Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > अतिशय आरोग्यदायी असणारे चटपटीत लिंबू क्रश लोणचे! १० मिनिटांत लोणचे तयार- घ्या सोपी रेसिपी

अतिशय आरोग्यदायी असणारे चटपटीत लिंबू क्रश लोणचे! १० मिनिटांत लोणचे तयार- घ्या सोपी रेसिपी

Limbu Crush Pickle Recipe: लिंबाच्या सालांमध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचा लाभ शरीराला मिळवून देणारे चटपटीत लिंबू क्रश लोणचे कसे करायचे ते पाहा..(how to make limbu crush achar?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2025 11:54 IST2025-12-09T11:53:21+5:302025-12-09T11:54:22+5:30

Limbu Crush Pickle Recipe: लिंबाच्या सालांमध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचा लाभ शरीराला मिळवून देणारे चटपटीत लिंबू क्रश लोणचे कसे करायचे ते पाहा..(how to make limbu crush achar?)

limbu crush pickle recipe, how to make limbu crush achar, instant lemon pickle recipe, nimbu ka achar recipe   | अतिशय आरोग्यदायी असणारे चटपटीत लिंबू क्रश लोणचे! १० मिनिटांत लोणचे तयार- घ्या सोपी रेसिपी

अतिशय आरोग्यदायी असणारे चटपटीत लिंबू क्रश लोणचे! १० मिनिटांत लोणचे तयार- घ्या सोपी रेसिपी

Highlightsया लोणच्याला अजिबात कडवटपणा येत नाही. ते सालांसकट खाल्ले जाते आणि त्याचा पुरेपूर लाभ शरीराला होतो.

लिंबाचं लोणचं आपण नेहमीच करतो. कैरीच्या लोणच्यापेक्षाही लिंबाचं लोणचं अधिक आरोग्यदायी मानलं जातं. लिंबाचं लोणचं पाचक तर असतंच पण त्यातून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळत असल्याने ते रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही मदत करतं. असं म्हणतात की लिंबाच्या सालांमध्येही भरपूर पौष्टिकता असते. पण बहुतांश लोक लोणच्यामधला लिंबाचा गर खातात आणि सालं मात्र तसेच टाकून देतात. त्यामुळे लिंबू लोणचं खाऊनही शरीराला पुरेसा लाभ होत नाही. म्हणूनच आता लिंबाच्या सालींसकट केले जाणारे लिंबू क्रश लोणचे करून पाहा (limbu crush pickle recipe). या लोणच्याला अजिबात कडवटपणा येत नाही (how to make limbu crush achar?). त्यामुळे ते सालांसकट खाल्ले जाते आणि त्याचा पुरेपूर लाभ शरीराला होतो.(instant lemon pickle recipe)

लिंबू क्रश लोणचे करण्याची रेसिपी

 

साहित्य

८ ते १० लिंबू

१ टेबलस्पून लाल तिखट

१ टेबलस्पून जिरेपूड

१ टेबलस्पून लोणचे मसाला

२ रुपयांचा कॉफी सॅशे चेहरा टाकतो उजळवून, चेहऱ्यावरचा ग्लो असा की महागडे कॉस्मेटिक्सही ठरतात फिके

१ टीस्पून हळद

फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग

चवीनुसार मीठ आणि १ वाटी साखर 

 

कृती

लिंबू क्रश लोणचे करण्यासाठी सगळ्यात आधी लिंबू मिठाच्या पाण्यात घालून स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर पुर्णपणे पुसून कोरडे करून घ्या.

लिंबाच्या फोडी कापून घ्या. साधारण एका लिंबाच्या आठ फोडी कराव्या आणि त्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या बिया काढून टाका. लोणच्यामध्ये एकही बी राहणार नाही याची काळजी घ्या. कारण बिया राहिल्या तर लोणच्याला कडवटपणा येतो.

हिवाळ्यात तुळस हिरवीगार ठेवण्यासाठी ५ उपाय- भराभर वाढून तुळस होईल डेरेदार...

त्यानंतर लिंबाच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यामध्ये मीठ, तिखट, लोणचं मसाला घालून त्या अर्धवट फिरवून घ्या. त्यानंतर साधारण जेवढा लिंबाचा गर असेल त्याचा पाऊण भाग एवढी त्यात साखर घाला आणि साखरेसकट पुन्हा सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या.

यानंतर तयार झालेला लिंबू क्रश एका भांड्यात काढा आणि त्याला वरून कडकडीत फोडणी घाला. हे लोणचं अतिशय चवदार होतं आणि शिवाय १- २ महिने तरी चांगलं टिकतं. 


 

Web Title : खट्टा और स्वास्थ्यवर्धक नींबू क्रश अचार: एक त्वरित रेसिपी!

Web Summary : मिनटों में पौष्टिक नींबू क्रश अचार बनाएं! यह रेसिपी अधिकतम स्वास्थ्य लाभ और बेहतर प्रतिरक्षा के लिए छिलके सहित पूरे नींबू का उपयोग करती है। एक खट्टे, स्वादिष्ट व्यंजन का आनंद लें जो सिर्फ 10 मिनट में तैयार हो जाता है!

Web Title : Tangy and Healthy Lemon Crush Pickle: A Quick Recipe!

Web Summary : Make nutritious lemon crush pickle in minutes! This recipe uses whole lemons, including peels, for maximum health benefits and enhanced immunity. Enjoy a tangy, flavorful condiment that's ready in just 10 minutes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.