चहा हा भारतीयांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. सकाळची सुरूवात असो किंवा दिवसाचा थकवा दूर करायचा असो. एक कडक आणि परफेक्ट चहा प्रत्येकालाच असावे असतो. पण असा फक्कड चहा करण्यासाठी आधी दूध घालायचं की पाणी असा प्रश्न अनेकांना पडतो (Milk Tea Recipe How To Make Milk Tea At Home). चहाच्या चवीवर आणि रंगावर परीणाम करणाऱ्या काही महत्वाच्या टिप्स पाहूया. टपरीवर मिळतो तसा कडक चहा करण्यासाठी तुम्हाला या टिप्स कामात येतील. कोणत्या २ पद्धतीनं चहा बनवला जातो ते समजून घ्यायला हवं. (How To Make Milk Tea)
अनेक घरांमध्ये आधी पाणी नंतर चहा पावडर शेवटी दूध या क्रमानं चहा केला जातो. या पद्धतीत आधी पाणी उकळले जाते. त्यात चहा पावडर घातली जाते. चहा पावडर उकळत्या पाण्यात मिसळल्यामुळे त्यातील नैसर्गिक तेल आणि टॅनिन पाण्यात व्यवस्थित मिसळते. यामुळे चहाला एक खोल, नैसर्गिक चव आणि छान गडद रंग मिळतो.
चहा पावडर आणि मसाला पाण्यामध्ये अधिक काळ उकल्यामुळे चहाचा अर्क चांगला उतरतो. ज्यामुळे चहा कडक होतो. ही पद्धत वापरून केलेला चहा कडक, मसालेदार आणि गडद रंगाचा होतो जो भारतीय कडक चहाच्या संकल्पनेत अगदी फिट बसतो.
काही चहाप्रेमी कोल्ड स्टार्ट पद्धतीचा वापर करतात. जिथे पाणी आणि दूध एकत्र गरम करण्यासाठी ठेवले जाते आणि नंतर चहा पावडर घातली जाते. चहाच्या पानांमधील टॅनिन जास्त तापमानाला जास्त वेगानं बाहेर पडतात. ज्यामुळे चहा कडवट होऊ शकतो. दूध आधी घातल्यानं दुधातील प्रथिनं टॅनिनला बांधून ठेवतात आणि चहाचा कडवटपणा कमी होतो. यामुळे चहाला एक गुळगुळीत टेक्स्चर येतो. ही पद्धत मिल्क टी साठी चांगली आहे.
पण यामुळे चहाचा रंग आणि चहाची अपेक्षित चव कमी होण्याची शक्यता असते. जर तुमचा उद्देश परफेक्ट चहा करणं हा असेल तर पारंपारीक पद्धत हीच सर्वोत्तम आहे. यामुळे चहा पावडरला पूर्णपणे फुलून आणि संपूर्ण दम चहात सोडायला वेळ मिळतो. ज्यामुळे चहा खरोखर कडक चविष्ट होतो.
