हिवाळा सुरू झाला आहे. याच दरम्यान लोक शरीर उबदार ठेवण्यासाठी जास्त चहा आणि कॉफी पितात. तसेच तहान कमी लागत असल्यामुळे कमी पाणी प्यायलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का की जास्त चहा आणि कॉफी प्यायल्याने तुमच्या गुडघ्यांच्या आणि हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो? जास्त चहा किंवा कॉफी प्यायल्याने शरीरात कॅफिन आणि शुगरचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे डिहायड्रेशन होतं.
एम्स रायपूर येथील ऑर्थोपेडिक अँड स्पोर्ट्स इंजरी सर्जन डॉ. दुष्यंत चौहान यांनी अलीकडेच एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हिवाळ्यात जास्त चहा आणि कॉफी पिणं का टाळावं आणि ते टाळण्यासाठी काय करता येईल हे स्पष्ट केलं. डॉ. दुष्यंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही गरम चहा पीत असलात तरी, तो तुमच्या हाडांना थंड करू शकतो. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण त्यामागे एक कारण आहे.
हिवाळा येताच, आपण स्वतःला उबदार ठेवण्यासाठी जास्त चहा आणि कॉफी पिण्यास सुरुवात करतो. दुसरीकेडे या ऋतूमध्ये, आपण पाण्याचं सेवन कमी करतो, ज्यामुळे डिहायड्रेशन होतं, ज्यामुळे गुडघ्यांमधील कार्टिलेज (दोन हाडांमधील उशी म्हणून काम करणारा मऊ थर) सुकतो. यामुळे सांध्यातील कडकपणा वाढतो आणि हाडांमधील घर्षणामुळे वेदना वाढतात. म्हणून शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि हाडांवर जास्त दबाव टाळण्यासाठी हिवाळ्यात चहा आणि कॉफी कमी प्रमाणात पिणं महत्त्वाचं आहे.
डॉ. चौहान सल्ला देतात की, हिवाळ्यात तुम्ही चहा आणि कॉफी नक्कीच प्यावी, परंतु ते पिण्यापूर्वी पाणी पिण्याचा नियम बनवा. यामुळे तुमचे सांधे हायड्रेटेड आणि निरोगी राहण्यास मदत होते. म्हणून जर तुम्ही हिवाळ्यात चहा आणि कॉफी पीत असाल तर आधी पाणी पिण्यास विसरू नका. यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहीलच, शिवाय हिवाळ्यात गुडघेदुखीपासूनही आराम मिळेल.
