भारतात अनेक असे प्रॉडक्टस आहेत जे फार लोकप्रिय आहेत त्यापैकी सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे मॅगी. केवळ दोन मिनिटांत तयार होणारा हा पदार्थ आज भारतातील प्रत्येक वयोगटाच्या मनात घर करून बसला आहे. (Have you seen this viral recipe for Maggi? See how to make cheesey Maggi, must try)कुठलेही हॉस्टेल असो, ऑफिसची संध्याकाळ असो, अचानक आलेल्या पाहुण्यांना पटकन काही खायला द्यायचे असो किंवा पावसाच्या थंडगार वातावरणात गरमागरम काही हवे असेल तरी मॅगी हेच नाव लोकांच्या तोंडी येते.
भारतामध्ये मॅगीची लोकप्रियता केवळ तिच्या झटपट तयार होण्यावर थांबत नाही. तिच्या चविष्ट, मसालेदार, हलक्या आणि तरीही तृप्त करणाऱ्या गुणांमुळे ती प्रत्येकाच्या आवडीची डिश झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पदार्थ कितीही साधा असला तरी तो हव्या त्या पद्धतीने बदलता येतो. म्हणूनच मॅगी वन डिश – थाऊजंड स्टाइल्स म्हणून ओळखली जाते.
ढाबा स्टाइल मॅगी मसाल्यांनी भरलेली असते तर, शहरातल्या कॅफेंमध्ये चीज मॅगी, पेरी- पेरी मॅगी, तंदूरी मॅगी, स्कीम्ड व्हेज मॅगी यासारखे वेगवेगळे प्रयोग केले जातात. मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवड वेगळी, आणि मॅगीचा बदलता प्रकार या प्रत्येक आवडीला साथ देणारा. असाच एक पदार्थ सध्या व्हायरल झाला आहे. तो म्हणजे ही चीझी मॅगी. अनेकांना ही रेसिपी अतिरेकी वाटतेय तर काहींना चविष्ट. तुम्हीही करुन पाहा आणि ठरवा.
साहित्य
मॅगी, चीज, दूध, पिझ्झा सॉस , मायोनिज, लाल तिखट, फ्रेश क्रिम
कृती
१. एका पॅनमध्ये चार ते पाच चीजचे स्लाइस घ्यायचे. त्यात चमचाभर पिझ्झा सॉस घालायचा. तसेच त्यात चमचाभर मायोनिज घालायचे. चमचाभर लाल तिखट घाला आणि मॅगी मसाला घालून त्यात फ्रेश क्रिमही घाला. ढवळून घ्यायचे आणि त्यात दूध घालायचे. पाण्याऐवजी दूध वापरा.
२. सारे पदार्थ छान ढवळून एकजीन करायचे. जरा घट्टसर पेस्ट तयार झाली की त्यात मॅगी घालायची. झाकण ठेवायचे आणि शिजवून घ्यायची. मस्त घट्ट अशी मॅगी तयार होते. जास्त पातळ करायचे असेल तर त्यात थोडे जास्त दूध घालायचे.
