Lokmat Sakhi >Food > Sabudana Papdi Recipe : न शिजवता करा साबुदाण्याच्या तिप्पट फुलणाऱ्या पापड्या; पाहा सोपी पारंपरिक रेसिपी

Sabudana Papdi Recipe : न शिजवता करा साबुदाण्याच्या तिप्पट फुलणाऱ्या पापड्या; पाहा सोपी पारंपरिक रेसिपी

Sabudana Papdi Recipe : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणाऱ्या या पारंपरिक पद्धतीच्या पापड्या कशा करायच्या पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 11:06 AM2022-05-12T11:06:23+5:302022-05-12T11:09:35+5:30

Sabudana Papdi Recipe : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणाऱ्या या पारंपरिक पद्धतीच्या पापड्या कशा करायच्या पाहूया...

Sabudana Papdi Recipe: Make uncooked papadas of sabudana; Here's a simple traditional recipe | Sabudana Papdi Recipe : न शिजवता करा साबुदाण्याच्या तिप्पट फुलणाऱ्या पापड्या; पाहा सोपी पारंपरिक रेसिपी

Sabudana Papdi Recipe : न शिजवता करा साबुदाण्याच्या तिप्पट फुलणाऱ्या पापड्या; पाहा सोपी पारंपरिक रेसिपी

Highlightsसाबुदाणा भिजवून तो शिजवून पापड्या करायच्या असतील तर कधी पाण्याचा अंदाज न आल्याने या पापड्या चुकण्याची शक्यता असते. कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी कष्टात होणाऱ्या या पापड्या खायला फार मस्त लागतात

साबुदाण्याच्या पापड्या आवडत नाहीत असा व्यक्ती सापडणे विरळाच. तोंडात टाकल्या की विरघळणाऱ्या या साबुदाण्याच्या पापड्या म्हणजे वाळवणाच्या प्रकारांपैकी एक आवडता प्रकार. कमी खर्चात आणि झटपट होणाऱ्या या भरपूर फुलणाऱ्या पापड्या खायला छान वाटते. गेल्या काही वर्षात वाळवण प्रकार घरी करणे कमी झाले असले तरी अतिशय कमी वेळात होणाऱ्या साबुदाणा पापड्या घरी केल्या तर विकतचे तळकट पदार्थ खायची इच्छाच होणार नाही. विशेष म्हणजे या पापड्या न शिजवता करायच्या असल्याने अतिशय कमी कष्टात आणि पटकन होतात (Sabudana Papdi Recipe). या पद्धतीमुळे प्रत्येक साबुदाणा वेगळा फुलत असल्याने खायला तर या पापड्या खूपच छान लागतात. उपवासाच्या दिवशी किंवा एरवीही मधे काही खायची इच्छा झाली तर विकतच्या पॅकमधील तळकट पदार्थ खाण्यापेक्षा घरात स्वच्छतेत केलेल्या आणि मुख्य घरच्या तेलात तळलेल्या या पापड्या हा उत्तम पर्याय ठरतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणाऱ्या या पारंपरिक पद्धतीच्या पापड्या कशा करायच्या पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य -

१. पाणी - ७ वाट्या

२. साबुदाणा - १ वाटी

३. बटाटे - २ ते ३ मध्यम आकाराचे

४. जीरे - १ चमचा 

५. हिरवी मिरची - ५ ते ६ (बारीक वाटलेल्या)

६. मीठ - चवीनुसार

(Image : Google)
(Image : Google)

कृती - 

१. रात्री झोपताना एका मोठ्या पातेल्यात ७ वाटी पाणी घेऊन ते उकळेपर्यंत गरम करायचे.

२. चांगली उकळी आली की गॅस बंद करुन एक वाटी कच्चा साबुदाणा या पाण्यात घालायचा.

३. पातेल्यावर झाकण ठेवून रात्रभर हे तसेच ठेवायचे. सकाळपर्यंत हा साबुदाणा खूप फुलतो. 

४. मग यामध्ये जीरे, मिक्सरमध्ये बारीक केलेली मिरची आणि मीठ घालायचे. 

५. बटाट्याची साले काढून ते किसून या मिश्रणात घालायचे. 

६. सगळे एकजीव करुन प्लास्टीकच्या पेपरवर याच्या पापड्या घालायच्या.

७. संध्याकाळी या पापड्या अर्धवट ओल्या असताना उलटून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजुने ऊन द्यायचे.

८. तुम्हाला पूर्ण साबुदाणा नको असेल तर सकाळी उठल्यावर तुम्ही रात्रभर भिजलेला साबुदाणा मिक्सरवर बारीक करुन मग पापड्या घालू शकता.

९. साबुदाणा भिजवून तो शिजवून पापड्या करायच्या असतील तर कधी पाण्याचा अंदाज न आल्याने या पापड्या चुकण्याची शक्यता असते. 
 

Web Title: Sabudana Papdi Recipe: Make uncooked papadas of sabudana; Here's a simple traditional recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.