हिवाळा सुरू झाला की आपल्याला आळस चढतो. हातपाय गार पडायला लागतात आणि शरीराला जास्त ताकदीची गरज भासते.(multigrain dosa) अशावेळी रोजच्या आहारात काहीतरी गरम, पौष्टिक आणि पचायला हलकं असेल तर शरीराची ताकद टिकून राहते.(healthy breakfast dosa) मल्टीग्रेन डोसा हा त्यासाठी अगदी परफेक्ट पर्याय. कारण यात ज्वारी, नाचणी, ओट्स, मूगडाळ, उडीदडाळ यासारखे विविध धान्य आणि कडधान्यांचे एकत्रित पोषण मिळते.(winter special dosa) हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, पचन सुधारायचं असेल आणि दिवसभर एनर्जी टिकवायची असेल तर असा मल्टीग्रेन डोसा नक्की खावा.(soft dosa tips)
अनेकदा असा हेल्दी डोसा बनवताना तो जाळीदार होत नाही, मऊ होण्याऐवजी कडक पडतो किंवा तव्याला चिकटतो. पण योग्य प्रमाण आणि एक छोटी ट्रिक वापरली की हिवाळ्यातही घरच्या घरी मऊ, जाळीदार आणि तोंडात विरघळणारा मल्टीग्रेन डोसा तयार होतो. पाहूया या डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य.
Gold Nose Pins : रोज वापरण्यासाठी पाहा भन्नाट डिझाइन्सच्या ५ सुंदर नोजपिन्स, नाकात रिंग दिसेल शोभून
साहित्य
उडीद डाळ - १/२ कप
हिरवे मूग - १/२ कप
चवळी - १/२ कप
मेथी दाणे - १ चमचा
इडली राईस - १ कप
ओट्स - १ कप
क्विओना - १/२ कप
नाचणी - १/२ कप
पोहे - १ कप
कृती
1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये उडदाची डाळ, हिरवे मूग, चवळी आणि मेथी दाणे घालून दोन पाण्याने स्वच्छ धुवा. त्यात पाणी घालून ८ ते १० तास भिजत घाला.
2. आता दुसऱ्या बाऊलमध्ये इडली राईस, क्विओना, नाचणी, ओट्स आणि नाचणी घालून दोन पाण्याने स्वच्छ धुवा. त्यात पाणी घालून हे सुद्धा ८ ते १० तास भिजत घाला.
3. दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने मिक्सरमध्ये वाटून त्याचे पातळ मिश्रण करा. इडली राईचे मिश्रण वाटण्यापूर्वी त्यात पोहे घालून वाटा. दोन्ही मिश्रण एकत्र करुन त्यात वरुन मीठ घाला. तयार बॅटर आंबवण्यासाठी रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
4. आता तवा व्यवस्थित गरम करुन बॅटर पसरवा. मंद आचेवर डोसा कुरकुरीत करा. वरुन तूप घाला. तयार होईल कुरकुरीत मल्टीग्रेन डोसा.
