Lokmat Sakhi >Food > रक्ताची कमतरता, कमकुवत हाडं हे त्रास टाळण्यासाठी अवश्य खावेत असे 'हे' 5 पदार्थ

रक्ताची कमतरता, कमकुवत हाडं हे त्रास टाळण्यासाठी अवश्य खावेत असे 'हे' 5 पदार्थ

Health benefits of 9 black foods :काळ्या द्राक्षांमध्ये हिरव्या किंवा लाल द्राक्षेपेक्षा जास्त अँटीऑक्सिडेंट असतात. हे रासायनिक मिश्रण आपल्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 12:13 PM2021-06-15T12:13:20+5:302021-06-15T13:19:02+5:30

Health benefits of 9 black foods :काळ्या द्राक्षांमध्ये हिरव्या किंवा लाल द्राक्षेपेक्षा जास्त अँटीऑक्सिडेंट असतात. हे रासायनिक मिश्रण आपल्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

Health benefits of 9 black foods to include in your daily diet | रक्ताची कमतरता, कमकुवत हाडं हे त्रास टाळण्यासाठी अवश्य खावेत असे 'हे' 5 पदार्थ

रक्ताची कमतरता, कमकुवत हाडं हे त्रास टाळण्यासाठी अवश्य खावेत असे 'हे' 5 पदार्थ

Highlightsकाळा लसूण सहज उपलब्ध नसतो, परंतु आरोग्यासाठी त्याचे फायदे बरेच आहेत. साध्या पांढर्‍या लसूणला उच्च तापमानात तयार केले जाते. काळे तीळ आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. आरोग्याच्या बाबतीत आता भारतीय लोकांनीही त्याचे सेवन करण्यास सुरवात केली आहे.

लहानपणापासूनच आपण ऐकत आहोत की निरोगी राहण्यासाठी आपण हिरव्या पालेभाज्या आणि रंगीबेरंगी फळे खावी. परंतु आपण कधीही एखाद्याला गडद पदार्थांबद्दल सांगताना ऐकले आहे? कदाचित नाही. कारण आपल्या सर्वांचा असा विश्वास आहे की जर काहीतरी काळे रंगाचे असेल तर ते विचित्र आहे आणि खाण्यास योग्य नाही. परंतु तज्ज्ञ म्हणतात की काळ्या रंगाची फळे किंवा भाज्या त्यांच्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे.

खरं पाहता गडद रंगाचे पदार्थ लोकांना खूप आकर्षित करतात. संशोधनात असे दिसून आले आहे की त्यामध्ये उपस्थित अँथोसायनिन आपल्याला मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या आजारांशी लढायला देखील मदत करू शकते. आम्ही तुम्हाला अशा 5 अशा गडद रंगाच्या पोषक आहारांबद्दल सांगत आहोत जे तुम्ही खायलाच पाहिजेत.

निरोगी आरोग्यासाठी ब्लॅकबेरी

जेव्हा आरोग्याबाबत बोल्लं जातं तेव्हा ब्लॅकबेरी शरीरासाठी फायदेशीर समजली जातात. नियमित सेवन केल्यानं शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. याशिवाय इम्यूनिटीसुद्धा चांगली होते. या फळाचे महिलांनी सेवन करणं गरजेचं आहे. मासिक पाळी अनियमित असेल तर या फळांच्या सेवनानं मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते. या फळात एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून स्मूदी, डेजर्ट, सॅलेड, पॅनकेकमध्ये याचा वापर केला जातो. 

एंटी ऑक्सिडेंट्सनी भरपूर असतात काळी द्राक्ष

काळ्या द्राक्षांमध्ये हिरव्या किंवा लाल द्राक्षेपेक्षा जास्त अँटीऑक्सिडेंट असतात. हे रासायनिक मिश्रण आपल्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. हे कर्करोग, मधुमेह, अल्झायमर, पार्किन्सन आणि हृदय रोग यासारख्या आजारांपासून देखील संरक्षण करते. हिरव्यांप्रमाणेच काळी द्राक्षे देखील आपल्याला आजारातून लवकर बरी होण्यास मदत करतात.

