Lokmat Sakhi >Food > कांद्याचा गरमागरम पराठा, तोंडाला चव येणारच.. वेळखाऊ पराठ्यांना चविष्ट आणि झटपट पर्याय

कांद्याचा गरमागरम पराठा, तोंडाला चव येणारच.. वेळखाऊ पराठ्यांना चविष्ट आणि झटपट पर्याय

How To Make Onion Paratha: घरात कुठली भाजी नसली तरी कांदा हा असतोच. तेव्हा पराठे खायचे आहेत आणि घरात भाज्या नाही म्हणून प्लॅन रद्द करण्याचं कारण नाही. कारण कांद्याचे पराठेही इतर पराठ्यांच्या तोडीस तोड होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 07:22 PM2021-11-30T19:22:54+5:302021-11-30T19:30:52+5:30

How To Make Onion Paratha: घरात कुठली भाजी नसली तरी कांदा हा असतोच. तेव्हा पराठे खायचे आहेत आणि घरात भाज्या नाही म्हणून प्लॅन रद्द करण्याचं कारण नाही. कारण कांद्याचे पराठेही इतर पराठ्यांच्या तोडीस तोड होतात.

How To Make Onion Paratha: Onion Paratha is tasty and instant option for time consuming paratha | कांद्याचा गरमागरम पराठा, तोंडाला चव येणारच.. वेळखाऊ पराठ्यांना चविष्ट आणि झटपट पर्याय

कांद्याचा गरमागरम पराठा, तोंडाला चव येणारच.. वेळखाऊ पराठ्यांना चविष्ट आणि झटपट पर्याय

Highlightsकांद्याच्या पराठ्यांसाठी पीठ मळताना त्यात इतर कोणतेही पीठ घालण्याची गरज नसते.पराठ्यांना चव येण्यासाठी चाट मसाला आणि गरम मसाला आवश्यकच.पराठे नीट लाटता यावेत म्हणून कांदे बारीक चिरुन घेण्यापेक्षा किसून घ्यावेत.

हिवाळ्यात कोणत्याही वेळी गरम गरम पराठे खाण्यास मजा येते. पण पराठे म्हटलं की कोबी, बटाटा याच भाज्या समोर येतात. याचे पराठे करायचे म्हटलं तर ते करायलाही वेळ लागतो. शिवाय कधी भाज्या उपलब्ध असतातच असं नाही. घरात कुठली भाजी नसली तरी कांदा हा असतोच. तेव्हा पराठे खायचे आहेत आणि घरात भाज्या नाही म्हणून प्लॅन रद्द करण्याचं कारण नाही. कारण कांद्याचे पराठेही इतर पराठ्यांच्या तोडीस तोड होतात. शिवाय करायला सोपे आणि अगदी चविष्ट. सकाळच्या चहासोबत कांद्याचा पराठा आणि चटणी किंवा दुपारच्या जेवणात पोटभर कांद्याचे पराठे केले तरी चालतं. तेव्हा यंदाच्या थंडीत कांद्याचा पराठा आधी खाऊन पाहा. वेळखाऊ पराठ्यांना नक्कीच झटपट पराठ्याचा परफेक्ट पर्याय सापडेल. 

Image: Google

कांद्याचे पराठे कसे कराल?

कांद्याचे पराठे करण्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ, 2 कप चिरलेला किंवा किसलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा भाजलेल्या जिर्‍यांची पावडर, पाव चमचा चाट मसाला, 1 मोठा चमचा कोथिंबीर , चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार तेल घ्यावं.

Image: Google

कांद्याचे पराठे करताना सर्वात आधी एका भांड्यात कणिक घ्यावी. त्यात चिरलेला कांदा, बारीक केलेली हिरवी मिरची, गरम मसाला, लाल तिखट, मीठ , जिरे पावडर, चाट मसाला, कोथिंबीर घालून थोडं थोडं पाणी घालत पीठ मऊसर मळून घ्यावं. पिठाला तेल लावून 15 मिनिटं झाकून ठेवावं. नंतर पिठाच्या लाट्या करुन त्याला कोरडं पीठ लावून पराठा लाटून घ्यावा. पराठा हा जाडसरच लाटावा. तवा आधी गरम करावा. तो तापला की तव्याला थोडं तेल लावावं आणि मग पराठा शेकण्यासाठी तव्यावर घालावा. पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा. हा पराठा दही किंवा रायत्यासोबत छान लागतो.

Web Title: How To Make Onion Paratha: Onion Paratha is tasty and instant option for time consuming paratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.