घरात भात शिजवला आणि तो उरला की अनेकांना फेकून देण्याचे जीवावर येते. त्या भाताला पाहून आपल्या मनात एकच प्रश्न येतो आता याचं काय करायचं? गरम करुन खायला देखील अनेकदा जीवावर येते.(Leftover rice recipe) अशावेळी आपण फोडणीचा भात, खिचडी, भाताचे पॅनकेक किंवा दहीभात असे पदार्थ खातो. पण तोच तो पदार्थ बनवून किंवा मुलांना खायला देखील जीवावर येते.(Quick breakfast recipes) मुलांना कायमच काही तरी चटपटीत खाण्याची इच्छा होत असते. इडली, डोसा किंवा मेदूवडा, उत्तप्पा हा मुलांचा आवडता पदार्थ. अनेकदा हे पदार्थ बनवणं म्हणजे वेळखाऊ कामच.(Indian snacks recipe) तांदूळ भिजत घालण्यापासून ते त्याला वाटणं, आंबवणं ही प्रोसस फार मोठी. त्यात बॅटर व्यवस्थित फुगले नाही तर डोसा किंवा इडली चिकटून राहते. ज्यामुळे पुन्हा बनवण्याची इच्छा देखील आपल्याला होत नाही.
सकाळच्या घाईगडबडीत आपल्याला वेगळे आणि चविष्ट काही बनवायचे असेल तर उरलेल्या भातापासून आपण उत्तप्पा बनवू शकतो. याला ना आंबवण्याची गरज आहे ना भिजवण्याची. अगदी १० मिनिटांत होणारा उत्तप्पा कसा बनवयाचा पाहूया. यासाठी लागणारे साहित्य जाणून घ्या.
अस्सल काश्मिरी दम आलू करण्याची पारंपरिक रेसिपी, हॉटेलपेक्षा भारी दम आलू करा घरी फक्त १५ मिनिटांत
साहित्य
उरलेला भात - १ वाटी
रवा - १ वाटी
दही - १ वाटी
पाणी - आवश्यकतेनुसार
मीठ - चवीनुसार
बेकिंग सोडा - अर्धा चमचा
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात उरलेला भात, रवा, दही, पाणी आणि मीठ घालून त्याचे बॅटर तयार करुन घ्यावे लागेल.
2. आता एका बाऊलमध्ये मिक्सरच्या भांड्यातील बॅटर काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून त्याचा घोळ तयार करा. आणि ते पाणी बाऊलमध्ये घाला.
3. चमच्याच्या सहाय्याने बॅटर व्यवस्थित फेटून घ्या. त्यात बेकिंग सोडा घालून मिश्रण परत फेटा. तव्यावर पॅन गरम करुन त्यावर बॅटर पसरवा. दोन्ही बाजूने शिजल्यानंतर चटणीसोबत खा गरमागरम जाळीदार उत्तप्पा. हवं असल्यास आपण यात भाज्या देखील घालू शकतो.
