शेव हा पदार्थ करायला अगदी सोपा आहे. शेवेचे विविध प्रकार असतात. त्यातील एक मस्त प्रकार म्हणजे लसूण शेव. हा पदार्थ खमंग आणि चविष्ट असा असतो. तो करायला खूप सोपा असून घरच्या घरी पटकन तयार करता येतो. मुख्य म्हणजे साहित्यही अगदी मोजकेच लागते. जास्त खटाटोप न करता मस्त शेव करता येते. लसणामुळे शेवला खास चव आणि हलका तिखटपणा येतो. लसूण शेव लोकप्रिय पदार्थ आहे. घरच्या घरी केलेली शेव ताजी, कुरकुरीत आणि खमंग राहते. दिवाळी किंवा इतर सणांमध्ये ही शेव खूप लोकप्रिय असते कारण ती सहज करता येते आणि सर्वांना आवडतेही. चहा-नाश्त्यासोबत, भेळ किंवा मिसळमध्ये घालूनही ती चविष्ट लागते. त्यामुळे दिवाळीसाठी लसूण शेव नक्की करा. पाहा सोपी रेसिपी.
साहित्य:बेसन, लसूण, हळद, लाल तिखट, मीठ, तेल, पाणी
कृती:१. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. लसूण भरपूर वापरा. त्याची चव आणि सुगंध शेवेला यायला हवा. एकका मोठ्या आणि खोलगट पातेल्यात बेसन चाळून घ्यायचे. त्यात हळद, लाल तिखट चवी पुरते मीठ घालायचे आणि मिक्स करायचे.
२. थोडे थोडे पाणी घालत घट्ट असे पीठ मळून घ्यायचे. जास्त मऊसर होणार नाही याची काळजी घ्यायची. मध्यम असे पीठ मळून घ्यायचे. पीठ मळून झाल्यावर त्याचे गोळे तयार करायचे आणि बाजूला ठेवायचे.
३. शेवेचे यंत्र मिळते. चकलीसाठी जे यंत्र वापरले जाते त्यात शेवेसाठीही चकती असते. तिचा वापर करुन शेव पाडा. त्यासाठी कढईत तेल गरम करत ठेवा. तेल तापल्यावर त्यात हळूहळू शेव सोडा आणि तळून घ्या. जाड बारीक जशी हवी तशी तळा.
४. मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे. नंतर शेव काढून टिश्यू पेपरवर ठेवा, जास्त तेल शोषले जाईल. शेव गार होण्याची वाट पाहा. (It's very easy to make crispy and delicious garlic shev at home with very few ingredients.)तेलात लसूणही तळून घ्यायचा. शेव एका डब्यात काढून घ्यायची. त्यात तळलेली लसूणही घालायची. त्यात थोडे लाल तिखट घाला आणि डबा हलवून घ्या. त्यातील शेव आणि चिवडा एकत्र करुन घ्या.
Web Summary : Make delicious, crispy garlic shev at home with this easy recipe. It requires minimal ingredients like besan, garlic, and spices. Perfect for snacks or festive occasions, this homemade shev is tastier and fresher than store-bought.
Web Summary : घर पर बनाएं स्वादिष्ट और कुरकुरी लहसुन सेव इस आसान रेसिपी से। इसमें बेसन, लहसुन और मसालों जैसी कम सामग्री की आवश्यकता होती है। नाश्ते या त्योहारों के लिए बिल्कुल सही, यह घर का बना सेव बाजार से बेहतर है।