Lokmat Sakhi >Food > Milk benefits : अरे व्वा! दूधाच्या सेवनानं हा गंभीर आजार कायमचा राहील दूर; नवीन संशोधनातून खुलासा

Milk benefits : अरे व्वा! दूधाच्या सेवनानं हा गंभीर आजार कायमचा राहील दूर; नवीन संशोधनातून खुलासा

Milk benefits Research : नवीन संशोधनात असे समोर आले आहे की दररोज एक ग्लास दुधाचे सेवन केल्यास गंभीर हृदयविकारांचा धोका टाळता येतो. आयुर्वेदात दुधाला संपूर्ण आहार म्हणतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 11:52 AM2021-05-30T11:52:18+5:302021-05-30T12:03:20+5:30

Milk benefits Research : नवीन संशोधनात असे समोर आले आहे की दररोज एक ग्लास दुधाचे सेवन केल्यास गंभीर हृदयविकारांचा धोका टाळता येतो. आयुर्वेदात दुधाला संपूर्ण आहार म्हणतात.

Milk benefits : Research reveals drinking milk daily will reduce the risk of heart attack and there is no link increased cholesterol level | Milk benefits : अरे व्वा! दूधाच्या सेवनानं हा गंभीर आजार कायमचा राहील दूर; नवीन संशोधनातून खुलासा

Milk benefits : अरे व्वा! दूधाच्या सेवनानं हा गंभीर आजार कायमचा राहील दूर; नवीन संशोधनातून खुलासा

दूधाच्या  सेवनानं शरीर नेहमी चांगले राहते याशिवाय अनेक आजारांचा धोका कमी होतो. रोज एक ग्लास दूध प्यायल्यानं आपला आहार पूर्ण होतो.  दूधात प्रोटीन्स,  गुड फॅट्स, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामीन डी, बी २, व्हिटामीन बी १२, पोटॅशिमय, फॉस्फोरस आणि सेलेनियम सारखे पोषण तत्व असतात.  दुधाविषयी संशोधन केले गेले आहे, ज्यामध्ये अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. नवीन संशोधनात असे समोर आले आहे की दररोज एक ग्लास दुधाचे सेवन केल्यास गंभीर हृदयविकारांचा धोका टाळता येतो. आयुर्वेदात दुधाला संपूर्ण आहार म्हणतात.

संशोधनानुसार दररोज दुधाचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रणात राहते. या संशोधनात दोन दशलक्ष अमेरिकन आणि ब्रिटिश नागरिकांचा सहभाग होता, ज्याचा निकाल आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया आपण दुधाचे सेवन केल्यास किती निरोगी राहू शकाल.

दूध पीत असलेल्यांमध्ये गुड आणि बॅड कॉलेस्ट्रॉल आढळून आले.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटीमध्ये प्रकाशित केलेल्या माहितीनुसार नियमितपणे पुरेसे दूध पित असलेल्या लोकांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते, चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे.  कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असतात. उच्च घनतेचे लिपोप्रोटिन आणि कमी घनतेचे लिपोप्रोटिन.

संशोधनात काही लोकांना असे आढळले की उच्च-घनतेचे लिपोप्रोटीन म्हणजे एचडीएल कोलेस्ट्रॉल चांगले होते, तर कमी घनतेचे लिपोप्रोटिन अर्थात बॅड कोलेस्ट्रॉल बर्‍याच लोकांमध्ये आढळले. या संशोधनाबरोबरच असेही समोर आले आहे की दररोज दूध पिणार्‍या लोकांचे बॉडी मास इंडेक्स सरासरीपेक्षा जास्त असल्याचे आढळले.

दुधामुळे हृदयविकाराचा धोका 14% कमी होतो

संशोधनात असेही दिसून आले आहे की जे लोक दररोज एक ग्लास दुधाचे सेवन करतात. त्यांच्यात हृदयविकाराचा धोका 14% कमी होतो. मागील संशोधनात देखील असे दिसून आले आहे की सॅच्यूरेटेड फॅट्स हृदयरोगाच्या उच्च जोखमीशी संबंधित असू शकते. तर, संशोधनानुसार, रेड मीट सारख्या चरबीयुक्त पदार्थांप्रमाणे सॅच्यूरेटेड फॅट्स समृद्ध दूध आरोग्यास घातक नाही.

हेल्दी डाएटमध्ये दुधाचा समावेश करा

यूनिवर्सिटी ऑफ रीडिंगमधील न्यूट्रिशनिस्ट आणि संशोधक प्राध्यापक विमल करानी म्हणाले की हृदयरोग रोखण्यासाठी दुधाचा आरोग्यदायी आहारात समावेश केला जाऊ शकतो. संशोधनाच्या निष्कर्षांवरून स्पष्ट होते की, दुधाचा वापर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाच्या जोखमीसाठी कारणीभूत ठरत नाही. तथापि, दूध पिणार्‍यांमध्ये बॉडी मास इंडेक्स आणि बॉडी फॅटमध्ये किंचित वाढ झाली आहे.

संशोधनात एवढ्या लोकांचा समावेश 

यूनिवर्सिटी ऑफ रीडिंग, दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, दक्षिण ऑस्ट्रेलियन आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन संस्था, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि ऑकलंड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संयुक्तपणे दुधावर नवीन संशोधन केले आहे. या संशोधनात अमेरिकन आणि ब्रिटिश नागरिकांच्या सुमारे 2 दशलक्ष लोकांचा डेटा घेण्यात आला. या संशोधनानंतर पुढे आले आहे ज्यात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले जात आहे.

दूधाच्या सेवनाचे फायदे

दूधात ट्रीप्टोफन नावाचं अमिनो अॅसिड दुधात आढळतं. यामुळे झोपेच्या हार्मोन्सचा स्तर वाढतो. याच कारणाने रात्री दूध प्यायल्यास चांगली झोप लागते. रात्री दूध प्यायल्याने यातील फॅट आणि प्रोटीन्स मेल हार्मोन्स अक्टिव होतात. याने प्रजनन क्षमताही वाढते.

तज्ज्ञ सांगतात की, हाडांच्या मजबूतीसाठी दूध फार महत्त्वाचं आहे. दुधात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात. जे हाडांना मजबूती देण्याचं काम करतात. जर तुम्ही रात्री दूध प्यायलात तर याचा फायदा अधिक होतो.जर तुम्ही रात्री गरम दूध सेवन केलं जर तुमची पोटाची समस्या दूर होण्यास मदत होते. दोन्ही प्रकारचे फायबर दुधात असल्याने पोटाची समस्या दूर होते. दुधात भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. याने मांसपेशींचा विकास होण्यास मोठा फायदा होतो. प्रोटीन आणि फायबर हे दोन्ही महत्त्वपूर्ण पोषक तत्वे आहेत. जे आपल्या शरीराला वजन कमी करण्यास मदत करतात.

रात्री दूध प्यायल्याने तुम्हाला कॅलरी बर्न करण्यास फार फायदा होतो. कारण दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप लागते आणि चांगल्या झोपेने कॅलरी बर्न होतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ते सेवन करताना त्यात साखर, चॉकलेट किंवा कोणताही फ्लेवर टाकू नये.

Web Title: Milk benefits : Research reveals drinking milk daily will reduce the risk of heart attack and there is no link increased cholesterol level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.