काळे लसूण

काळा लसूण सहज उपलब्ध नसतो, परंतु आरोग्यासाठी त्याचे फायदे बरेच आहेत. साध्या पांढर्‍या लसूणला उच्च तापमानात तयार केले जाते. याच्या सेवनानं जळजळ कमी करण्यास आणि स्मरणशक्ती वाढविण्यात मदत होते. हा लसूण विशेषतः अल्झायमरच्या रूग्णांसाठी वरदान आहे. बर्‍याच अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की त्याच्या अँटीऑक्सिडंट आणि इतर गुणधर्मांमुळे ते तब्येतीसाठी चांगले ठरते. 

काळे तीळ

काळे तीळ आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. आरोग्याच्या बाबतीत आता भारतीय लोकांनीही त्याचे सेवन करण्यास सुरवात केली आहे.सॅच्यूरेडेट फॅट्स, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम समृद्ध असलेले काळे तीळ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य आणि उच्च रक्तदाब यासारख्या समस्यांसाठी एक चांगला घरगुती उपाय आहे. या बियाण्यांमध्ये असलेले लोह, तांबे आणि मॅंगनीज ऑक्सिजनचा प्रवाह आणि रक्ताभिसरण नियंत्रित करतात.

काळे अंजीर

काळ्या अंजीरांबद्दल तुम्ही फारच कमी ऐकले असेल. काळे अंजीर मधुर, चवदार आणि ताजी फळं असतात जी अमेरिकेत पिकतात. पोटॅशियम आणि फायबर समृद्ध असल्याने हे फळ आपलं पचन सुधारते. तसे, आपण अंजीर खाऊन वजन कमी करू शकता. जर आपण रोगांबद्दल बोललो तर काळ्या अंजीरमध्ये असलेले विशेष घटक कर्करोगाच्या पेशीविरूद्ध लढायला मदत करतात. एवढेच नव्हे तर रक्तदाब कमी करण्याबरोबरच त्यांचे सेवन केल्यास उच्च रक्तदाबाच्या समस्येपासूनही मुक्तता मिळते.

चिया सीड्स

चिया सीड्स हे जगातील सर्वात आरोग्यासाठी उपयुक्त खाद्य पदार्थ म्हणून ओळखले जाते. चिया सीड्स काळ्या-तपकिरी रंगाचे आणि स्पॉट्स असलेल्या लहान अंडाकृती आकाराचे असतात. भिजवल्यावर ते स्वत: च्या वजनापेक्षा 12 पट जास्त शोषून घेऊ शकतात. चिया सीड्स बी जीवनसत्त्वे, थायमिन, नियासिन, रायबोफ्लेविन आणि फोलेटचा उच्च स्रोत आहे. यात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस आणि जस्त ही खनिजे आहेत. याव्यतिरिक्त ओमेगा -3 फॅटी एसिड देखील त्यात मोठ्या प्रमाणात आढळतात.

काळे तांदूळ

काळे तांदूळ इतर धान्यांपेक्षा जास्त पौष्टिक  असतात. या तांदळाचा काळा रंग तुम्हाला कदाचित आवडत नसेल पण स्वत: ला निरोगी ठेवण्यासाठी त्यांचे सेवन करणे चांगले मानले जाते. पोटाशी संबंधित आजार बरे करण्यासाठी चीनमधील बहुतेक लोक हे सेवन करतात. काळ्या तांदळामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे दृष्टी सुधारण्यासाठी चांगले असतात. मधुमेह आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी हा भात अत्यंत उपयुक्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्यांना ग्लूटेनपासून एलर्जी आहे किंवा ग्लूटेन-मुक्त आहाराचे अनुसरण करतात अशा लोकांसाठी देखील काळा तांदूळ एक उत्तम पर्याय आहे.

काळी मिरी

काळ्या मिरीमध्ये बरीच प्रकारच्या संयुगे आढळतात. हे शरीरातील पोषकद्रव्ये शोषण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यात पेपरिन नावाचे एक कंपाऊंड आहे, जे प्रभावीपणे जळजळीविरूद्ध लढू शकते. अभ्यास दर्शवितो की पेपरिन रक्तातील साखर आणि चयापचय सुधारण्यास मदत करू शकते. संशोधनात असं आढळलंय की आहारात काळ्या रंगाचे पदार्थ खाण्याने हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर याचे सेवन करून आपण आपल्या त्वचेची चमक कायम ठेवू शकता.
 

Web Title: Health benefits of 9 black foods to include in your daily diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.