मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे त्यांना सतत भूक लागते. उन्हात खेळून आल्यानंतर ते सतत काही तरी खायला हवे असा हट्ट आपल्याकडे करतात.(How to make Nachanichi Vadi) वातवरणातील उष्णता आणि मुलांना सतत डिहायड्रेशनची समस्या जाणवू लागते.(Ragi burfi recipe) अशावेळी सतत पाणी पिऊ मुलांची तहानही जात नाही ना छोटी भूक. गोळ्या, चॉकलेट्स खाऊन शरीराला एनर्जी मिळवण्याचा प्रयत्न करतात पण यामुळे दात किडण्याची शक्यता जास्त असते.(Nachni sweet recipe) अशावेळी पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खाणे केव्हाही चांगले.(Healthy summer sweets recipe)
नाचणी ही शक्यतो हिवाळ्यात खाल्ली जाते परंतु, ती थंड असल्यामुळे आपण उन्हाळ्यात देखील खाऊ शकतो.(Ragi recipe for summer) यापासून फक्त भाकरीच नाही तर आपल्याला इतर पदार्थ देखील बनवता येतात.(Easy Nachanichi Vadi recipe at home) यात असणारे अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.(Healthy ragi burfi for kids and adults) उन्हाळ्यात आपण मुलांसाठी नाचणीची पौष्टिक थंडगार वडी करायला हवी, ही रेसीपी कशी बनवायची पाहूया.
७ ते ८ दिवस टिकणारे खुसखुशीत दुधीचे थेपले, उन्हाळा स्पेशल हलका-फुलका नाश्ता...
साहित्य
नाचणीचे पीठ - १ वाटी
दूध - ३ वाटी
तूप - १ चमचा
भाजलेला रवा - २ चमचे
गुळाची पावडर - १ वाटी
वेलची पावडर - १ चमचा
ड्रायफुट्सचे काप - सर्व्हिंगसाठी
कृती
1. सगळ्यात आधी नाचणीचे पीठ चाळून एका भांड्यात घ्या. त्यामध्ये थोडे थोडे दूध घालून चांगले फेटू द्या.
2. आता हे मिश्रण १० मिनिटे झाकूण ठेवा. त्यानंतर कढईत रवा भाजून घ्या.
3. पॅनमध्ये तूप घालून तयार केलेले नाचणीचे बॅटर व्यवस्थित शिजवून घ्या. त्यात भाजलेला रवा घालून रंग बदलेपर्यंत शिजवा.
4. त्यात गुळ पावडर, वेलची पूड घालून मिश्रण चांगले एकजीव करा. मिश्रण चांगले घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा.
5. आता ताटात बेकिंग पेपर ठेवून त्यावर मिश्रण ठेवून चांगले सेट करा. वरुन ड्रायफुट्सचे कापने सजवा.
6. १५ ते २० मिनिटानंतर वड्या कट करुन घ्या. मुलांच्या आवडीचा खाऊ होईल एकदम मस्त..