सकाळचा डबा किंवा रात्रीच्या जेवणात काय बनवायचं हा प्रश्न गृहिणींना रोजच पडतो. त्यात मुलांच्या आवडी-निवडीची देखील आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते.(Kashmiri Dum Aloo) काहीतरी चविष्ट, थोडं वेगळं पण पोटभरीचे पदार्थ आपल्याला बनवावे लागतात.(Dum Aloo recipe) बटाटा हा पदार्थ आपल्या घरात सगळेच आवडीने खातात. अगदी मुलांसुद्धा बटाटा हा खूप आवडतो.(Home-style dum aloo) फ्राईज, बटाट्याची भाजी, रस्सा भाजी किंवा बटाट्यापासून केलेले पदार्थ घरात सगळेच आवडीने खातात. पण अनेकदा बटाट्याची तिची ती भाजी खाऊन वैताग येतो. अशावेळी आपण छोटे बटाटे अर्थात दम आलूची भाजी नक्कीच ट्राय करु शकतो.
ही भाजी बनवताना मसल्यांचा सुवास आणि घरगुती टेस्टमुळे या रेसिपीला आणखी छान चव येते. पाहुण्यांचं जेवणं, मित्रमैत्रिणींची पार्टी किंवा एखाद्या छोट्या सेलिब्रेशनसाठी हा पदार्थ आपण आवडीने बनवू शकतो. घरच्या घरी हॉटेलसारखा दम आलू कसा बनवायचा पाहूया सोपी रेसिपी.
लाडक्या लहान लेकीसाठी चांदीचा खास दागिना, छुमछूम वाजणारे ५ सुंदर पैंजण- लहान मुलींसाठी खास..
साहित्य
छोटे बटाटे - अर्धा किलो
लाल सुक्या मिरच्या - ५ ते ६
काजू - ५ ते ६
गरम पाणी - १ वाटी
तेल - २ चमचा
हळद - १ चमचा
लाल तिखट - १ चमचा
मीठ - चवीनुसार
जिरे - १ चमचा
कढीपत्ता - ५ ते ६ पाने
बारीक चिरलेला कांदा - १ वाटी
बारीक चिरलेली हिरवी मिरची - २ ते ३
आलं-लसूण पेस्ट - १ चमचा
दही - अर्धी वाटी
गरम मसाला - १ चमचा
धणे पावडर - १ चमचा
बारीक चिरलेला टोमॅटो - १ वाटी
कसुरी मेथी - चवीनुसार
कोथिंबीर - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी कुकरमध्ये पाणी घालून बटाटे शिजवून घ्या. त्यानंतर एका वाटीत लाल मिरच्या, काजू आणि गरम पाणी घाला. त्यानंतर बटाट्याची साले काढून घ्या.
2. आता कढईत तेल गरम करुन त्यात हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ घालून बटाटे परतवून ताटात काढून घ्या. पुन्हा कढईत तेल गरम करुन त्यात जिरे, कढीपत्ता आणि कांदा, आले लसूण पेस्ट, हिरवी मिरची घालून चांगले परतवून घ्या. त्यात टोमॅटो घाला.
ढाबा स्टाईल दाल तडका - जीरा राईस, फक्त १५ मिनिटांत, मऊ-मोकळा भात करण्यासाठी टिप्स
3. एका बाऊलमध्ये दही, हळद, गरम मसाला, धणे पावडर घालून सर्व मिक्स करुन घ्या. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात तयार दह्याचे मिश्रण घालून परतवून घ्या. आता परतवलेले बटाटे घाला. मिक्सरच्या भांड्यात लाल मिरच्या आणि काजूची पेस्ट करुन मसाल्यात घाला. मसाल्याला छान उकळी आपल्यानंतर त्यात कसुरी मेथी आणि कोथिंबीर घाला. तयार होईल चटपटीत दम आलू.
