Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > जेवणात तोंडी लावायला काहीतरी चटकदार हवंय? राजस्थानी स्टाईलची लसूण चटणी करा, जेवणाची मजा वाढेल

जेवणात तोंडी लावायला काहीतरी चटकदार हवंय? राजस्थानी स्टाईलची लसूण चटणी करा, जेवणाची मजा वाढेल

Rajasthani Food: राजस्थानी पद्धतीने केलेली लसूण चटणी एकदा चाखून पाहायलाच हवी..(Rajasthani style garlic chutney recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2025 15:11 IST2025-12-02T15:10:14+5:302025-12-02T15:11:20+5:30

Rajasthani Food: राजस्थानी पद्धतीने केलेली लसूण चटणी एकदा चाखून पाहायलाच हवी..(Rajasthani style garlic chutney recipe)

Rajasthani style garlic chutney, garlic chutney recipe | जेवणात तोंडी लावायला काहीतरी चटकदार हवंय? राजस्थानी स्टाईलची लसूण चटणी करा, जेवणाची मजा वाढेल

जेवणात तोंडी लावायला काहीतरी चटकदार हवंय? राजस्थानी स्टाईलची लसूण चटणी करा, जेवणाची मजा वाढेल

Highlightsराजस्थानमध्ये नुसत्या लसणाची एक अतिशय चवदार चटणी केली जाते. ती करायला अतिशय सोपी असून कशी करायची ते पाहूया..

चटणी, कोशिंबीर, लोणचं यासारखे पदार्थ जेवणाची रंगत वाढवत नेतात. कधी कधी मग भाजी, वरण किंवा आमटी यांची चव थोडी जमली नाही तरी चालते. कारण तोंडी लावायला चटण्या, कोशिंबीरी यांचे वेगवेगळे स्वाद असतातच.. आता दाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, जवस चटणी असे चटण्यांचे कित्येक वेगवेगळे प्रकार आपण करतोच. त्या चटण्या अधिक चवदार होण्यासाठी त्यात लसूणही घातलेलाच असताे. पण राजस्थानमध्ये मात्र नुसत्या लसणाची एक अतिशय चवदार चटणी केली जाते (Rajasthani Food). ती करायला अतिशय सोपी असून कशी करायची ते पाहूया..(Rajasthani style garlic chutney recipe)

राजस्थानी पद्धतीची लसूण चटणी रेसिपी

 

साहित्य

१ लहान आकाराची वाटी भरून लसूण पाकळ्या

१ टेबलस्पून लाल तिखट

१ टेबलस्पून धनेपूड

तरुणपणात केलेल्या 'या' चुकांमुळे सडपातळ महिलाही चाळिशीनंतर लठ्ठ होतात! बघा तुमचंही तिथेच चुकतंय का

चवीनुसार मीठ

फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि जिरे

अर्धा चमचा लिंबाचा रस

बारीक चिरलेली कोथिंबीर

रेसिपी

 

राजस्थानी पद्धतीची लसूण चटणी करण्यासाठी लसूणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये घाला. त्यातच तिखट, जिरेपूड, मीठ घालून लसूण ठेचून घ्या. जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरचा वापरही करू शकता.
आणि चटणी कमी तिखट हवी असेल तर लाल तिखटाच्या ऐवजी काश्मिरी लाल तिखटही वापरू शकता.

रात्री पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन पाय ओढल्यासारखे होतात? पाहा त्यामागची ३ कारणं आणि सोपे घरगुती उपाय

आता एका छोट्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात फोडणी करून घ्या. आता या फोडणीमध्ये वाटलेला लसूण, लाल तिखट आणि थोडं पाणी घाला. तेल सुटेपर्यंत मंद आचेवर चटणी चांगली परतून घ्या. यानंतर सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. मस्त चटपटीत राजस्थानी स्टाईलची लसूण चटणी तयार. 


 

Web Title : राजस्थानी लहसुन की चटनी: इस रेसिपी से खाने का स्वाद बढ़ाएँ!

Web Summary : आसान राजस्थानी शैली की लहसुन की चटनी के साथ अपने भोजन को स्वादिष्ट बनाएं! लहसुन, लाल मिर्च पाउडर और धनिया पाउडर जैसी सरल सामग्री से बनी, यह एक स्वादिष्ट मसाला है जो किसी भी व्यंजन को बढ़ा देता है। मिनटों में तैयार!

Web Title : Rajasthani Garlic Chutney Recipe: Spice up your meal with this!

Web Summary : Spice up your meals with this easy Rajasthani-style garlic chutney! Made with simple ingredients like garlic, red chili powder, and coriander powder, it's a flavorful condiment that enhances any dish. Ready in minutes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.