आपल्या घरी अचानक पाहुणे आले की नेमकं काय बनवायचं हा प्रश्न पडतो. रोज त्याच त्या पद्धतीच जेवण बनवणं देखील आपल्याला कठीण वाटतं.(Dal tadka recipe) डाळ भात खाऊन कंटाळा आला की नवीन काही तरी खाण्याची इच्छा होते.(Dhaba style dal tadka) पाहुण्यासाठी बाहेरुन जेवणं मागवणं खरं तर आपल्याला परवडणार नाही. त्यात आपल्या घरच्यांची तक्रार असते रोज तोच तो डाळ भात नको. अशावेळी आपण काही नवीन ट्राय करु शकतो. (Jeera rice recipe)
ढाबा स्टाईल दाल तडका आणि जीरा राईस नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. आजकाल पाहुणे अचानक येतात, झटपट पंगत लावावी लागते.(Perfect rice cooking) अशावेळी ही दाल तडका–जीरा राईसची जोडी अक्षरशः लाइफसेव्हर ठरते. फक्त २५–३० मिनिटांत तयार होणारा हा बेत पोट आणि मन दोन्ही तृप्त करतो. शिवाय चव अशी की पाहुणे जाताना विचारतील, रेसिपी नक्की सांगा..(15-minute recipes) घरच्या घरी ढाब स्टाईल दाल तडका बनवण्यासाठी काही छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स पाळल्या की आपली दाल रेस्टॉरंटपेक्षा उत्तम लागेल. पाहूया रेसिपी.
साहित्य
मसूर डाळ- १/४ कप
तूर डाळ -२ टेबलस्पून
मूग डाळ -२ टेबलस्पून
हळद- ½ टिस्पून
मीठ -१ टिस्पून
तूप २–३ टेबलस्पून
तेल- १ टेबलस्पून
जिरे १ टिस्पून
हिंग- ¼ टिस्पून
सुक्या लाल मिरच्या ४
कढीपत्ता- १ काडी
आले- १ इंच
लसूण- ५–८ पाकळ्या
कांदा- १ लहान बारीक चिरलेला
टोमॅटो- १ लहान बारीक चिरलेला
हिरवी मिरची- २
हळद थोडीशी
लाल तिखट -१ टिस्पून
धने पावडर- १ टिस्पून
कसुरी मेथी- १ टेबलस्पून
मीठ- चवीनुसार
कोथिंबीर- १ टेबलस्पून
लोणी- १ टेबलस्पून
कोलम तांदूळ- २ कप
पाणी- ४ वाटी
लिंबाचा रस -१ टीस्पून
साजूक तूप- ४ टेबलस्पून
जिरे -२ टीस्पून
कृती
1. सगळ्यात आधी कुकरमध्ये मसूर डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ स्वच्छ धुवून घ्या. त्यात हळद, तेल आणि पाणी घालून तीन शिट्ट्या करुन घ्या.
2. जीरा राईस करण्यासाठी आपल्या तांदूळ स्वच्छ धुवून ३० मिनिटे भिजवावा लागेल. यानंतर कढई गरम करुन त्यात पाणी, चमचाभर तूप, मीठ आणि लिंबाचा रस घालून उकळी येऊ द्या. त्यात भिजवलेले तांदूळ घालून हलक्या हाताने ढवळा. पाणी आटल्यानंतर आणि थोडा भात शिजल्यावर मंद आचेवर भात शिजण्यासाठी ठेवा.
3. भात शिजल्यानंतर वरुन जिऱ्याची फोडणी द्या. वरुन मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व एकजीव करुन घ्या. तयार होईल मऊ मोकळा जीरा राईस.
4. डाळ शिजल्यानंतर कढईमध्ये तूप तापवून त्यात जिरे, लसूण, हिरवी मिरची घालून परतवून घ्या. नंतर त्यात आले किसून परतवून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या घालून व्यवस्थित परतवून घ्या.
5. त्यात हळद, मिरची पावडर, धने पूड, कसुरी मेथी आणि पाणी घालून पुन्हा चांगले ढवळून घ्या. थोडासा तडका काढून घ्या. उरलेल्या फोडणीमध्ये शिजलेल्या डाळी आणि पाणी घाला. उकळी आल्यानंतर वरुन गरम मसाला, कोथिंबीर घाला. तयार होईल ढाबा स्टाईल दाल तडका.
