मुलांच्या शाळा सुरू झाल्या की आता त्यांना डब्यात काय द्यावं असा प्रश्न त्यांच्या आईला नेहमीच पडतो. कारण मुलांना काहीतरी वेगळं हवं असतं. रोज वेगवेगळं काय द्यावं हे मग कळत नाही. अशावेळी लच्छा पराठा हा एक चांगला पर्याय आहे. रात्री जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हा पराठा करू शकता. हा पराठा करण्यासाठी आधीपासूनच खूप काही तयारी करावी लागत नाही. शिवाय तो अगदी झटपट होतो (lachcha paratha recipe). चिली गार्लिक लच्छा पराठा कसा करायचा याची रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(how to make chili garlic lachcha paratha)
चिली गार्लिक लच्छा पराठा रेसिपी
साहित्य
भिजवलेली कणिक
ठेचलेला लसूण
फक्त १० मिनिटांत करा चीज गार्लिक ब्रेड, मुलांनाच काय मोठ्यांनाही आवडेल असा पदार्थ, पाहा रेसिपी
मिरच्यांचे बारीक तुकडे
चाट मसाला आणि धनेपूड
बारीक चिरलेली कोथिंबीर
तूप
कृती
आपण रोजच्या पोळ्या किंवा चपात्या करण्यासाठी ज्या पद्धतीने कणिक भिजवून घेतो तशीच कणिक भिजवून घ्या.
आता भिजवलेल्या कणकेचा एक छोटा गोळा घ्या आणि तो पोळीप्रमाणे लाटा. यानंतर लाटलेल्या पोळीवर थोडं तूप, चाट मसाला, धनेपूड, कोथिंबीर, लसूण आणि मिरची घालून ती पोळी एका बाजुने गोल गोल करत दुसऱ्या टोकापर्यंत न्या.
यानंतर पोळीची पुन्हा एकदा चकलीप्रमाणे गोल गोल गुंडाळी आणि मग वरतून थोडं पीठ लावून पराठा लाटून घ्या. यानंतर तूप लावून तव्यावर हा पराठा खमंग भाजून घ्या. चिली गार्लिक लच्छा पराठा तयार. या पराठ्याला तुम्ही पनीर किंवा चीज घालूनही आणखी चवदार करू शकता. लोणचं, चटणी, भाजी, बटर यासोबत खायला लच्छा पराठा मस्त लागतो.
