Lokmat Sakhi >Food > Kitchen Tips : एक महिनाभर फ्रीजमध्ये 'असे' ठेवा कोथिंबीर-पुदिना, ना सडतील, ना दुर्गंध येईल!

Kitchen Tips : एक महिनाभर फ्रीजमध्ये 'असे' ठेवा कोथिंबीर-पुदिना, ना सडतील, ना दुर्गंध येईल!

Kitchen Tips : पुदिन्याला व्यवस्थित साठवून ठेवून तुम्ही दीर्घकाळ त्याचा वापर करू शकता. याशिवाय त्याचा वास फ्रिजमधल्या इतर पदार्थांचा येऊ नये याचीही तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 05:42 PM2021-07-28T17:42:45+5:302021-07-28T18:22:32+5:30

Kitchen Tips : पुदिन्याला व्यवस्थित साठवून ठेवून तुम्ही दीर्घकाळ त्याचा वापर करू शकता. याशिवाय त्याचा वास फ्रिजमधल्या इतर पदार्थांचा येऊ नये याचीही तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.

Kitchen Tips : How to store pudina aka mint for long time | Kitchen Tips : एक महिनाभर फ्रीजमध्ये 'असे' ठेवा कोथिंबीर-पुदिना, ना सडतील, ना दुर्गंध येईल!

Kitchen Tips : एक महिनाभर फ्रीजमध्ये 'असे' ठेवा कोथिंबीर-पुदिना, ना सडतील, ना दुर्गंध येईल!

Highlightsपुदिना आणून फ्रिजमध्ये ठेवला असेल तर कोणत्यावेळी वापरायला बरं पडतं. पुदिना खूप कमी वेळा बाजारात दिसून येतो.कोथिंबिर आणि पुदिन्याचा सुगंध त्याचा ताजेपणा अनेक दिवस  टिकून राहण्यासाठी काही टिप्स नक्की उपयोगी पडतील.

पावसाळ्यात सारखं सारखं खाली जायला लागू नये म्हणून आपण पुदिना, कोथिंबरी, ओला  मसाला जास्तीचा आणून  ठेवत असतो. खासकरून पुदिना वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवण्यासाठी आपल्याला लागतो पण नेमका हवा तेव्हा दुकानात मिळत नाही. अशावेळ जास्तीचा पुदिना आणून फ्रिजमध्ये ठेवला असेल तर कोणत्यावेळी वापरायला बरं पडतं. पुदिना खूप कमी वेळा बाजारात दिसून येतो.

पुदिन्याला व्यवस्थित साठवून ठेवून तुम्ही दीर्घकाळ त्याचा वापर करू शकता. याशिवाय त्याचा वास फ्रिजमधल्या इतर पदार्थांचा येऊ नये याचीही तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कोथिंबिर आणि पुदिन्याचा सुगंध त्याचा ताजेपणा अनेक दिवस  टिकून राहण्यासाठी काही टिप्स नक्की उपयोगी पडतील.

एक आठवड्यापर्यंत पुदिना, कोथिंबिर फ्रेश राहिल

जर आपण कोथिंबीर, पुदीन्याची पानं एका आठवड्यासाठी घेतली असतील तर ती ताजी  राहण्यासाठी मूळासह विकत घेण्याचा प्रयत्न करा. जरी तसे नसले तरी बाजारातून असा पुदीना खरेदी करा ज्याची पानं जाड असतील आणि ताजी असतील. सगळ्यात आधी पुदीना स्वच्छ करा आणि लक्षात ठेवा की साफ करताना  मुळाशी किंवा देठावर परिणाम होणार नाही. माती नीट साफ केल्यावर. एका काचेच्या ग्लासात पाणी घालून पुदिना ठेवा.  देठ पाण्यात बुडेल इतपत पाणी ग्लासात असावं.  रूम टेम्परेचरवर पुदिना 5 दिवस ताजा राहील. नंतर आपण ग्लाससह फ्रीजमध्ये ठेवू शकता. जर पाणी काही दिवसांनी खराब झाल्यासारखं वाटत असेल तर बदलू शकता. कोंथिंबीरीच्या बाबतीतही तुम्ही हिच टिप वापरू शकता.

१५ दिवस टिकवून ठेवायचं असेल या टिप्स फॉलो करा

सगळ्यात आधी पुदिना, कोथिंबीरीचे देठ कापा.  जास्तवेळ भाजी साठवून ठेवण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.  धुवून झाल्यावर पंख्याखाली किंवा सूर्यप्रकाशामध्ये सुमारे 20-30 मिनिटे ठेवा जेणेकरून त्याचा ओलावा बाहेर पडेल. जर त्यात काही ओलावा असेल तर ते पुदीना खराब होईल. आपण इच्छित असल्यास, आपण ते १ तास कोरडे ठेवण्यासाठी बाजूला ठेवू शकता, परंतु त्यापेक्षा जास्त वेळ घेऊ नये. त्यानंतर एका कापडाला पुदिना रॅप करा आणि फ्रिजमध्ये ठेवून द्या. या ट्रिकनं  जास्त दिवस पुदिना, कोथिंबीर चांगली राहिल. 

१ महिना पुदिना चांगला  ठेवण्यासाठी टिप्स 

सगळ्यात आधी पुदिना धुवून सुकवून घ्या नंतर देठ काढून घ्या आणि एका प्लास्टीक बॅगेत रॅप करा. या बॅगेत कोणत्या प्रकारचं मॉईश्चर असू नये. आतमध्ये हवा असल्यास दाबून काढून टाका. ही बॅग फ्रिजमध्ये व्यवस्थित ठेवून तुम्ही  १५ ते २० दिवसांपर्यंत पुदिना चांगला ठेवू शकता.  रोजच्या वापराला हवा तेवढा काढून परत तसाच व्यवस्थित ठेवून द्या.

आईस क्यूब स्वरूपात महिनाभर स्टोअर करू शकता.

बर्फाच्या  तुकड्यांच्या स्वरूपात पुदीना देखील साठवला जाऊ शकतो. पुदीनाची पाने धुवून घ्या मग चिरून घ्या त्यामध्ये माती राहणार नाही याची काळजी घ्या. यानंतर, थोडसं पाणी घालून बर्फाच्या ट्रेमध्ये पुदीना गोठवा.आता पुदीनाची पाने फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्यानुसार बर्फाचे तुकडे काढून वापर करा.
 

Web Title: Kitchen Tips : How to store pudina aka mint for long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.