बघितला की वारंवार करून खावा वाटेल असाच आहे. तुपाची खमंग चव आणि जोडीला टरबुजाचा मंद मंद सुवास असा खुमासदार हलवा एकदा चाखून बघाच.. 

 

टरबुजाच्या सालींमध्ये असणारे गुणधर्म
- टरबुजाच्या या भागांमध्ये सिटोलीना हा घटक मोठ्या प्रमाणात असतो. हा घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
- याशिवाय मधुमेह, हृदयरोग यासारखे आजार नियंत्रित ठेवण्यासाठीही टरबुजाचा पांढरा आणि हिरवा भाग उपयुक्त आहे.

टरबुजाचा फक्त लाल भाग खाता, पांढरा फेकून देता? डॉक्टर सांगतात, टरबूज खाण्याची योग्य पद्धत 

टरबूज हलवा करण्यासाठी लागणारे साहित्य
- टरबुजाच्या ३ मोठ्या फोडी, २ ते ३ टेबलस्पून तूप, १ टेबलस्पून रवा, १ टेबलस्पून बेसन, अर्धा कप साखर, अर्धा टीस्पून वेलची पूड, १ टेबलस्पून बदाम- काजू पावडर, १ कप दूध, टॉपिंगसाठी बदाम आणि पिस्ते.
टरबूज हलवा रेसिपी 
- टरबूज चिरून त्याचे ३ मोठे काप करा. त्याचा लाल भाग काढून टाका आणि हिरवी सालेही पिलरने काढून घ्या.
- आता पांढऱ्या भागाच्या काही लहान फोडी करून घ्या आणि मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट करून घ्या.


- गॅसवर कढई तापत ठेवा. त्यात तूप टाका. तूप वितळले की त्यात रवा आणि बेसन टाका आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या. यानंतर त्यात टरबुजाची मिक्सरमधून केलेली पेस्ट टाका आणि ती देखील चांगली परतून घ्या. 
- यानंतर त्यात साखर, वेलची पावडर टाका.

मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी आता झटपट करा घरीच, टरबुजाच्या सालाचा बघा खास वापर 
- साखर वितळून हलवा थोडा एकजीव होऊ लागला की त्यात दूध आणि बदाम- काजू पावडर टाका.
- मध्यम आचेवर दूध आटेपर्यंत हलवा शिजवावा.
- यानंतर गरमागरम हलवा बाऊलमध्ये सर्व्ह करून त्यावर बदाम, पिस्ते आणि इतर आवडीचा सुकामेवा टाकून टॉपिंग करा. गरमागरम टरबूज फ्लेवर हलवा चवीला अतिशय उत्कृष्ट लागतो. 

 


 

Web Title: Water Melon Halwa Recipe, special recipe by famous chef Kunal Kapoor, nutritious recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.